Tuesday, April 6, 2010

औरंगाबाद

महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. ते मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ - इ.स. १७०७) ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून त्याच्या मृत्यूनंतर ठेवले गेले असावे. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर आहे.


इतिहास
औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे छोटसे ग्राम वसलेले होते. काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले. मलिक अंबरने ह्या शहराचे नाव फतेहपूर ठेवले. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी / फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्र्याला परत गेला. त्या नंतर १६८१ मध्ये औरंगजेब मुघल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगाबाद शहराजवळ असणार्‍या खुलताबाद या छोट्याश्या गावात औरंगजेबाची कबर आहे. १७०७ नंतर औरंगाबादचा ताबा पुढे हैदराबादच्या निझाम राजवटीचा भाग म्हणून राहिले. इ.स. १८८९ मध्ये औरंगाबादेत पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅलि रेल्वेची सुरवात झाल्यानंतर इ. स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनींग कारखाने सुरु झाले


भुगोल
भौगोलिकदृष्ट्या औरंगाबाद अक्षांश उत्तर 19° 53' 47" - रेखांश पूर्व 75° 23' 54" याठिकाणी वसलेले आहे. शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगररांगांनी वेढलेले आहे.


तापमान: औरंगाबादचे वार्षिक तापमान ९ ते ४० अंश सेल्सीअसदरम्यान असते. शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्चदरम्यान आहे


पर्जन्यमान: पडत असलेल्या पावपैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो साधारणपणे ९.० ते
६९३ मिलीमीटर/महिना हे पावसाचे प्रमाण असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७२५ मिलीमीटर असते.


नाट्यचळवळ
औरंगाबाद हे अनेक वर्षांपासून नाटकात महत्वाचे स्थान राखून आहे. बालनाटकात सूर्यकांत सराफ यांनी अनेक वर्षे सातत्याने काम केले. "शिल्पकार" या संस्थेने लहान पणापासून् नाटकाच्या विविध अंगांची ओळख व्हावी म्हणून् निवासी शिबीरे आयोजीत केली. या शिबीरात १० दिवसात मुला-मुलींना अनेक प्रयोग शिकवले जातात. शिबीराला आतापर्यंत अनेक मान्यवरांनी नुसती भेटच दिलेली नाही तर त्यांनी ३/४ तास मार्गदर्शनही केले आहे. प्रशांत दामले,दिलीप प्रभावळकर,राजदत्त,चित्तरंजन कोल्हटकर,सचिन बर्वे,मुक्ता बर्वे, अजित दळवी अशा व अजून अनेक मान्यवरांनी मुलांना ३/४ तास मार्गदर्शन् केले आहे. अजित दळवी यानी अखिल महाराष्ट्रात गाजलेली काही नाटके लिहीली, अलिकडे त्यांनी "कायद्याचे बोला" या चित्रपटाची पटकथा लिहीली. प्रतिक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी अशा कलावंतानी आधी औरंगाबादला सुरूवात केली आणि मग ते मुंबईला चमकले. त्याआधी, कुमार, आलोक चौधरी, विजय दिवाण,त्र्यंबक महाजन अशा अनेक कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार राज्य नाट्य स्पर्धा गाजवलेल्या व अनेकदा जिंकल्याही.


अर्थव्यवस्था

गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रिकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबादच्या जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅंडर्ड सिल्कमिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादेमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरु झाल्या.


उद्योगधंदे

स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, बिअर आणि व्हिस्की, चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादेतील प्रमुख उत्पादने होत. निर्लेप , लुपिन लॅबोरेटरी, ग्रिव्ह्स कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिस्टर्स ,औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमुहांचे प्रकल्प औरंगाबादेत आहेत. वानगीदाखल त्यापैकी काहींची नावे अशी
  • व्हिडीओकॉन
  • श्कोडा ऑटो
  • वोक्हार्ट
  • जॉन्सन एंड जॉन्सन
  • झीमन्स
  • गुडईअर
  • बजाज ऑटो
  • कोलगेट-पामोलिव्ह
  • केनस्टार
  • एंड्रेस ह्युजर



विद्यापीठ
औरंगाबाद शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहाते.


