Friday, April 2, 2010

महाबळेश्वर

महाबळेश्वर -
पावसाळ्यातल्या महाबळेश्वरला एक स्वभाव आहे. गुढ भासतं ते या काळात. सगळ्या आसमंताला गुरफटुन टाकणारी ढगाची घोंगडी, लहरी पाउस, शेवाळाच्या झिप-या पिंजारलेली निष्पर्ण झाडं. महाबळेश्वर मोठं ‘ऍटमॉस्फेरीक’ असतं. ग्रेसच्या कवितेसारखं रहस्यमय, आकर्षित करणारं, स्वयंमग्न आणि लिरिकल!

सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवरील थंड हवेचे हे ठिकाण म्हणजे आरोग्य रक्षणाची इंग्रजांची सोय असलेले ठिकाण होते.

सातार्‍याचे महाराज प्रतापसिंह यांनी १८१८ ते १८३० दरम्यान महाबळेश्र्वर हे आरोग्यवृद्धीसाठी विकसित करण्याचे ठरवले. जॉन माल्कम हे तेव्हाचे गव्हर्नर १८२८ मध्ये महाबळेश्वरला भेट देऊन गेले. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी लॉडविक यांनी या स्थानाचा ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणून नियोजित विकास केला. त्याआधी सर चार्लस्, मॅलेट हेदेखील महाबळेश्र्वरला येऊन गेले होते असे उल्लेख आढळतात.


महाबळेश्वर पाहताना बॉम्बे पॉइंट, ऑर्थर सीट, केटस् पॉईंट, लॉडविक - विल्सन, एलफिस्टन पॉईंट्स, वेण्णा लेक, लिंगमळा धबधबा, तापोळा, जवळचे श्रीक्षेत्र महाबळेश्वर, येथील महादेवाचे मंदिर ही ठिकाणे महत्त्वाची! श्री क्षेत्र महाबळेश्वर येथूनच कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्या उगम पावतात. या स्थानाला पंचगंगा असेही म्हटले जाते.



वेण्णा लेक 

उत्तम रस्ते, दाट झाडी, बागा, फुला-फळांच्या रोपवाटिका यामुळे महाबळेश्र्वर अनेकांचे आवडीचे थंड हवेचे ठिकाण आहे. जॅम-जेली, सरबते, मध, चणे, स्ट्रॉबेरी यांसाठीही महाबळेश्र्वर प्रसिद्ध आहे. राहण्याच्या सोयी, विविध प्रकारच्या- स्तरांच्या हॉटेल्सची मुबलक सोय यामुळे उन्हाळ्यात आणि सुट्टीत महाबळेश्वर गजबजून जाते.


इ. स. १८३४ ते १८६४ या दरम्यान महाबळेश्वरमध्ये चीनी-मलाई कैदी तुरुंग होता. सुमारे १२० कैद्यांसाठीचा तुरुंग येथे होता. स्ट्रॉबेरी लागवड, बांबूचे विणकाम, मुळ्याची - गाजराची लागवड अशी कामे कैद्यांकडून करून घेतली जात. कैदी कधी कधी तुरुंगातून सुटल्यावर परत न जाता महाबळेश्र्वर मध्येच राहू लागले, असेही झाले.



उंच कडे, खोल दर्‍या, दाट जंगले, थंड-स्वच्छ हवा आणि नीरव शांतता यांचा सुंदर अनुभव सह्याद्रीच्या रांगेतील या स्थानामध्ये मिळतो. परिसरातल्या एका गावाचे ग्रामदैवत महाबळी आहे. या महाबळीचे मंदिर यादवकाळात यादव राजांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद इतिहासात आढळते. या ग्रामदैवतावरूनच या भागाला महाबळेश्वर असे नाव देण्यात आले, असे म्हटले जाते. अनेक वैशिष्ट्यांमुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटक महाबळेश्वरला वारंवार भेट देतात

नाशिक

नाशिक : महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हे शहर नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मुख्यत्वे मराठी भाषा वापरली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. जगातले सर्वांत मोठे मातीचे धरण नाशकात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य.च.म.मु.वि.) नाशकातच आहे.

नाशिक महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. सीमेंस, महिंद्र अँड महिंद्र, मायको, व्ही.आय.पी., क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अँड टुब्रो, ABB, सॅमसोनाइट, सिएट आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांसारखे अनेक मोठे कारखाने नाशिकपरिसरात आहेत. शहराजवळ एकलहरा येथे औष्णिक विद्युतकेंद्र आहे. तसेच नाशिक रोड येथे नोटांचा छापखाना (इंडियन सिक्युरिटी प्रेस) आहे. नाशिक-
मुंबई महामार्गावर सिडको हा शहराचा नवीन भाग वसला आहे. हा बससेवेने जोडलेला आहे.

संस्कृती
ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले जाते. रामायणात नाशिकपरिसरातील 'पंचवटी' येथे राम वास्तव्यास होता, असे उल्लेख आहे. मुघल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिंद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. पेशवे घराण्यातील आनंदीबाई पेशवे येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने आनंदवली हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता.

बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक अनंत कान्हेर्‍यांनी जॅक्सन याचा वध नाशकातील विजयानंद रंगमंदिरात केला होता.

जुन्या नाशकातील तालिमींचे संघ व्यायामासाठी प्रसिद्ध आहेत. शिवाजी महाराज सुरत लुटून परतत असताना पाठलाग करणार्‍या रणदुल्ला खानाशी त्यांची लढाई शहरापासून जवळच असलेल्या दिंडोरी येथे झाली. अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारे शिवकालीन व त्यापूर्वीचे किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत

नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वराजवळ नाणी संशोधन केंद्र आहे. तसेच सिन्नर येथे गारगोटी हे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.

धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे :
    * त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.
    * अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
    * वणी किंवा सप्तशृंगी हे देवीचे स्थान ५२.२७ कि.मी. अंतरावर आहे.
    * पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षे जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.
    * फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
    * राम कुंड - गोदावरी नदीवरील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
    * सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
    * काळा राम मंदिर - रामाचे काळ्या पाषाणात बनवलेले प्राचीन मंदिर
    * सादिकशाह हुसेनी बाबा दर्गा शरीफ.
    * कळसूबाई शिखर -]] हे देवीचे स्थान ५२.२७ कि.मी. अंतरावर आहे.
    * पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षे जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.
    * फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
    * राम कुंड - गोदावरी नदीवरील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
    * सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
    * काळा राम मंदिर - रामाचे काळ्या पाषाणात बनवलेले प्राचीन मंदिर
    * सादिकशाह हुसेनी बाबा दर्गा शरीफ.
    * कळसूबाई शिखर - महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर
    * सोमेश्वर येथे प्रसिध्द् शिवमंदिर आहे, तसेच नवीन तिरुपती बालाजी मंदिर बनले आहे.
    * सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमूखी हनुमान मंदिर आहे.
    * कपालेश्वर मंदिर - नंदी नसलेले शिवमंदिर
    * मुक्तिधाम
    * भक्तिधाम
    * नवश्या गणपती
    * चामर लेणी
    * रामशेज किल्ला
    * इच्छामणी गणपती
    * आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
    * कालिका मंदिर, नाशिकचे ग्रामदैवत

मनोरंजन

नाट्यगृह

  • महाकवि कालिदास कलामंदिर
  • परशुराम सायखेडकर नाट्यगृह


चित्रपट गृह


  • फेम सिनेमा, पुणे-नाशिक रस्ता, नाशिक
  • हेमलता रविवार पेठ
  • सिनेमॅक्स, कॉलेज रोड
  • दामोदर भद्रकाली
  • सर्कल - विकास अशोक स्तंभ
  • मधुकर मेन रोड
  • दिव्या बिग सिनेमा (त्रिमूर्ती चौक)
  • महालक्ष्मी (दिंडोरी रोड)
  • चित्रमंदिर मेन रोड
  • विजयानंद
  • अशोक (मालेगाव स्टँड, पंचवटी)
  • सिनेमॅक्स - रेजिमेंटल (नाशिक रोड)
  • अनुराधा (नाशिक रोड)


आकाशवाणी केंद्रे

  • सध्या नाशिकमध्ये ३ आकाशवाणी केंद्रे आहेत.
  • ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी १०१.४
  • रेडिओ मिरची ९८.३
  • रेड एफएम ९३.५


बाजार हाट

  • मेन रोड हा जुन्या शहराचा मुख्य बाजार आहे.
  • कॉलेज रोड हा नव्या शहराचा बाजार होत आहे.
  • नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी प्रसिध्द आहे.
  • चांदीच्या दागिन्यांसाठीही प्रसिद्ध आहे
  • येथील मकाजी व कोंडाजी चिवडे मसालेदार व वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी प्रसिद्ध आहेत.



वाहतुकीचे पर्याय

  • ऑटोरिक्षा
  • परिवहन महामंडळाच्या बस
  • लोहमार्गाने मुंबई, नागपूर, कोलकाता आणि दिल्ली या ठिकाणांसाठी दररोज गाड्या आहेत.



बसस्थानक

  • मध्यवर्ती बस स्थानक
  • महामार्ग बस स्थानक
  • ठक्कर बाजार बस स्थानक
  • नासिक रोड बस स्थानक
  • मेळा बस स्थानक


राहण्याच्या सोयी

  • हॉटेल ताज
  • साई पॅलेस
  • पंचवटी यात्री हॉटेल
  • हॉटेल द्वारका
  • हॉटेल नटराज
  • हॉटेल हॉलिडे इन


हवामान
पावसाळ्याव्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. कमाल तापमान ४६.७° से. मे २३, १९१६ रोजी नोंदले गेले. न्यूनतम तापमान ०.६° से. जानेवारी ७, १९४५ रोजी नोंदले गेले. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे.

खवय्येगिरी 
नाशिकचा कोंडाजी चिवडा सुप्रसिद्ध आहे.
जुन्या नाशकात बुधा हलवाई यांची मिठाई-जिलेबी, पेढा व श्रीखंड चवीसाठी प्रसिद्ध आहे.
येथील द्राक्षे व खुरचंद वडी प्रसिद्ध आहे.

शाळा

  • आदशॅ विद्यालय
  • पेठे विद्यालय (स्थापना १९२४)
  • रचना विद्यालय
  • रुंगटा विद्यालय
  • नवरचना विद्यालय
  • भोसला मिलीटरी स्कुल
  • रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडियम शाळा
  • फ़्रावशि अकादमि, त्रंबक रस्ता
  • किलबिल सेंट जोसेफ'स हायस्कुल
  • पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिक रोड
  • सारडा कन्या विद्यालय, शालिमार
  • कोठारी कन्या शाळा, नाशिक रोड
  • जयरामभाई हायस्कूल, नाशिक रोड
  • नवीन मराठी शाळा, नाशिक रोड
  • सि.डी.ओ मेरी हायस्कूल, मेरी.
  • बी.डी भालेकर हायस्कूल, त्रंबक रस्ता पोस्ट ऑफिस जवळ
  • रवींद्र विद्यालय, द्वारका
  • मराठा हायस्कूल
  • उन्नती माध्यमिक विद्यालय, पेठ रोड पंचवटी
  • विवेकानंद विद्यालय, मोरवाडी
  • [[श्री राम् विद्यालय्
  • जनता विद्यालय सातपूर
  • [डी.डी.बिटको बॉईज हायस्कूल],[सी.बी.एस].
  • [यशोदामाता बिटको गर्ल्स हायस्कूल],[सी.बी.एस.]


