Wednesday, April 7, 2010

नाते तुझेन माझे साताजन्मीचे

नाते तुझेन माझे साताजन्मीचे
जसे आकाशाशी इंद्र धनुश्यांचे
समुद्राशी जसे किनाऱ्याचे
अन तारयांशी जसे चंद्राचे

कधीच भासत नाही

स्वप्न जाणायला डोळ्यांची गरज
कधीच भासत नाही,
प्रेम आहे तुझ्यावर सांगायला
मित्रांची गरज लागत नाही

स्वप्नातील स्वप्ने.

स्वप्नातील स्वप्ने..
स्वप्नातच तुटली...
प्रेमाची नजर जेव्हा...
दुसरीकडे गेली....

डोळा का हा रडतो?

जातो म्हणतोस जेव्हा
डोळा का हा रडतो?
तुझ्या येण्याच्या आशेवरच
नव्या स्वप्नात अडतो..............

तुझ्या स्वप्नांतच आहे

तुझ्या स्वप्नांतच आहे
माझ्या डोळ्यांचे जगणे
देती नजर प्रेमाची जेह्वा
तुझ्या नात्याचे असणे.......................

डोळ्यांच्या जाळ्यात

डोळ्यांच्या जाळ्यात
मी हि पुरता अडकलो..
धोपट वाट सोडून..
आड वाटेत बहकलो.

तसा मी अडाणी

तसा मी अडाणी
एक अक्षर हि न कळे
मात्र वाचू शकतो
तुझे निरागस डोळे

डोळ्यातील अश्रू वाहताना..

डोळ्यातील अश्रू वाहताना..
तुझी मूर्ती अस्पष्ट होते...
समोर तू असताना...
अंतर धूसर होते ...
अंतर धूसर होताना..
डोळ्यांच्या कडा ओलावतात...
बाहुल्या हि हसतात
आणि मग ओठही थरथरतात..!!

मराठी उखाणे

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा...
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...!
............................................................
अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!
..............................................................
***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
............................................................
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

मराठी उखाणे

लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे




नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा 
.....च नाव आहे लाख रुपये तोळा


आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास




आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा


अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव -- आणि -- च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा




कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद


चान्दिच्या ताटात फणसाचे गरे  .....
राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे




नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात
----- चे नाव घेण्यास आजच केली सुरवात


आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद
----- चे नाव घेते तुम्हा सर्वाचा आशिर्वाद




दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात ....
साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात्


नान्दा सौख्य्भरे दिला सगल्यानि आशिरवाद्,
.....चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद्.




परातित परात चान्दिचि परात,
....राव हागले दारात, जाऊ कशि घरात


आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश




द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान


निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास




पाव शेर रवा पाव शेर खवा 
.... चे नाव घेते हजार रुपये ठेवा.


बारिक मणी घरभर पसरले,-----
साठि माहेर विसरले

हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
---रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी

सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
...रावाचे नाव घेते ...ची सुन

मंगळसुत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर, 
---रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,
.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास




थ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ------- ची जोडी

रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य ----- च्या सहीत


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट

भाग्याचे कुन्कु प्रेमाचा आहेर
रावांच्या मिठित विसरते मी माहेर

श्रावणात पडतात सरीवर सरी 
-----रवांच नाव घेताना मी होते बावरी 

ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
---- नाव घेते सौभाग्य माझे

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि ---- 
रावांचे नाव घेते ---च्या लग्नाच्या दिवशि