अभियांत्रिकी
    * शासकिय अभियांत्रिकी महविद्यालय
    * मराठवाडा प्राद्यौगिकी संस्था
    * म.गा.मि. जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महविद्यालय
    * पी.ई.एस. अभियांत्रिकी महविद्यालय
    * हायटेक इंस्टीटूट आफ टेक्नोलॉजी, अभियांत्रिकी महविद्यालय

वैद्यकीय

  • शासकीय वैद्यकीय महविद्यालय
  • म.गा.मि. वैद्यकीय महविद्यालय
  • शासकीय दंतविद्या महाविद्यालय
  • भगवान होमियोपेथिक महाविद्यालय
  • फोस्टर डेव्हलपमेंट होमियोपेथिक महाविद्यालय्
  • वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी

कला, वाणिज्य आणि विज्ञान

  • सरस्वती भुवन महविद्यालय
  • देवगिरी महविद्यालय
  • विवेकानंद महविद्यालय
  • पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालय
  • डॊ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
  • मौलाना आझाद महाविद्यालय
  • वसंतराव नाईक महाविद्यालय
  • छत्रपती शिवाजी महाविद्यालय
  • मिलिंद महाविद्यालय
  • शासकीय महाविद्यालय
  • माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय
  • महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय
  • मराठवाडा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी

मॅनेजमेन्ट कॉलेज

  • मराठवाडा इन्स्टीटयूट ऑफ मॅनेजमेन्ट & रिसर्च
  • महात्मा गांधी मिशन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
  • राजर्षी शाहू इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
  • देवगिरी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
  • मौलाना आ़झाद इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
प्रेक्षणीय स्थळे
    * अजिंठा लेणी
    * वेरूळ लेणी
    * घृष्णेश्वर मंदिर (ज्योतिर्लिंग)
    * दौलताबादचा किल्ला
    * बीबी का मकबरा
    * औरंगाबाद लेणी (बौद्ध)
    * पाणचक्की
    * व्हॅली ऑफ सेन्ट्स ¥1
    * खुल्ताबाद
    * दरवाजे ¥2
    * गौताळा अभयारण्य
    * म्हैसमाळ
    * संत ज्ञानेश्वर उद्यान
    * पैठण
    * जायकवाडी धरण पक्षी अभयारण्य

'संयुक्त महाराष्ट्र'ची वेबसाइट 'हॅक'


सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 07, 2010 AT 12:15 AM (IST)
मुंबई - महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव काही दिवसांवर आलेला असतानाच व ज्यांच्या बलिदानातून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्या लढ्याच्या स्मृती जागविणारी "संयुक्त महाराष्ट्रा'ची वेबसाईटच "हॅक' झाली आहे. या वेबसाईटवर मराठीऐवजी जपानी भाषा येत असून या वेबसाईटवरून मराठी भाषाच हद्दपार झाली आहे. शिवसेनेचे वरळी विधानसभा उपविभागप्रमुख अरविंद भोसले यांनी पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत यासंबंधीची लेखी तक्रार दिली आहे.

राज्याच्या सुवर्णमहोत्सवाबाबत विदेशात राहणाऱ्या मराठीजनांना महाराष्ट्राच्या निर्मितीविषयी माहिती मिळण्याचे हे एकमेव संकेतस्थळ होते. मात्र तेही हॅकर्सनी "हॅक' केले आहे. http://www.samyuktamaharashtr.org या माहिती केंद्रावर संयुक्त महाराष्ट्राचा लढा व हुतात्म्यांच्या माहितीऐवजी वर्कडेक्‍स नामक संकल्पनेबाबत काहीतरी लिहिलेले आहे. या वेबसाईटवरील संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची माहिती हॅक करून त्याऐवजी जपानी चित्रलिपीतील मजकूर आढळून येतो. हा मजकूर तपासण्यासाठी गूगलवरील इंटरनेट सुविधेचा वापर करून या मजकुराचे भारतीय भाषेत भाषांतर करून पाहिले असता या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राचा लढा व हुतात्म्यांच्या माहितीऐवजी "वर्कडेस्क' नामक संकल्पनेबद्दल काही तरी लिहिलेले आढळले. अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हॅकिंगचा हा प्रकार काही दिवसांपूर्वीच घडला असून राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला काही मराठीप्रेमींनी व्यक्तिशः कळविले होते; मात्र या विभागाने लक्ष दिले नाही, असा आरोप भोसले यांनी तक्रारीत केला आहे.

संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ काही दिवसांवर आलेला असतानाच राज्य सरकार आणि व संबंधित विभाग उदासीन असल्याबद्दलही भोसले यांनी खंत व्यक्त केली आहे. याबरोबरच केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर (http://india.gov.in) जुलमी मुघल सुलतानीचा, औरंगजेबाचा पानेच्या पाने भरून उदोउदो केला आहे. मात्र, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच महाराणा प्रतापसिंहांचा जाज्वल्य इतिहासाबद्दल एक शब्दही लिहिलेला नाही, असेही या तक्रारीत म्हटले आहे

नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह जानेवारीतच गाडले

मुंबई - कसाबसोबत मुंबईवर हल्ला केलेल्या नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह जानेवारी महिन्यातच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकण्यात आले असल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधान परिषदेत केली. पाकिस्तानने महाराष्ट्राच्या भूमीवर अतिरेकी कारवायांचा प्रयत्न केला तर अतिरेक्‍यांना महाराष्ट्राबाहेर जाऊ न देता येथेच गाडले जाईल, असा इशारा त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिला. आपल्या खात्यात कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर पदावर राहणार नाही. आपल्याला गृहमंत्रिपदाचा मोह नाही, असे त्यांनी आपल्या घणाघाती भाषणात स्पष्ट केले.

पुण्यातील जर्मन बेकरी प्रकरणातील आरोपी कोण याची ओळख आम्हाला पटली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेवर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, ""अतिरेक्‍यांचे मृतदेह सांभाळण्यासाठी व कसाबसाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते अशी आमच्यावर टीका होते, पण या नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह कोणताही अवमान होऊ न देता जानेवारीतच गाडून टाकण्यात आले आहेत. सुमारे 40 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे हे काम केले व अजूनपर्यंत प्रसिद्धिमाध्यमांना त्याचा पत्ता लागू दिला नाही. पोलिस एखादी गोष्ट गुप्त ठेवतात का, हे मला तपासून पाहायचे होते. ज्या वेळी पत्रकार शवागाराच्या ठिकाणी माहिती घ्यायला जात, त्या वेळी त्याबाहेरील लाल दिवा चालू ठेवला जात असे.''

पाकिस्तानचा पैसा, शस्त्रे व अन्य मदत घेऊन महाराष्ट्राची परीक्षा घेण्याचे काम अतिरेक्‍यांनी करू नये. आपल्या कारवायांत काही प्रमाणात त्यांना यश मिळाले तरी त्यांना येथेच गाडले जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना दिला. कसाबबाबतही न्यायालयाचा निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे येईल. पुण्यातील जर्मन बेकरीबाबत केंद्रीय गुप्तचर विभागांनी ऍलर्ट दिला नव्हता. लाल देऊळ व छावड हाऊस याबाबत इशारा होता व तेथील सुरक्षा वाढविली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगून गृहमंत्री म्हणाले, केंद्रीय संस्थांनी ऍलर्ट दिला, म्हणजे त्यांची जबाबदारी संपली काय? अतिरेकी समुद्र मार्गाने येणार असतील, तर नौदल, तटरक्षक दलाची जबबादारी आहे. हवाई मार्गाने आले, तर हवाई दलाची आणि अन्य मार्गांनी आले तर सीमा सुरक्षा दलाची. अतिरेक्‍यांचा मुकाबला कायदा व सुव्यवस्थेसाठी असलेल्या पोलिसांनी करण्याची अपेक्षा कशी ठेवायची? केंद्राच्या ऍलर्टबाबत गृह सचिवांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


गोकुळाष्टमी


गोकुळाष्टमी :
श्रावणातील कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्माचा उत्सव करून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचे स्मरण करून, एकत्र येऊन उपवास करून भाविक हा दिवस साजरा करतात.  दुसर्‍या दिवशी ठिकठिकाणी उंचावर मडक्यात दही ठेवून, मडके दोरीने उंचावर बांधतात. तरुणांनी एकमेकांच्या आधाराने मानवी मनोरा करून ते मडके (हंडी) फोडण्याची एक प्रथा आहे. त्याला ‘दहीहंडी’ म्हणतात. अलीकडे ‘दहिहंडी’ हा एक `आंतरराष्ट्रीय इव्हेंट' बनला आहे. मानवी मनोरा करणारे, हंडी फोडणारे ‘गोविंदा’ यांची फार चढाओढ सुरू झाली आहे. हौस, दंगा, आनंदोत्सव याबरोबरच त्याला स्पर्धा, प्रसिद्धी, प्रायोजक या माध्यमांतून व्यवसायाचे रूपही येऊ लागले आहे. तरुणांची संघटित शक्ती ही या उत्सवाची प्रमुख जमेची बाजू आहे. मुंबई हे या उत्सवाचे मोठे, प्रमुख केंद्र होय.