महाविद्यालये

  • के. टी. एच. एम. महाविद्यालय
  • आर. वाय. के. महाविद्यालय
  • एच. पी. टी. कला महाविद्यालय
  • बी. वाय. के. कॉलेज भिकुसा यमासा क्षत्रिय वाणिज्य महाविद्यालय
  • क. का. वाघ अभियांत्रीकी महाविद्यालय
  • क. का. वाघ पॉलीटेक्नीक
  • सिंबायोसिस इंस्टीट्युट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट
  • शासकीय तंत्रनिकेतन नाशिक
  • हिरे दंत महाविद्यालय
  • भुजबळ नॉलेज सिटी
  • डी.डी. बिटको बॉय्ज् जुनियर कॉलेज
  • एन.डी.एम.व्ही.पी. कॉलेज (ओझर)
  • के.जे. मेहता हायस्कूल व जुनियर कॉलेज (नाशिक रोड)
  • शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक


व्यक्तिमत्व 

  • दादासाहेब फाळके
  • स्वातंत्र्यवीर सावरकर
  • कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)
  • बापू गायधनी
  • आर. डी. कर्पेकर
  • वसंत कानेटकर
  • अनंत कान्हेरे
  • दादासाहेब पोतनीस (गावकरी)
  • दादासाहेब गायकवाड


अर्नाळा



किल्ल्याचे इतिहासाथिल  महत्त्व :
चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग गुजरातचा सुलतान महमुद बेगडा याने १५१६ मध्ये बांधला. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून अनेक नवीन बांधकामे केली. १७३७ मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधनी केली. १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील ठिकाणे:
अर्नाळा किल्ला चौकोनी असुन सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबुत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असुन मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुस दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असुन दोन्ही बाजुला वाघ व हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर दरवाजावर खालील शिलालेख आढळतो:

'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापले शंकर!
पाश्चात्यासि वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!'

किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर व भवानीमातेचे
मंदिर आहे. या शिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या विहिरी सुद्धा आहेत.
किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असुन त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या
मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिकामातेचे मंदिर आहे.

अर्नाल्याच्या तटाची उंची १०  मीटर आहे.तटाची रुंदी तीन मीटर आहे.आत दत्तमंदिर आहे.

एका पोर्तुगीजाने लिहिले आहे-'मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसई प्रांत
जिंकून घेतल्यावर लगेच वसई व अर्नाळा येथे आपले आरमार उभारले व विजयदुर्ग
ताब्यात घेतल्यापासून तीन ठिकाणी मराठ्यांचे आरमारी तळ झाले आहेत.'

अर्नाळ्याचा हा कोट पूर्ण बेटावर बांधला नसल्याने बेटावर शत्रू उतरून
कोटाकडे येण्याची शक्यता होती.या बेटावर त्यासाठी टेहालनिसाठी आणि क्वचित
तोफांचा मारा करण्यासाठी एकांडा टेहालणी बुरुज बांधलेला आहे.युरोपच्या
किनारपट्टीवर असे प्रचंड बुरुज आढळतात.अशा बांधकामाला तिकडे 'मोर्ट्रेलो
टोवर' म्हणतात.असे एक आगळेवेगळे बांधकाम अर्नाळा बेटावर आहे.ते
अभ्यासण्यासारखेआहे.

गडावर जाण्याच्या वाटा:
पश्चिम रेल्वेच्या विरारपासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी. असुन तेथे जाण्यास एस. टी. बस व रिक्षा
यांची सोय आहे. समुद्रकिनार्‍यापासून बोटीने किल्ल्यावर जावे लागते. ही
बोट सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच
आपल्याला किल्ल्यावर घेउन जाते.

महाराष्ट्राची अस्मिता तपासून पाहावी

विविध गुणांनी झळाळणार्‍या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांनी देशाच्या इतिहासात मानाचे स्थानपटकावले आहे. एकूणच भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय नकाशात महाराष्ट्राचे महत्त्वसातवाहन राजांच्या काळापासून आहे, असे मानले जाते. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा,परकीय आक्रमणे अशा विविध ठिकाणी महाराष्ट्राने देशाला दिशा दिलेली आहे.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा वेध घेतला, तर एक गोष्ट निश्चित म्हणाविशी वाटतेकी, महाराष्ट्र हा बुद्धिवाद्यांचा देश आहे आणि बुद्धिवाद्यांच्या गुणधर्मानुसार अटळ असणारीजागरूकता महाराष्ट्राच्या मातीत आहे. म्हणूनच एकविसाव्या शतकात, इलेक्ट्रॉनिक युगमाणसाला संपूर्णपणे व्यापून टाकीत असताना, या वेगवान बदलात आपलं महाराष्ट्रपण संपणारकाय, अशी रास्त शंका आजच्या बुद्धिवाद्यांना भेडसावते आहे. अशा वेळी आपल्या महाराष्ट्राचीअस्मिता तपासून पाहावी, तसेच स्वत्व घडवणार्‍या शक्तींचे पुनर्लोकन करावे.

जरा हासुया






आषाढी एकादशी

आषाढी एकादशी


आषाढी एकादशी :
आषाढ महिना म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पंढरपूरच्या वारीचा काळ असतो. आषाढी एकादाशीच्या दिवशी अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचतात. त्यांसोबत लक्षावधी लोक अनेक दिंड्यातून पायी चालत, विठोबाचे वारकरी म्हणून मोठ्या श्रद्धेने पंढरीला पोहोचतात.

वारकर्‍यांत जात, पंथ, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा जराही भेदभाव नसतो. इसवी सन १२९१ मध्ये आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी पहिली दिंडी निघाली होती असे म्हटले जाते. या वारीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही विठ्ठलभक्त नियमितपणे दिंडीत सामील होतात. वारकरी लाखोंच्या संख्येने विठ्ठलनामाचा गजर, भजन- प्रवचन-कीर्तन करत पायी चालतात.

