Wednesday, March 31, 2010

गुढीपाडवा

गुढीपाडवा : 

मराठी वर्षाचा पहिला दिवस - चैत्र शुद्ध प्रतिपदा - हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी उभारून, दाराला तोरण बांधून, गारवा देणार्‍या, औषधी असणार्‍या कडुनिंबाची कोवळी पाने गुढीसोबत बांधून गुढीची पूजा केली जाते. नवीन आलेल्या कोवळ्या बांबूला फुलांची माळ, नवे कोरे कापड (साडी इत्यादी), आणि गडू-तांब्या असे त्यावर बांधून सूर्योदयाला ही बांबूची काठी विजयाचा ध्वज म्हणून घरासमोर उभी करतात. सूर्यास्ताला पुन्हा पूजा करुन ती उतरवतात.

नवीन वर्षाचा हा दिवस उन्हाळ्याच्या सुरुवातीचा असल्याने औषधी असा कोवळा कडूनिंब, मीठ, सैंधव, जिरे, मीरे, ओवा एकत्र वाटून थोडेसे खाण्याची प्रथा आहे. नवे निश्र्चय, चांगल्या सवयींची सुरुवात करून हा दिवस साजरा करतात. पूर्ण वर्ष उत्साहात जावे यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा समजला जातो.

सर्वरोगपरिहारक असा कडुनिंब वृक्ष असल्याचे आर्यभिषक या प्राचीन ग्रंथात म्हटले आहे. जंतुनाशक अशा कडुनिंबाचे महत्त्व शास्त्रीय संशोधनानेही सिद्ध केले आहे. कमी पाण्यावर राहून दहा वर्षात वाढणारी ही झाडे हवा शुद्ध राखण्यासाठी महत्त्वाची आहेत. बी, साल, पाने असे पूर्ण झाड त्याच्या औषधी गुणांमुळे महत्त्वाचे आहे. वर्षातील पहिल्या दिवशी या महत्त्वाच्या झाडाची आठवण सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने करून दिली आहे.

रामायणात उल्लेख आहे त्यानुसार १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभु रामचंद्र गुढीपाडव्यादिवशी अयोध्येला परत आले. रावणाचा पराभव झाल्याने आणि राम अयोध्येत परतल्याने लोकांनी विजय साजरा केला. म्हणून हा दिवस आनंदाचा, चांगल्या कामाचा असे म्हटले जाते. चांगली वेळ म्हणजे मुहूर्त. गुढीपाडवा हा एक उत्तम मुहूर्त समजला जातो.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला (गुढीपाडव्याला) वसंत ऋतूची सुरुवात होते. सृष्टीला नवजीवन देणारा हा ऋतू आहे. आपल्या वर्षाची गणना करताना पहिला उत्तम दिवस असेही या दिवसाला म्हटले आहे. ‘प्रतिपदा’ या शब्दाचा अपभ्रंश पाडवा झाला असावा. गुढीमध्ये वापरलेल्या प्रतिकांचा विशेष उल्लेख करायला हवा. बांबूला अनेक वेळा नवे बांबू तयार करण्याची निसर्गाने शक्ती दिली आहे, तरीही तो लवचीक असतो त्याप्रमाणे आपल्यात ताकद यावी. वस्त्र, खण हे मंगलमय वातावरण आणते, काठीवर किंवा बांबूवर धातूचा गडू किंवा तांब्या पालथा असतो. या धातूमुळे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाने येणार्‍या प्रकाशलहरी खेचून घेण्याची शक्यता वाढते असे म्हणतात.

मराठी सण

महाराष्ट्र म्हटला म्हणजे सणांची पर्वणीच , तर मग घेऊ या आढावा आपण या सणांचा  .......