श्रीकृष्ण म्हणजे खट्याळ, खोडकर, दही-दूध-लोणी चोरून खाणारा अशी त्याची प्रतिमा पिढ्या-न-पिढ्या सांगितली जाते. अनेक गाणी-गोष्टी त्याच्या या लीलांवरच रचलेल्या आहेत. श्रीकृष्णाने त्याच्या सवंगड्यांसह, मनोरे करून दही-दूध-लोण्याच्या हंड्या फोडल्याच्या कथा प्रचलित आहेत. अशा श्रीकृष्णाची-दुष्टांचा संहार करणार्‍या श्रीकृष्णाची-आठवण करण्याचा हा दिवस. काही कथांमुळे श्रीकृष्णाची प्रतिमा लहानपणापासून प्रत्येकाच्या मनात तयार होते. तरुणांनी चपळाईने, संघटितपणे उंचावरचे दही खाली काढण्याच्या निमित्ताने साहसी वृत्ती जागवावी अशाही पद्धतीने या उत्सवाकडे पाहिले जाते.

गायी-वासरे चरण्यासाठी रानात आणि पाण्यासाठी यमुनेच्या तीरावर घेऊन जाणारे सर्व गो-पालक आपापले खाद्यपदार्थ एकत्र करून मजेत खात असावेत अशी कल्पना केली जाते.  हाच गोपाळकाला होय. `गोकुळअष्टमी' च्या दिवशीच संध्याकाळी मंदिरांत काल्याचे कीर्तन असते. नंतर प्रसाद म्हणून पोहे-काकडी-डाळ-दाणे-चुरमुरे असे एकत्र करून प्रसाद म्हणून वाटले जाते. प्रत्येकाने एक एक पदार्थ नेऊन, सर्वांचे पदार्थ एकत्र करून अनेक ठिकाणी रात्रभर भजन करण्याचीही प्रथा आहे. गोपाळकाला करून हा प्रसाद सर्वांना दिला जातो.

गोकुळाष्टमीची महिमा 
दर वर्षी आपण गोकुळाष्टमीला कृष्णजन्म उत्याहाने साजरा करतो. श्रीकृष्ण हा वेगवेगळ्या कारणांनी सगळ्यांनाच खूप आवडणारा, अगदी आपलासा वाटणारा देव आहे. तसा तो भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. मत्स्य, कूर्म व वराह या पशूंच्या रूपातील पहिल्या तीन अवतारांबद्दल कोणाला फारसे कांही ठाऊक नसते. नृसिंह आणि वामनावतार थोड्या वेळेपुरते प्रकट झाले आणि कार्यभाग संपताच ते अदृष्य होऊन गेले. सांगता येण्यासारखे असे त्यांचे चरित्र नाही. परशुराम आपल्या जमदग्नी या पित्यासारखाच शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध झालेला असल्यामुळे त्याच्याबद्दल प्रेमाहून भीतीच जास्त वाटते. राम अवतार सर्वगुणसंपन्न आणि आदर्श असे व्यक्तीमत्व आहे. त्याचे संपूर्ण चरित्र हा आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा असे वाटते, पण सर्वसामान्य माणसाला ते जमणे कठीण आहे. गोपालकृष्ण मात्र आपल्यासारखा वाटतो. त्याच्या लडिवाळ बाललीला, मस्करी, वात्रटपणा, सवंगड्याबरोबर खेळ खेळणे, गोपिकांबरोबर रास रचणे, पांडवांना समजुतीच्या गोष्टींचे सल्ले देणे हे सगळे मानवी वाटते.