असंख्य तरुणही त्यात हौसेने व भक्तिभावाने सामील होतात. परदेशी लोकही मुद्दाम या सुमाराला ही विठ्ठलभक्तीची वारी पाहण्यासाठी भारतात येतात आणि या अनोख्या परंपरेचा अनुभव घेतात.

गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध-टिळा-बुक्का आणि तोंडाने विठुनामाचा गजर करणारे हे वारकरी खांद्यावर पताका, हातात टाळ, डोक्यावर तुळस घेऊनही चालतात. अनेकांच्या गळ्यात मृदंगही असतो. वर्षानुवर्षे वारीला जाणारे लाखो लोक निग्रहाने चालतात, वाटेत होईल तशी विश्रांती घेतात, मिळेल ते जेवण-खाण घेतात. वारीचे, विविध पालख्यांचे प्रवास-निवास-भोजन यांचे वेळापत्रक, व्यवस्थापन हाही एक अनुभवण्याचा विषय आहे. आषाढातील ही एकादशी उपवास करून घरोघरी साजरी होते. पावसाळ्याची सुरुवात असल्याने ताजी रताळी, नवा बटाटा, खजूर, फळे, वर्‍याचे तांदूळ, खिचडी असे विविध उपवासाचे पदार्थ या दिवशी ग्रहण केले जातात.

या एकादशीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्र्वरांची, देहूतून संत तुकाराम, त्र्यंबकेश्र्वरहून संत निवृत्तीनाथ, सासवडहून सोपान देवांची, पैठणहून संत एकनाथंची, मेहूणहून संत मुक्ताबाईंची, औंढ्या नागनाथहून संत विसोबा खेचरांची, तेरहून संत गोरा कुंभारांची - अशा अनेक पालख्या पंढरपूरला जायला निघतात. संत ज्ञानेश्र्वरांची पालखी आळंदीहून ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला निघते. ती आषाढ शुक्ल दशमीला रात्री पंढरपूरला पाहोचते.



गोष्ट  आषाढी एकादशीची :


संपूर्ण वर्षभरामध्ये साधारणता: चोवीस एकाद्शी येतात. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक व शुक्‍ल पक्षात एक. दोन एकादशी ह्या अधिक मास असल्यास जादा असतात. या सर्वांमध्ये आषाढी व कार्तिकी एकाद्शीस अनंन्य साधारण महत्‍व आहे. असे मानण्यात येते की, आषाढी एकाद्शीस भगवान श्रीविष्णु हे झोपी जातात म्हणुन त्यांस शयनी एकादशी म्हणतात व कार्तिकी एकादशीस प्रबोधिनी एकाद्शी, कारण या दिवशी भगवान श्रीविष्णु जागे होतात म्हणुन म्हणतात.
आपल्या हिंदू संस्कृतीत ही एक गोष्ट मात्र नक्की आहे कि कोणत्याही रुढीला, परंपरेला काहीतरी एक कारण आहे किंवा त्यामागे एखादी गोष्ट आहे. त्याप्रमाणे या एकादशीबद्दल सुद्धा एक गोष्ट आहे. असे सांगितले जाते कि, मुदुमान्य नावाच्या राक्षसाने एकदा खूप मोठी तपश्वर्या भगवान शंकराची केली. भोळे शंकर भगवान त्याच्या कडक तपश्चर्येने प्रसन्न झाले व त्याला वर दिला की ’तु फक्‍त एका स्त्रीच्या हातून मरशील.’ राक्षसच तो मृदुमान्य या वरामुळे अधिकच उन्मत्‍त झाला त्याने सगळीकडे संहार चालु केला. त्याने सर्व देवतांना लढाईत पराभूत करुन टाकले. सर्व हरलेले देव शंकर भगवानांकडे गेले पण स्वता:च त्याला वर दिला असल्यामुळे, शंकरभगावानांचे त्याच्या पुढे काही चाले ना! सर्व देव एका गुहेत जाऊन लपले. त्या गुहेत सर्व देवता दाटीवाटीने बसले होते तेथे सर्वांच्या श्वासातुन एक देवता निर्माण झाली. तीचे नाव एकादशी. एकादशीने मृदुमान्य राक्षसाला ठार करुन सर्व देवतांची सुटका केली. सुटका झालेले देव परतत असताना पाऊसात सर्वांना स्नान घडले व गुहेत लपुन बसल्यामुळे त्यांना काही खायला मिळाले नाही, त्यामुळे उपसाव ही घडला. हिच परंपरा पुढे एकादशीच्या दिवशी रुढ झाली. म्हणजे एकादशीच्या दिवशी उपवास करण्याची.
एकादशीचे व्रत कसे साजरे करावे यासाठी आपल्या शास्त्रात सांगितले आहे कि सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्या कुलदेवते बरोबर विष्णूची पूजा करावी. पुजा करताना तुळशीची एक हजार किंवा एकशे आठ पाने वाहावीत, उपवास करावा. उपवास तुळशीपत्र घेऊन सोडावा. त्यादिवशी रात्री भजन-किर्तन करावे, हरी कथा श्रवण करावी. दुस-या दिवशी सूर्यादयानंतर पारणे सोडावे. ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षात येणा-या एकादशीला भाविक साधा पाण्याचा एक थेंब देखील घेत नाहीत. त्यामुळे या एकादशीला निर्जल एकादशी म्हणतात.
महीना आषाढ महिन्यातील एकादशी ही फार पवित्र मानण्यात येते. याला महाएकादशी असे म्हणतात. पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी मंडळी लांबचा प्रवास करुन पंढरपूरला येतात. आषाढी एकादशीस देहूहुन तुकाराम महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्‍तीनाथांची, पैठणहून एकनाथ महाराजांची, सासवडहून सोपानदेवांची, दहिठण्याहुन दहिठणकरांची तसेच उत्‍तर भारतातून संत कबीरांची पालखी निघते. या सर्व पालख्या व त्याबरोबर लाखोंच्या संख्येने येणारे वारकरी सर्व जण चंद्रभागेच्या तीरावर एकत्र जमतात. सर्व वारकरी टाळ-मृदुंगाच्या साथीने मुखी पांडुरंगाचे नाव घेत, लेकी-सुना, आया-बहिणी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत, तर कधी रस्त्यात फुगडी घालत, आपल्या पोराबाळांसह पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात. आषाढी एकादशीचा दिवस हा पवित्र दिन. या दिवसाची वाट पाहत विठ्ठल चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी खुप लोक पंढरपुरला येऊन निस्वार्थ भावाने जनसेवा करतात. विठ्ठल भक‍तीच्या ओढीने लोक एक प्रकारे पंढरपुरकडे खेचले जातात. या सर्व लोकांना बळ देणारी एक दैवी शक्‍ती अजूनही अस्तित्वात आहे याचा प्रत्यय आजही आषाढी एकादशीला पंढरपुरी आल्यावर येतो. अशी ही महापवित्र हिंदू संस्कृतीतील आषाढी एकादशी.

