मुंबई - मराठी शाळांमध्ये इंग्रजी आणि इंग्रजी शाळांमध्ये मराठी अधिक प्रभावी व दर्जेदारपणे शिकविण्यात येईल. राज्यात शाळांची संख्या पुरेशी असून त्यांचा दर्जा वाढविणे आवश्यक आहे. राज्यात माध्यमिकच्या ग्रामीण भागात 56 आणि शहरी भागात 1086 शाळांची कमतरता असल्याचे आकृतिबंधासाठी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यात नवीन मराठी शाळांना मान्यता देण्याचे राज्य सरकारचे धोरण असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत आदींनी चर्चा उपस्थित केली होती. त्यावर सरकारची भूमिका सांगताना श्री. थोरात म्हणाले, राज्यात 75,600 शाळा असून 29767 माध्यमिक शाळा आहेत. ग्रामीण भागात दर 3 किमी अंतरावर प्राथमिक शाळा; तर 11 किमी अंतरावर कनिष्ठ महाविद्यालय आहे. त्यामुळे शाळांची संख्या पुरेशी असून त्यांचा दर्जा उंचावला पाहिजे.
राज्यात इंग्रजी शाळांचे प्रमाण पाच टक्के असून त्यापैकी 75 टक्के शाळा मुंबई, ठाणे, रायगड, पनवेल, पुणे परिसरात आहेत. उर्वरित महाराष्ट्रात 75 टक्के शाळा आहेत, अशी माहिती थोरात यांनी सभागृहात दिली.
Friday, April 9, 2010
पुस्तके, गणवेश खरेदीतही शाळांकडून लूट
पुणे - शालेय गणवेश शाळेच्या भांडारातून किंवा विशिष्ट दुकानातून घेण्याची सक्ती बेकायदा ठरविणारे सरकारचे आदेश राज्यातील जवळपास सर्व शाळा गेल्या सहा वर्षांपासून धाब्यावर बसवून पालकांची लूट करीत आहेत. शुल्कवाढीपासून गणवेश खरेदीपर्यंत सरकारी नियंत्रण धुडकावत पालकांच्या खिशातून दर वर्षी कोट्यवधी रुपयांची लूट सुरू आहे.
शाळेचे भांडार किंवा विशिष्ट दुकानातून शालेय वह्या पुस्तके व गणवेश खरेदीची सक्ती शाळांकडून सर्रासपणे सुरू आहे. या विरोधात काही पालकांनी 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची दखल घेऊन 11 जून 2004 मध्ये शालेय शिक्षण विभागाने अशा प्रकारे सक्ती करणे बेकायदा असून, या शाळांवर कारवाई होऊ शकते, असे परिपत्रक जारी केले होते. मात्र, गेल्या सहा वर्षांत एकाही शाळेवर अशा प्रकारे कारवाई झाल्याची माहिती उपलब्ध नाही. विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून पालकांची लूट मोठ्या प्रमाणात होत असल्याचे लक्षात आले आहे. प्रत्येक शाळेचे वह्या पुस्तके मिळण्याचे एक विशिष्ट दुकान, तर शालेय गणवेश, बूट व इतर साहित्य मिळण्याचे एक दुकान असते. पालकांच्या सोयीसाठी सुटीच्या कालावधीत विशिष्ट तारखांना त्यांच्यामार्फत शाळेत खरेदीसाठी कॅंप लावले जातात.
"प्ले ग्रुप'च्या वर्गात मुलाला प्रवेश घ्यायचा झाल्यास इंग्रजी माध्यमाच्या सर्वसाधारण शाळेसाठी येणारा पहिल्या वर्षीचा खर्च सुमारे 25 ते 30 हजार रुपये आहे. यामध्ये गणवेश व वह्या पुस्तकांचा खर्च सुमारे दीड ते दोन हजार रुपये असतो. मुलांना न उचलता येणाऱ्या ओझ्याच्या दप्तराचा यात समावेश असतो. गणवेश सक्तीबाबत तक्रारी असल्यास पालकांनी गोकूळ शेलार यांच्याशी 9372932728 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पतित पावन संघटनेचे शहर सरचिटणीस निरंजन फडके यांनी केले आहे.
काय कारवाई होऊ शकते?
गणवेश खरेदीचे सरकारी नियंत्रण धुडकावत वर्षानुवर्षे पालकांची लूट सुरू असली, तरी नियम मोडणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यास सरकारी यंत्रणाही उदासीन आहे. मात्र, कायद्यात कडक शिक्षेची तरतूद आहे. अनुदानित शाळांच्या अनुदानात कपात करणे, अनुदान व मान्यता रद्द करणे, अशी कारवाई होऊ शकते. विनाअनुदानित शाळांना प्रथम लेखी ताकीद देऊनही दुर्लक्ष केल्यास अशा शाळांना काळ्या यादीत टाकणे, जमीन, पाणी यांसारख्या सरकारी सवलती मिळत असल्यास त्या बंद करणे, अशी कारवाई होऊ शकते.
"सीबीएसई'सारख्या केंद्रीय शाळांनी नियम मोडल्यास त्यांचे "ना हरकत' प्रमाणपत्र रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