कृष्ण हा विविध वयोगटातल्या आणि मनोवृत्तीच्या लोकांना आवडतो कारण इतक्या वैविध्यपूर्ण घटना त्याच्या चरित्रात आहेत. व्यासमहर्षींनी ते फारच कौशल्याने रंगवलेले आहे. मानवी स्वभावाचे दर्शन आणि चमत्कार यांचे एक अजब मिश्रण त्यात आहे. त्याच्या जन्माची कथा अद्भुतरम्य आहे. कंसाचे निर्दाळण करण्यासाठी त्याचा शत्रु देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे अशी पूर्वसूचना त्याला मिळते आणि त्याचा जन्मच होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न तो करतो. त्या सर्वांवर मात करून कृष्ण जन्म होतोच. त्या नवजात शिशूचा जीव वाचवण्यासाठी त्याचा पिता जे प्रयत्न करतो त्याला सर्वोपरीने सहाय्य मिळत जाते. त्याच्या हातापायातील शृंखला गळून पडतात, कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडतात, रखवालदार गाढ झोपी जातात, मुसळधार पावसातून वाटचाल करत असतांना प्रत्यक्ष शेषनाग आपल्या फण्याचे छत्र त्याच्या माथ्यावर धरतो. दुथडीने वाहणारे यमुना नदीचे पाणी ओसरून त्याला पलीकडे जायला वाट करून देते. गोकुळात गेल्यावर नंद यशोदा निद्रितावस्थेत असतात, पण त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असतो. अशा प्रकारे सर्व अडचणी एक एक करून दूर होत जातात आणि बाल श्रीकृष्ण सुखरूपपणे गोकुळात जाऊन पोचतात. ही कथा किती सुरस आहे पहा! देव आहे म्हणून तो एकदम वसुदेव देवकींना त्यांच्या त्रासातून मुक्त करत नाही की इकडे अदृष्य होऊन तिकडे प्रगट होत नाही.
त्यानंतरसुद्धा आपला शत्रु जन्माला आला आहे आणि गोकुळामध्ये तो वाढतो आहे याची जाणीव कंसाला होते आणि त्या मुलाला मारून टाकण्याचे अनेक उपायसुद्धा तो करतो, पण ते सफळ होत नाहीत. यातसुद्धा कृष्णाला मारायला आलेल्या दुष्टांना तो कोठल्याही शस्त्राने न मारता त्यांचाच डाव त्यांच्या अंगावर उलटवतो. त्याला आपले विषारी दूध पाजून मारायला आलेल्या पूतनामावशीचे दूध पितापिताच तो तिचे प्राण शोषून घेतो तर पाण्यात पडलेला चेंडू आणायचे निमित्य करून यमुनेच्या डोहात मुक्काम करून बसलेल्या कालिया नागाच्या फण्यावर नाचून त्याला चेचून काढतो आणि तिथून निघून जायला भाग पाडतो. अखेरीस कंस त्याला मुष्टीयुद्धाच्या खेळात भाग घेण्याचे आमंत्रण देतो. "मर्दका बच्चा होगे तो खुलकर सामने आ।" वगैरे संवाद हल्लीच्य़ा हिंदी सिनेमात असतात तशा प्रकारे दिलेले हे आव्हान स्वीकारून कृष्ण मल्लयुद्धाच्या आखाड्यात उतरतो. डब्ल्यू डब्ल्यू एफ् सारख्या या फ्रीस्टाईल कुस्त्यांना त्या काळात पंच नसत. प्रतिस्पर्ध्याने हार कबूल करेपर्यंत त्याला झोडत रहायचे असाच नियम होता. त्यात कृष्णाचा जीव जाईपर्यंत त्याला झोडपायचा आदेश कंसाने आपल्या आडदांड मल्लांना दिला होता. इथेही तशाच प्रकाराने कृष्णाने त्यांनाच लोळवले. इतकेच नव्हे तर कंसालाही ललकारून त्याचा जीव घेतला. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट दाखवली आहे. ती म्हणजे गैरमार्गाने मिळवलेल्या राज्यसत्तेचा सुखासुखी उपभोग कंसाला घेता येत नाही. त्याच्या डोक्यावर असुरक्षिततेची तलवार सतत टांगती राहिलेली असते आणि अशाच अवस्थेत त्याचा अंत होतो.
असा प्रकाराने दुष्ट कंसाचा नाश केल्यानंतर कृष्णाने त्याच्या डोक्यावरील राजमुकुट स्वतः धारण केला नाही. उग्रसेन राजाला पुन्हा राजपद दिले आणि विधीवत शिक्षण घेण्यासाठी तो सांदीपनी मुनींच्या आश्रमात चालला गेला. शिक्षण संपवून परत आल्यानंतरसुद्धा त्याने आपल्या सामर्थ्याच्या बळावर मोठा सम्राट बनण्याची महत्वाकांक्षा धरली नाही. वारंवार होणा-या लढायंच्या धुमश्चक्रीमुळे त्रस्त झालेल्या यादवांना सोबत घेऊन त्याने मथुरासुद्धा सोडली आणि दूर सौराष्ट्राच्या समुद्रकिना-यावर द्वारका नगरी वसवून तिथे स्थाईक झाला. मात्र यादवांना स्थैर्य मिळवून दिल्यावर तो हस्तिनापूरच्या राजकारणात लक्ष घालायला लागला. पांडवांना त्याने हर त-हेने मदत केली. पण कौरवांबरोबरसुद्धा चांगले संबंध राखले. पांडव व कौरवांमधील युद्ध टाळण्यासाठी शिष्टाईचा प्रयत्न केला. अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले.
युद्ध अटळ झाल्यावर "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार।" असे म्हणत तो वरवर तटस्थ राहिला. सुदर्शनचक्र हातात घेऊन प्रत्यक्ष युद्धात उतरला नाही. फक्त अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले. द्वारकेच्या राण्याने आजच्या भाषेत ड्रायव्हर किंवा शोफर होण्यात त्याला कसलीही अप्रतिष्ठा वाटली नाही. ते काम करता करता त्याने युक्तीच्या ज्या चार गोष्टी सांगितल्या त्याला तोड नाही. भीष्मपितामह, गुरु द्रोणाचार्य, कर्ण व दुर्योधन या कौरवांच्या सेनापतींचे कच्चे दुवे नेमके ओळखून त्यांचा पाडाव करण्याच्या युक्त्या श्रीकृष्णाने सांगितल्याच. युद्धाच्या सुरुवातीलाच "सीदंति मम गात्राणि मुखंचपरिशुष्यते। " असे म्हणून शस्त्र टाकून बसलेल्या अर्जुनाला "कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। " हा भगवद्गीतेचा उपदेश करून युद्ध करण्यास प्रवृत्त केले. हा उपदेश आजतागायत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत आला आहे.
असा हा चतुरस्र श्रीकृष्ण! दहीदूध चोरण्याचा खट्याळपणा करणारा म्हणून मुलांना प्रिय, गोपिकांची छेड काढणारा आमि त्यांच्याबरोबर रासक्रीडा करणारा म्हणून युवकांना आवडणारा, रुक्मिणीहरण करून प्रेमीजनांना आधार देणारा आणि भगवद्गीता सांगणारा विद्वज्जनांचा योगेश्वर! त्याच्या आयुष्यातील कथा अत्यंत सुरस आणि मनोरंजक तशाच बोधप्रद आहेत व त्यामुळे त्या सर्वांना सांगायला तसेच ऐकायला खूप आवडतात. म्हणूनच त्याची जयंती इतक्या उल्हासाने साजरी केली जाते.