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा :

ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा विवाहीत स्त्रिया करतात, तीच वटपौर्णिमा होय. सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेमुळे या व्रताबद्दल महिलांना सविस्तर समजते. वडाच्या झाडाला पाणी घालून त्याच्याभोवती सूत गुंडाळणे आणि प्रदक्षिणा घालणे तसेच त्या दिवशी उपास करणे असे व्रत महिला करतात. प्रदिक्षणा घालताना ७ जन्म सौभाग्य राहावे, पतीची साथ लाभावी अशी प्रार्थना महिला या वेळी करतात.

पत्नीची पतिनिष्ठा आणि प्रेम सांगणारे हे व्रत वडाच्या झाडाशी जोडले आहे हे त्याचे वैशिष्ट्य. अनेक पिढ्यांना सोबत करणारे हे झाड दीर्घायुषी आहे. याचा वृक्ष होण्यास बरीच वर्षे लागतात. त्याची मुळे खोलवर जातात आणि वृक्षाचा पसारा प्रत्येक पारंबीद्वारे सतत वाढत जातो. वडाच्या पारंब्या, त्याचा चीक यात औषधी गुण आहेत, त्यामुळे त्याचे महत्त्व आहेच. अनेक पक्ष्यांना घरट्यात निवारा, चालून थकलेल्यांना झाडाखाली विसावा यासाठी वडाची छाया आधार देते. असे वृक्ष असणे निसर्ग-संतुलनाच्या दृष्टीने गरजेचे आहे. या व्रताच्या निमित्ताने महिलांचा संपर्क या समृद्ध-संपन्न अशा वृक्षाशी येतो.


सत्यवान आणि सावित्री यांची कथा:

सती सावित्रीची कथा महाभारतात आली आहे. पांडव वनवासात असतांना जयद्रथाने द्रौपदीचे हरण केले. जयद्रथाचा पराभव करून परतलेले युधिष्ठिरादी पांडव आणि द्रौपदी ऋषीमुनींसह बसले असतांना मार्कंडेय ऋषींनी सावित्रीची कथा सांगितली. प्रात:स्मरणीय अशा पंचकन्यांमध्ये जिचा समावेश आहे, अशा द्रौपदीला मुख्यत्वेकरून ही कथा सांगण्यात आली. त्यावरूनही सावित्रीचे महत्त्व लक्षात येते. आज असणार्‍या वटपौर्णिमेनिमित्त सती सावित्रीचे हे पुण्यस्मरण !

सत्यवानाची निवड

एके दिवशी देवर्षी नारद राजा अश्‍वपतीच्या राजसभेत आले. राजाने त्यांचा सन्मान केला. ते दोघे परस्परांशी संवाद करत असतांनाच सावित्री परत आली. सभेत येताच तिने आपल्या पित्याला व नारदांना वंदन केले. नारदांनी तिच्याकडे एकवार दृष्टीक्षेप टाकून राजाला विचारले, ``या कन्येचा विवाह अजून झाला नाही असे दिसते, याचे कारण काय ?'' तिला वरसंशोधनासाठी पाठवल्याचे राजाने नारदांना सांगितले आणि मधल्या काळात काय घडले, ते सावित्रीला कथन करण्यास सांगितले.
राजाच्या सांगण्यावरून सावित्री म्हणाली, ``शाल्व देशात द्युमत्सेन नावाचा एक प्रसिद्ध धर्मात्मा राजा होता. काही काळानंतर तो अंध झाला. त्याचा पुत्रही लहान होता. ही संधी साधून शेजारच्या राजाने त्याचे राज्य बळकावले. तेव्हा द्युमत्सेन आपल्या राणी व पुत्रासह वनात निघून गेला व तेथेच तपस्वी जीवन जगू लागला. त्याचा आता तरुण झालेला सत्यवान नावाचा पुत्र मला योग्य वर वाटला आणि त्यालाच मी मनाने वरले आहे.'' सत्यवानाच्या गुणांचे कौतुक करून नारद म्हणाले, ``या सत्यवानाचे मातापिता सत्यवादी असल्याने ब्राह्मणांनी त्याचे नाव सत्यवान ठेवले आहे. राजा, तरीही एक फार दु:खाची गोष्ट आहे, आजपासून एक वर्षाने सत्यवान मृत्यू पावणार आहे.'' आपल्या भावी पतीचे आयुष्य फक्‍त एक वर्षाचे आहे, हे कळूनही सावित्री विचलीत झाली नाही. ते पाहून नारद म्हणाले, ``राजा, तुझ्या मुलीची-सावित्रीची बुद्धी निश्चयात्मक आहे, म्हणून तिला कोणत्याही प्रकारे या निर्णयापासून विचलित केले जाऊ शकत नाही. सत्यवानात जे गुण आहेत, ते कोणत्याही दुसर्‍या पुरुषात नाहीत. म्हणून मलाही असेच वाटते की, तू त्यालाच कन्यादान करावे.''
एका शुभमुहूर्तावर सत्यवान-सावित्रीचा विवाहसंस्कार झाला. पतीगृही आल्यावर सावित्रीने आपली मौल्यवान वस्त्रे व अलंकार उतरवून ठेवले. तिची नम्रता, सेवा, संयम इत्यादी गुण पाहून सर्वांनाच संतोष झाला. मधुर भाषण, सेवेतील तत्परता, संयम आदी गुणांनी तिने सासू-सासर्‍यांना, तर मनोभावे सेवा करून पतीलाही प्रसन्न ठेवले. काही काळ आनंदात गेला.