महाराष्ट्राची म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे जगण्यासाठीची मूल्ये, आचरणाचे नियम, रूढी, चाली-रीती, व्यवहार, आपली भाषा, सण, उत्सव, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, थोर व्यक्ती, परंपरा यांतून संस्कृती प्रत्येक नव्या पिढीकडे पोहोचते. बदलत्या काळाप्रमाणे येणार्‍या पिढीला त्यात काही फेरफार करावे लागतात, पण वागण्याचे नियम-मूल्ये यात मात्र मोठे बदल होत नाहीत. सण-उत्सव, प्रथा, परंपरा या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला वारशाने समजतात. त्याविषयीचे वाचन, अभ्यास औपचारिकपणे सर्व जण करत नसले, तरी मौखिक परंपरेने, अनुकरणाने, निरीक्षणाने त्या वर्षानुवर्षे सुरूच राहतात.

मुख्यत: शेतीप्रधान संस्कृती व ग्रामीण भागात वास्तव्य करणारी लोकसंख्या महाराष्ट्रात अधिक आहे. निसर्गाशी अगदी जवळचा संबंध असणारे कष्टकरी अत्यंत देवभोळे, श्रद्धाळू, पापभिरू असल्याने बर्‍याच व्रत-वैकल्यांत आणि उपचारांत समाधान व आनंद मानणारे आहेत. तसेच शिक्षित समाजही रूढी, परंपरा, सण-उत्सव यात कसा वेळ देतो, का वेळ देतो हेही समजून घेण्याजोगे आहे.

दैनंदिन कामातून थोडे वेगळे होऊन; नातलग, शेजारी, गावकरी, सहकारी यांच्या सोबतीने एकत्र येऊन आनंद साजरा करणे, या हेतूने महाराष्ट्रात अनेक उत्सव, सण साजरे केले जातात. हवामान, ऋतू आणि त्या-त्या ऋतूत असणारी फळे, फुले, झाडे, त्यांचा औषधी उपयोग याचा अभ्यास करून पूर्वापार हे सण-उत्सव, व्रतं पाळली जातात. आयुर्वेद-औषधी शास्त्र हे अतिशय प्रगत शास्त्र म्हणून उपयोगात आणले जात होते असेही त्यावरून लक्षात येते. वनौषधी, फुले ऋतूमानाप्रमाणे उगवतात व कोमेजतात. आपल्या सणावारात ऋतूमानाप्रमाणे येणार्‍या पिकांचाही फार विचार केलेला आहे असे लक्षात येते.

आचरणाचे नियम हेदेखील त्यामुळे निसर्गातील बदलांचा विचार करून ठरवलेले आहेत. आपल्या आहारात कोणते घटक केव्हा यावेत, कसे यावेत याचा अभ्यास पूर्वीपासून होत असावा. त्यामुळे बदलत्या हवेनुसार सणांना करण्याचे पदार्थही त्यादृष्टीने ठरवलेले आहेत. या अर्थाने खाद्यसंस्कृतीही सण-उत्सवांशी जोडल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

पारंपरिक पद्धतीने आज सण सर्वत्र साजरे होत नाहीत. त्यात व्यावहारिक अडचणीही आहेत. तरीही महाराष्ट्रात सण-उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे करणे, लोकांनी एकत्र येण्यासाठीचे माध्यम म्हणून आजही सुरू आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यांत, देशांत जाणारे लोक त्यांच्यासोबत त्या पद्धती घेऊन जातात. त्यामुळे अनेक मराठी सण-उत्सव जगाच्या कानाकोपर्‍यातही साजरे होतात असे दिसते.

जाती-धर्मात विभागलेल्या आपल्या समाजाला भेद-भाव विसरून एकत्र येण्यासाठी काही उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे करण्याची पद्धत आपल्या समाजसुधारकांनी शिकवली. उत्सवांचा समाज प्रबोधन करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम म्हणून वापर समाजसुधारकांनी केला.