राखी पौर्णिमा

श्रावण पौर्णिमा याच दिवशी हा सण साजरा केला जातो. बहिणीने भावाला उजव्या हाताला रेशमी गोफ हे प्रेमाचे प्रतीक बांधून, नाते पक्के करण्याची ही पद्धत आहे. भावाच्या हाताला राखी बांधून, बहीण आपल्या रक्षणाची जबाबदारी भावाकडे सोपवते, नात्याचा बंध अधिक दृढ करते. उत्तर भारतातही हा सण पूर्वीपासून साजरा केला जातो.  संपूर्ण भारतभर हळूहळू याचे महत्त्व वाढू लागले आहे. ज्यांना भाऊ किंवा बहीण नाही, ते ही नाती प्रेमाने निर्माण करतात. मानवी नात्यांच्या माध्यमातून अशा विशिष्ट दिवशी एकत्र येणे, आनंदाचा अनुभव घेणे या निमित्ताने घडते.






रक्षाबंधन- इतिहास व परंपरा
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात 'कजरी-पौर्णिमा', पश्चिम भारतातात 'नारळी पौर्णिमा' या नावाने तो साजरा केला जातो.

इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता. अशी पौराणिक कथा आहे. तसेच महाभारतात श्री कृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडी किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी दौपदीचे रक्षण केले.

भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती.

नोबल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदु व मुस्लिम यांच्यात सलोखा निर्माण करण्‍यासाठी दोन्ही समुदायांना एकमेकांच्या हातावर रक्षासूत्र बांधण्याची विनंती केली होती.

पौराणिक कथा व इतिहात चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारत असतो.

काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ- बहीनींच्या स्नेहाचा 'रक्षाबंधण' या सणाचे महत्त्व कायम आहे.

नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.
या दिवशी कोळी व ईतर समुद्राशी निगडीत व्यवसायातील लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात.




श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्‍यालगत राहणार्‍या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ यार केले जातात. भारताला सुमारे 1517 कि.मी. लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.