सत्यवानाचे प्राणहरण
सावित्री मनाशी एक-एक दिवस मोजत होती. नारदांचे बोल तिच्या स्मरणात होते. जेव्हा तिच्या लक्षात आले की आजपासून चौथ्या दिवशी सत्यवानाचा अंतसमय आहे, तेव्हा तीन रात्री अगोदर तिने व्रत धारण केले. रात्रंदिवस ती अगदी स्थिर होऊन बसून राहिली. पतीच्या मृत्यूदिनाची आधीची रात्र तिने जागून काढली. दुसर्‍या दिवशी दैनंदिन कामे उरकून सूर्य आकाशात थोडा वर आल्यावर तिने अग्नीला आहुती दिल्या. सत्यवान हातात कुर्‍हाड घेऊन समिधा व फळे आणण्यासाठी वनात जाण्यास निघाला. सावित्रीही सासू-सासर्‍यांची अनुज्ञा घेऊन सत्यवानाबरोबर जायला निघाली. वनात काम करता करता सत्यवान सावित्रीला म्हणाला, ``मला थकवा आला आहे. मी आता झोपू इच्छितो.'' हे ऐकून सावित्री त्याच्याजवळ आली. भूमीवर बसून तिने त्याचे मस्तक मांडीवर घेतले. तितक्यात तेथे तिला एक पुरुष दिसला. त्याची वस्त्रे लाल असून त्याच्या डोक्यावर मुकुट होता. त्याचे डोळे लाल होते. हातात पाश होता व तो अत्यंत भयंकर दिसत होता. तो सत्यवानाजवळ उभा राहून त्याच्याकडेच पहात होता. त्याला पाहून सावित्रीने सत्यवानाचे मस्तक भूमीवर ठेवले व ती उभी राहिली. तिचे हृदय धडधडत होते. अतिशय दु:खी होऊन हात जोडून ती त्याला म्हणाली, ``आपण कोणी देवता आहात, असे मी समजते. आपली इच्छा असल्यास मला सांगा की, आपण कोण आहात व येथे काय करू इच्छिता ?'' ती देवता म्हणाली, ``सावित्री, तू पतिकाता व तपस्विनी आहेस. म्हणून मी तुझ्याशी बोलेन. मी यमराज आहे. सत्यवानाचे आयुष्य संपले आहे. हा धर्मात्मा गुणांचा सागरच आहे. त्यामुळे त्याला नेण्यासाठी मी स्वत: आलो आहे. आता मी याला पाशात बांधून घेऊन जाणार आहे.'' असे बोलून सत्यवानाच्या शरीरातून अंगुष्ठमात्र पुरुष आपल्या पाशात बांधून यमराज दक्षिणेकडे जाण्यास निघाले. तेव्हा दु:खाने व्याकुळ झालेली सावित्रीही त्यांच्यामागोमाग जाऊ लागली.

यमधर्माकडून पहिला वर
काही अंतर गेल्यावर यमराज म्हणाले, ``सावित्री, तू परत जा. आता याची उत्तरक्रिया कर. तू पतीसेवेच्या ऋृणातून मुक्‍त झाली आहेस. पतीबरोबर तुला जेथपर्यंत यायला पाहिजे, तेथपर्यंत तू आली आहेस.'' सावित्री म्हणाली, ``माझ्या पतीदेवांना जेथे नेले जाईल किंवा ते स्वत: जेथे जातील, तेथे मलाही गेले पाहिजे. हाच सनातन धर्म आहे. तपश्चर्या, गुरुभक्‍ती, पतीप्रेम, व्रताचरण आणि आपली कृपा यांमुळे माझी गती कोठेही थांबू शकत नाही.'' तिच्या या बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला सत्यवानाचे प्राण सोडून कोणताही वर माग म्हटले. या वेळी एकुलता एक पुत्र गमावलेल्या सासर्‍यांची मूर्ती तिच्या दृष्टीसमोर आली. तिने आपल्या सासर्‍यांसाठी दृष्टी, बल व तेज मागितले. यमराजांनी तिला `तथास्तु ।' म्हणून परत फिरण्यास सांगितले. सत्यवानाच्या मागे स्वत:चे काय होईल, याचा विचार न करता तिने आपल्या सासर्‍यांसाठी वर मागितला ! केवढा हा त्याग !!

यमधर्माकडून दुसरा वर
सावित्री यमराजाच्या मागे जातच राहिली. परत जायला सांगणार्‍या यमराजाला ती म्हणाली, ``जेथे माझे प्राणनाथ रहात आहेत, तेथेच मी असले पाहिजे. याशिवाय माझी आणखी एक गोष्ट ऐका. सत्पुरुषांचा तर एका वेळचा सहवासही अत्यंत लाभप्रद असतो. त्यापेक्षा त्यांच्याशी मैत्री होणे श्रेष्ठ आहे. सत्संगती कधीच वाया जात नाही म्हणून नेहमी सत्पुरुषांबरोबर राहिले पाहिजे.'' तिच्या या कल्याणकारी बोलण्यामुळे यमराजांनी तिला पतीचे प्राण सोडून दुसरी कोणतीही गोष्ट माग म्हटले. सावित्रीने आपल्या सासर्‍यांचे गेलेले राज्य त्यांना आपोआप प्राप्‍त व्हावे व त्यांनी आपल्या धर्माचा त्याग करू नये, हा वर मागितला. यमराजाने `तथास्तु ।' म्हणून तिला परत जाण्यास सांगितले. सासर्‍याने राज्यकारभार `धर्माने' करावा, या मागणीत तिची धर्मावरील अढळ निष्ठा दिसून येते !