काही धार्मिक चालीरिती लोकांत भेदभाव करणार्‍या, अंधश्रद्धा पसरवणार्‍या असल्याचे पाहून संतांनी एक प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. संत ज्ञानेश्र्वर,
संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गोरोबा,संत चोखामेळा, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, समर्थ रामदास यांनी समाजाला एकत्र येण्याची, भेदभाव विसरण्याची, समानतेची शिकवण दिली. काही उत्सव सामान्य जनतेला चांगल्या मार्गाने जगण्याची शिकवण देण्यासाठी, नीतीनियमांनी समाजाला बांधून ठेवण्यासाठीही सुरू केले. शिक्षणाने, विज्ञानाच्या प्रसार-प्रचारामुळे काही सण, उत्सव, चालीरिती यांचे स्वरूप आधुनिक काळात बदलत आहे. त्यात असणार्‍या अंधश्रद्धांना वगळून सण वा उत्सव साजरे व्हावेत, व्रतं पाळली जावीत हीच संतांचीही प्रबोधनाची चळवळ होती.

महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांमुळे आजही अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरण निराळे आहे. त्याला अध्यात्माची, तत्त्वज्ञानाची, इतिहासाची आणि मानवजातीच्या कल्याणाची सांगड घालून आपले सण-उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे. मानवाच्या कल्याणाचे, त्याच्या प्रगतीचे बीज घराघरात पोहोचवण्याचे काम त्यामुळे संस्कृतीच्या माध्यमातून होते असे दिसते.

‘संस्कृती’ या शब्दाला आलेला सध्याचा अर्थ फार वरवरपणे व्यवहारात वापरला जातो आहे. पण मुख्यत: उन्नत समाजासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आणि व्यापक समाजहितासाठी असलेले आचार-विचार-विहाराचे व्यक्तीसाठीचे नियम, शिष्टाचार यांसाठी वापरलेला शब्द म्हणजे ‘संस्कृती’.

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत आपले सणवार, व्रतं आणि उत्सवदेखील ऋतुमानाप्रमाणे - सूर्य-चंद्र-ग्रहस्थितीच्या अनुसार -ठरलेले आहेत.


मराठी दिनदर्शिकेत असणारे १२ महिने हे सूर्याच्या स्थितीनुसार होणार्‍या बदलांना अनुसरून येणार्‍या ऋतूंप्रमाणेच ठरले आहेत. पुढे महिने व ऋतू दिले आहेत.





महिने ऋतू हवामान
चैत्र-वैशाख वसंत उन्हाळा सुरू होतो.
ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म उन्हाळा संपतो
श्रावण-भाद्रपद वर्षा पावसाळा सुरू होतो.
अश्र्विन-कार्तिक शरद पावसाळा संपतो.
मार्गशीर्ष-पौष हेमंत थंडी सुरू होते.
माघ-फाल्गुन शिशिर थंडी संपते.





मराठी दिनदर्शिकेनुसार ग्रहस्थितीप्रमाणे - पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या स्थानाप्रमाणे - कालमापनाच्या पद्धती ठरल्या. त्याप्रमाणे तिथीला मराठी दिनदर्शिकेत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सण-दिवस हे तिथीनुसार ठरलेले दिवस - तेही निसर्गावर आधारित असेच आहेत.

भारतात कालमापनासाठी फार पूर्वापार चालत आलेली पंचांग पद्धती आजही उपयोगात आणली जाते. धर्मशास्त्रांसंदर्भातील ग्रंथांतून त्याबद्दलचे संदर्भ सापडतात. सण-उत्सव हे त्या पंचांगानुसार ठरवण्याची प्राचीन पद्धत आहे. पूर्वी मोजक्या शिक्षित - ब्राह्मण जातीच्या लोकांपुरते असलेले हे ज्ञान आता शास्त्ररूपात, गणिती पद्धतीने सर्वच लोकांसाठी खुले आहे. त्यानुसार सण-उत्सव ठरून ते छापील पद्धतीने सर्वांसाठी उपलब्ध असतात. २७ नक्षत्रे, १५ तिथी, ७ वार, २७ योग असे पंचांग भारतात इसवीसनपूर्व ४०० वर्षांपासून प्रचलित असावे असे संदर्भ मिळतात.

