Tuesday, April 6, 2010

'संयुक्त महाराष्ट्र'ची वेबसाइट 'हॅक'


सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 07, 2010 AT 12:15 AM (IST)
मुंबई - महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव काही दिवसांवर आलेला असतानाच व ज्यांच्या बलिदानातून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्या लढ्याच्या स्मृती जागविणारी "संयुक्त महाराष्ट्रा'ची वेबसाईटच "हॅक' झाली आहे. या वेबसाईटवर मराठीऐवजी जपानी भाषा येत असून या वेबसाईटवरून मराठी भाषाच हद्दपार झाली आहे. शिवसेनेचे वरळी विधानसभा उपविभागप्रमुख अरविंद भोसले यांनी पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत यासंबंधीची लेखी तक्रार दिली आहे.

राज्याच्या सुवर्णमहोत्सवाबाबत विदेशात राहणाऱ्या मराठीजनांना महाराष्ट्राच्या निर्मितीविषयी माहिती मिळण्याचे हे एकमेव संकेतस्थळ होते. मात्र तेही हॅकर्सनी "हॅक' केले आहे. http://www.samyuktamaharashtr.org या माहिती केंद्रावर संयुक्त महाराष्ट्राचा लढा व हुतात्म्यांच्या माहितीऐवजी वर्कडेक्‍स नामक संकल्पनेबाबत काहीतरी लिहिलेले आहे. या वेबसाईटवरील संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची माहिती हॅक करून त्याऐवजी जपानी चित्रलिपीतील मजकूर आढळून येतो. हा मजकूर तपासण्यासाठी गूगलवरील इंटरनेट सुविधेचा वापर करून या मजकुराचे भारतीय भाषेत भाषांतर करून पाहिले असता या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राचा लढा व हुतात्म्यांच्या माहितीऐवजी "वर्कडेस्क' नामक संकल्पनेबद्दल काही तरी लिहिलेले आढळले. अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हॅकिंगचा हा प्रकार काही दिवसांपूर्वीच घडला असून राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला काही मराठीप्रेमींनी व्यक्तिशः कळविले होते; मात्र या विभागाने लक्ष दिले नाही, असा आरोप भोसले यांनी तक्रारीत केला आहे.

संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ काही दिवसांवर आलेला असतानाच राज्य सरकार आणि व संबंधित विभाग उदासीन असल्याबद्दलही भोसले यांनी खंत व्यक्त केली आहे. याबरोबरच केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर (http://india.gov.in) जुलमी मुघल सुलतानीचा, औरंगजेबाचा पानेच्या पाने भरून उदोउदो केला आहे. मात्र, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच महाराणा प्रतापसिंहांचा जाज्वल्य इतिहासाबद्दल एक शब्दही लिहिलेला नाही, असेही या तक्रारीत म्हटले आहे

No comments:

Post a Comment