दुहिता !
चालता-चालता सावित्री यमराजाला म्हणाली, ``सर्व प्रजेचे आपण नियमाने संयमन करून तिला इच्छित फळही देता, म्हणून आपण `यम' नावाने प्रसिद्ध आहात. म्हणून आता मी जे सांगेन ते ऐका. मन, वचन व कर्म यांनी सर्व प्राण्यांशी द्रोहरहित असणे, सर्वांवर कृपा करणे व दान देणे हा सत्पुरुषांचा सनातन धर्म आहे. अशा प्रकारचाच तर बहुतेक हा सर्व लोक आहे. सर्वच माणसे आपापल्या शक्‍तीप्रमाणे कोमलतेने वागतात; पण जे सत्पुरुष असतात, ते तर आपल्याजवळ आलेल्या शत्रूंवरही दया करतात.'' तिच्या या बोलण्यावर संतुष्ट होऊन यमराजांनी तिला तिसरा वर माग म्हटले. तिसर्‍या वराने सावित्रीने आपल्या पित्यासाठी १०० पुत्र मागितले. यमराजांनी तीही इच्छा पूर्ण करून तिला परत जायला सांगितले. सासू-सासर्‍यांचे कल्याण करून घेतल्यावर आपल्या वडिलांना आपल्या माघारी कोणीच संतान नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तर सत्यवानाबरोबरच जाण्याचा निर्णय मनोमन घेतला होता. कन्येला `दुहिता' म्हणतात. सासर आणि माहेर या दोघांचे हित साधणारी ती `दुहिता'! किती उत्तम प्रकारे तिने आपले कर्तव्य पार पाडले !

यमधर्माकडून चौथा वर
काही अंतर चालून गेल्यावर सावित्री यमधर्माला म्हणाली, ``पतिदेवांच्या सानिध्यामुळे मला हे अंतर काही जास्त जाणवत नाही. माझे मन तर फार दूर दूर धावत असते. म्हणून मी जे बोलणार आहे, ते ऐकण्याची कृपा करावी. आपण विवस्वान (सूर्य) यांचे पराक्रमी पुत्र आहात. म्हणून आपणांस `वैवस्वत' म्हणतात. आपण शत्रूमित्रादिक भेदभाव सोडून सर्वांचा समानतेने न्याय करता. त्यामुळेच सर्व प्रजा धर्माचे आचरण करते. त्यामुळे आपणास `धर्मराज' म्हटले जाते.'' याही बोलण्यावर प्रसन्न होऊन यमराजांनी सावित्रीला चौथा वर दिला. या वराने तिने तिच्या कुलाची वृद्धी करणारे बलवान व पराक्रमी असे १०० पुत्र मागितले. पहिल्यांदाच सावित्रीने स्वत:साठी काहीतरी मागितले ! यमराजांनी आनंदाने तिला हा वर दिला व म्हटले की, तू खूप दूरवर आली आहेस. आता परत जा.

यमधर्माकडून सत्यवानाचे प्राण परत मिळाले !
सावित्री यमधर्माबरोबर पुढे-पुढे जातच राहिली. ती म्हणाली, ``सत्पुरुषांची वृत्ती नेहमी धर्मातच रहात असते. ते कधी दु:खी किंवा व्यथित होत नाहीत. सत्पुरुषांशी सत्पुरुषांचा जो समागम होतो, तो कधीही निष्फळ होत नाही. सत्पुरुष सत्याच्या बळावर सूर्यालासुद्धा आपल्या जवळ बोलावून घेतात. ते आपल्या तपाच्या प्रभावाने पृथ्वीलाही धारण करतात. सत्यात राहिल्याने सत्पुरुषांना कधी खेद होत नाही. हा सनातन सदाचार सत्पुरुषांनी आचारलेला आहे, असे जाणून सत्पुरुष परोपकार करतात व परतफेडीकडे कधी दृष्टी ठेवत नाहीत.'' तिचे हे धर्मानुकूल वचन ऐकून यमाने पाचवा वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, ``हे धर्मराजा, आपण मला जो पुत्रप्राप्‍तीचा वर दिला आहे, तो दांपत्यधर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आता मी हाच वर मागते की, माझे पती जिवंत व्हावेत. यामुळे आपले वचन सत्य होईल. कारण पतीवाचून तर मी मृत्यूच्या मुखातच पडले आहे. पतीविना मला अन्य कोणत्याही सुखाची इच्छा नाही. स्वर्गाचीदेखील मला कामना नाही. प्रत्यक्ष लक्ष्मी आली तरी मला तिचीही आवश्यकता नाही. इतकेच नव्हे, तर पतीवाचून मी जिवंतही राहू इच्छित नाही. आपणच मला १०० पुत्र होण्याचा वर दिला आहे आणि तरीही आपण माझ्या पतीला घेऊन जात आहात. म्हणून मी जो हा वर मागितला आहे, त्यानेच आपले वचन सत्य होईल.'' हे ऐकून सूर्यपुत्र यमराज फार प्रसन्न झाले आणि त्यांनी `तथास्तु ।' म्हणत सत्यवानाचा पाश काढून घेतला. ते म्हणाले, ``हे कल्याणी ! घे, मी तुझ्या पतीला मुक्‍त केले आहे. आता हा सर्व प्रकारे निरोगी होईल. याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा तुझ्यासह चारशे वर्षे जिवंत राहील. धर्मपूर्वक यज्ञअनुष्ठान करून सर्व लोकांत कीर्ती मिळवेल. त्याच्यापासून तुला १०० पुत्र होतील !'' यमराज परत जायला निघाले. सावित्रीने त्यांना वंदन केले आणि त्यांनी केलेल्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. यमराज निघून गेल्यानंतर सावित्री सत्यवानाच्या अचेतन देहाजवळ आली. तिने त्याचे मस्तक पुन्हा आपल्या मांडीवर घेतले. हळूहळू सत्यवानाच्या देहात चैतन्य आले. तो उठून बसला ! आज अनेकांना हिंदु धर्मात सांगितलेले परलोक, परलोकांचा प्रवास आणि अन्य `सूक्ष्म' भाग प्रत्यक्षात आहेच, हे कळत नाही, पटत नाही. काहींना पटले तरी दिसू शकत नाही. येथे तर प्रत्यक्ष यमधर्माशी धर्मानुकूल संभाषण करून शीलवती, कुलवती, गुणवती सावित्रीने आपल्या पतीचे पंचप्राण परत आणले. प्रत्येक हिंदु पतिकातेच्या हृदयात अढळ स्थान मिळवणार्‍या सती सावित्रीला शतश: प्रणाम !


अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया : 
वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हटले जाते. हा दिवस शेतीच्या कामाला सुरुवात करण्याचा दिवस म्हणून महत्त्वाचा समजतात. या दिवशी नवीन कामे, व्यवसाय यांची सुरुवात करण्याची पद्धत आहे, हा उत्तम मुहूर्ताचा दिवस आहेच.
अखंड, क्षय नाही अशी तिथी म्हणजे अक्षय्यतृतीया. या दिवशी चांगले काम सुरू केले तर अखंडपणे सुरू राहते असे म्हणतात. साडे तीन मुहूर्ताचे दिवस मानले आहेत, त्यापैकी हा दिवस - अर्धा मुहूर्त आहे. दान, होम करणे आणि पुण्य मिळवणे या गोष्टी माणसाने या दिवसाशी जोडल्या आहेत. जे आहे ते साठवण्यापेक्षा दिल्याने आणखी मिळवता येईल असे या दिवसाचे महत्त्व पूर्वीपासून सांगितले गेले आहे.

चैत्रगौर


चैत्रगौर :

ऋतूप्रमाणे सुरू झालेल्या उत्सवात चैत्रगौर हा एक उत्सव. शंकर-पार्वती या देवतांची एक जुनी गोष्ट यासोबत जोडलेली आहे. चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा केली जाते. वसंत ऋतू म्हणजे झाडांना पालवी फुटण्याची, कैर्‍या येण्याची सुरुवात, आणि हरभरा तयार होऊ लागलेला असा हा काळ. म्हणून कैरी घालून, हरभर्‍याची डाळ भिजवून, ती वाटून केलेला खमंग पदार्थ, साखर-खोबरे, कैरीचे पन्हे असे पदार्थ या निमित्ताने करण्याची, आणि घरात स्त्रियांना बोलवून त्यांना हळदी-कुंकू लावून ते खायला देण्याची जुनी पद्धत आहे. स्त्रियांना एकत्र येण्यासाठी काही उत्सव सुरू झालेत आणि अजूनही ते घराघरात साजरे होतात, त्यापैकीच हा एक.

उन्हाळा सुरू असल्याने थंडावा देणारे कैरीचे पन्हे, झाडावर मोठ्या प्रमाणावर येऊ लागलेली सोनचाफ्याची फुले लोकांना देणे यातून निसर्गाशी जवळीक साधण्याची, सुगंधाचा आस्वाद घेण्याची मानसिकता दिसते. कैरीची चव घेण्याच्या निमित्ताने रसिकतेने निसर्गाला आठवण्याचा, एकत्र येण्याचा हा उत्सव असतो. 

काही घरांत पार्वती आपल्या माहेरी चैत्र महिन्यात एक महिनाभरासाठी येते आणि नंतरच तिची सासरी पाठवणी केली जाते असे मानून हा उत्सव साजरा केला जातो. 

शंकर - पार्वती यांना पार्वतीच्या घरी महिनाभर ठेवून घेतले होते. त्यांचा आदर-सत्कार केला होता, अशी कथा प्रचलित आहे. अशाच प्रकारे चैत्रात बसवल्या जाणार्‍या गौरीची महिनाभर घरात पूजा होते, नंतर गौर पुन्हा आपल्या घरी जाते असे समजतात. चैत्रगौर सर्व घरात साजरी होत नाही. विशिष्ट जातीतील लोकच या चैत्रगौरी बसवतात. सर्व समाजात ही प्रथा पाळली जात नाही


गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला
घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे
सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी
सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी
गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी
रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती
जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

श्री हनुमान जयंती



श्री हनुमान जयंती :
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी श्री हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. रामायण काळातील हनुमानाचा पराक्रम, त्याची रामावरची श्रद्धा, भक्ती, त्याचे ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे व्रत या सर्व गोष्टींची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस लोक साजरा करतात.  बलोपासना हा हनुमानाचा विशेष गुण होता.  व्यायाम करून शरीर निरोगी ठेवण्याकडेही लक्ष द्यायला हवे असे समर्थांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिले.  स्वत: बलोपासना करून श्री हनुमानाची सार्थ भक्ती करणार्‍या समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी श्री हनुमानाची स्थापना केली. या सर्व ठिकाणी श्री हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावात आपणास श्री हनुमान मंदिर आढळतेच. यांपैकी बहुसंख्य मंदिरांत हा उत्सव यथाशक्ति साजरा केला जातो.