शालिवाहन राजाच्या नावावरून सुरू झालेली ही कालगणनेची पद्धत फारशी प्रचलित नाही. परंतु मराठी वर्षाची सुरुवात मात्र आजही साजरी केली जाते. चैत्र हा मराठी कॅलेंडरमधील (दिनदर्शिकेतील) महिना. इंग्रजी महिन्याशेजारी प्रत्येक दिनदर्शिकेत त्याला (व इतर सर्व मराठी महिन्यांना) स्थान मिळालेच आहे. या विभागात प्रत्येक मराठी महिन्यात येणारे सण-उत्सवांची माहिती दिलेली आहे.

मुख्य शहरे

    * मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे कायम येत असतात कारण येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

    * पुणे - शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. हे शहर शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे. येथील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकण्यास भारत व जगभरचे विद्यार्थी येतात.

    * नागपूर - विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.

    * औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.

    * नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
    * कोल्हापूर- शिवकालापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे.

    * सोलापूर- दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. अस्ताला गेलेल्या कापड गिरण्यांसाठी प्रसिध्द. येथिल सिध्देश्वराचे मंदिर प्रसिध्द.

वाहतूक व्यवस्था

भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक
भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी गाड्यादेखिल सेवा पुरवतात.

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे. नागपूर व पुणे विमानतळांवरुन देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखिल होतात. औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर व सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे. मुंबई-नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई, न्हावा-शेवा व रत्नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग

महाराष्ट्रातील लोकजीवन

महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २००१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९,६७,५२,२४७ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुस-या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणा-यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३२२.५/१ कि.मी.२ इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.०३ कोटी पुरुष व ४.६४ कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९२२ महिला इतका आहे. ७७.२७% (पु-८६.२%, स्त्रि-६७.५%) लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर हिंदी व इंग्लिश शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी तर दक्षिण कोकणात मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'व-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.

राज्यात ८०.२% हिंदू, १०.६% मुस्लिम, ६% बौद्ध, १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यू व पारशी धर्मीय देखिल आहेत.

महाराष्ट्राचे भौगोलिक महत्व

महाराष्ट्र  (अर्थ:महान राष्ट्र) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई, देशातील सर्वात मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.


महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके आहे.
विस्तार - महाराष्ट्राची पुर्व-पश्र्चिम जास्तीत जास्त लांबी ८०० कि. मी. आणि उत्तर-दक्षिण जास्तीत जास्त लांबी ७०० कि.मी. आहे.

क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा राजस्थान, मध्यप्रदेशनंतर भारतात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी (३२,८७,२६३ चौ. कि.मी.) ९.३६ % इतका हिस्सा महाराष्ट्राने व्यापला आहे.

महाराष्ट्राच्या वायव्येस-गुजरात राज्य, दादरा व नगर हवेली , उत्तरेला -मध्य प्रदेश, पूर्वेस - छत्तीसगड, आग्नेयेस - आंध्रप्रदेश, दक्षिणेस - कर्नाटक आणि अगदी दक्षिणेस - गोवा राज्य आहे. राज्याच्या पश्र्चिम सीमेलगत अरबी महासागर पसरलेला आहे. 

महाराष्ट्रातील किल्ले


महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे. त्याच भूगोलात आणि इतिहासात भर घालणारे किल्ले महाराष्ट्राची शान आहेत.



अंकाई
अंजनवेल
अंजनेरी
अंतुर किल्ला
अंबागड
अंमळनेरचा किल्ला
अकोला किल्ला
अचला
अजिंक्यतारा
अर्नाळा
अलंग
अलिबाग - हिराकोट
अवचितगड
अशेरीगड
अहिवंत



आंबोलगड
आजोबागड
आमनेरचा किल्ला
आसवगड



इंद्राई
इरशाळगड



उंदेरी किल्ला



औंढ



कण्हेरगड
कमळगड
कर्नाळा
कल्याणगड
कानिफनाथ गड
काळदुर्ग
कावनई
किल्ले पुरंदर
कुर्डूगड - विश्रामगड
केंजळगड
कोतळीगड
कोरीगड - कोराईगड
कोर्लई
कोहोजगड



खांदेरी किल्ला



गाविलगड
गुणवंतगड
गोंड राजाचा किल्ला
गोरखगड



घनगड



चंदन - वंदन
चंदेरी किल्ला
चांभारगड
चावंड




जंजिरा
ज पुढे.
जीवधन




तळगड
तारामती (किल्ला)
ताहुली
तिकोना
तुंग
तोरणा
त्रिंगलवाडी




थाळनेर किल्ला




दातेगड
दुर्ग - ढाकोबा
दौलताबाद




धोडप




नगरधन
नरनाळा किल्ला
नळदुर्ग
न्हावीगड




पट्टागड
पन्हाळा
परांडा किल्ला
पवनीचा किल्ला
पांडवगड
पारोळयाचा किल्ला
पेठ किल्ला
पेब
प्रचितगड
प्रतापगड
प्रबळगड
प्रबळगड - मुरंजन




बल्लारशा
बहादरपूर किल्ला
बहिरगड
बहिरी - गडदचा बहिरी
बाळापूर किल्ला
बिरवाडी




भामेर किल्ला
भारतातील किल्ले
भूदरगड
भैरवगड




मदनगड
मलंगगड
मल्हारगड
महाराष्ट्रातील किल्ले
महिपतगड
महिमानगड
मांगी - तुंगी
माणिकगड
माहुलीगड
 मुरुड जंजिरा
मुल्हेर
मोरागड




रत्नदुर्ग
रसाळगड
राजगड
राजधेर
राजमाची
रायकोट
रायकोट किल्ला
रायगड (किल्ला)
रायरीचा किल्ला
रायरेश्वर
रोहीडा
रोहीदास (किल्ला)




लळिंग किल्ला
लिंगाणा
लोहगड




वर्धनगड
वसंतगड
वसईचा किल्ला
वारुगड
वासोटा
विजयदुर्ग
विशाळगड
विसापूर
वैराटगड




शिरगावचा किल्ला
शिवनेरी




संतोषगड
सज्जनगड
सप्तशृंगी
सरसगड
सांकशीचा किल्ला
साचा:महाराष्ट्रातील किल्ले
सानगडीचा किल्ला
साल्हेर
सिंधुदुर्ग
सिंहगड
सिताबर्डीचा किल्ला
सिध्दगड
सुधागड
सुमारगड
सोनगिर किल्ला




हडसर
हरगड
हरिश्चंद्रगड
हातगड

चकोर

माझी तहान सरेना
गेली कोठे चंद्रकोर
एका अक्षराच्यासाठी
माझी कविता चकोर

तुकयाच्या पुढे माझे
थिटे युध्दाचे प्रसंग
इंद्रायणीच्या गाळात
माझे रुतले अभंग

दुरावली मायबोली
जीव कासावीस झाला
अमृताशी पैजा घेत
माझा व्यापार बुडाला


************

डॉ. राजा दीक्षित,
२, भालचंद्र हाइट्स,
८४७ सदाशिव पेठ,
पुणे ४११०३०
दूरध्वनी : २४४७७८३७

काळ्या मातीत मातीत तिफन चालते

काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते, तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो,
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो

सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाकतो मैना वाटुली पाहते

सर्जा रं माझ्या ढवळ्या रं माझ्या पवळ्या रं माझ्या

झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जिवा व्हते पारखी साऊली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हा जोंधळ्यात तवा सोनं चांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते

चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काट पायांत रुततो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं




गीत - विठ्ठल वाघ

संगीत - अनिल-अरुण

स्वर - अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर

चित्रपट - अरे संसार संसार (१९८१)