बलात्कार खटला जलद न्यायालयात चालवणार
मुंबई - पुण्याच्या हिंजवडी-वाकड बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. तसेच सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली. महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता यासाठी प्रत्येक जिल्ह्यात "फास्ट ट्रॅक कोर्ट' सुरू करण्याचाही शासनाचा प्रस्ताव असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
शहरातील वाढती गुन्हेगारी व महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ या विषयावर भाजपच्या सुधाकर देशमुख यांनी अशासकीय ठरावाद्वारे विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती.
चर्चेला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिस बल कमी पडत असून गुन्ह्याचे वाढते प्रमाण, बदलणारे स्वरूप याचा ताण पोलिसांवर येत असल्याचे त्यांनी मान्य केले.
पोलिसांची संख्या वाढविण्यात येत असून लवकरच 55 हजार नवीन पदे निर्माण करून ती भरण्यात येतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
दहशतवादी व नक्षलवाद्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन सर्वच भागाच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. गोंदिया, सातारा, तसेच कोल्हापुरात राज्य राखीव पोलिस दलाच्या बटालियन्स तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पोलिसांची संख्या वाढविण्यात येत असून राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपनिरीक्षकांची एक हजार पदे भरण्यात येतील, अशी घोषणाही पाटील यांनी केली.
दहा मिनिटे कामकाज तहकूब
अशासकीय ठराव चर्चेला आले तेव्हा सभागृहात संबंधित खात्याचे कॅबिनेट व राज्यमंत्री उपस्थित नसल्याचा मुद्दा भाजपचे गिरीश बापट यांनी उपस्थित केला व सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्याची मागणी केली. अखेर पीठासीन अधिकारी विवेक पाटील यांनी विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले.

हरितालिका
स्त्रियांनी मनासारखा पती मिळावा म्हणून दिवसभर उपवास करावा. सखी आणि पार्वती यांच्या प्रतिमांची पूजा करावी. सुवासिक फुले, फळे, झाडांची पाने (पत्री) अर्पण करावीत आणि खेळ खेळून मैत्रीणींनी जागरण करावे - या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. हरितालिकेचे व्रत हे पार्वतीने शंकराला प्राप्त करण्यासाठी केलेल्या व्रताशी जोडलेले आहे.
बदलत्या काळानुसार काही सणांमागे असलेला अर्थ बदलून त्याला वेगळ्या स्वरूपात आणण्याचे प्रयत्न केले जातात. पूर्वी लहान वयात विवाह होत. मुलींचे खेळण्याचे वय असताना, ते बाल्य जपण्यासाठी उत्सवांच्या मदतीने महिलांना -मुलींना नटण्या-मुरडण्याची, एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची संधी देण्यासाठी पूर्वापार काही प्रथा सुरू आहेत.त्यांतीलच ही एक होय

Thursday, April 8, 2010
नाशिक
नाशिक देवळांचे शहर
स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या महान व्यक्तिमत्वांची भूमी म्हणजे नाशिक. हे शहर देवळांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक काळापासून नाशिकला धार्मिक स्थळ म्हणून महात्म्य प्राप्त झाले आहे.
देशात चार ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्यापैकी दक्षिण भारतात नाशिक व त्र्यंबकेश्वर ही ठिकाणे आहेत.दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट पाहण्यासारखे आहेत.
येथील प्रसिध्द ठिकाणे-
1. त्र्यंबकेश्वर
हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात ते वसले आहे. मुख्य ज्योतिर्लिंगाचे मंदिर पहाण्यासारखे आहे. त्याच्या चारही बाजूंनी कोट आहे. पूर्वेला मुख्या दरवाजा आहे. ब्रम्हा, विष्णू व महेशाची तीन लिंगे हे येथील वैशिष्ट्य आहे.
मंदिराजवळच कुशावर्त तीर्थ हे कुंड आहे. मंदिरालालागूनच अहिल्या नदी वाहते. ब्रम्हगिरी पर्वतावरच गंगाद्वार हे ठिकाण आहे. येथे गोदावरी उगम पावते. त्याच्यावर ब्रम्हगिरीला जाण्याचा रस्ता आहे. तेथे भगवान शंकरांनी जटा आपटल्याच्या खूणा असल्याचे सांगितले जाते.
कुशावर्त तीर्थ कुंड
त्र्यंबकेश्वर वारकरी भक्तांसाठीही महत्त्वाचे टिकाण आहे. कारण ज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्तीनाथांना येथेच गहिनीनातांचा अनुग्रह झाला होता. त्यांची समाधीही येथेच आहे. तेथे मोठा उत्सवही साजरा होतो. शिवाय कुंभमेळ्यात सहभागी होणार्या तेरा पैकी दहा आखाड्यांचे आश्रम येथे आहेत.
त्र्यंबकेश्वरात बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारी तर लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील सोमवारी ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारण्याची परंपरा आहे. विशेषतः तिसर्या सोमवारी त्यासाठी मोठी गर्दी असते. हे स्थळ नाशिकपासून २७ किलोमीटरवर आहे.
2. पंचवटी-
त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेली गोदावरी नदी नाशिकमधून वाहते. या नदीमुळे नाशिकचे दोन भाग पडले आहेत. नदीच्या पलिकडील भागाला पंचवटी म्हणतात. पंचवटी भागातच रामाचे वास्तव् होते असे मानले जाते. येथे असलेल्या पाच वडांच्या झाडांवरून या भागाचे नाव पंचवटी पडले.
प्रसिद्ध काळाराम मंदिर पंचवटीतच आहे. याशिवाय इतर अनेक मंदिरे येथे आहेत. पंचवटीतच सीता गुंफा आहे. या गुहेत सीता काही काळ राहिली होती, असे म्हणतात. गुहेत जायला फार छोटा रस्ता आहे. आतमध्ये राम लक्ष्मण व सीतेची मूर्ती आहे. येथूनच रावणाने सीतेचे अपहरण केल्याचे मानले जाते.
३. रामकुंड-
रामकुंड
पंचवटीतील हे सर्वात महत्वाचे ठिकाण. पंचवटीतील वास्तव्यात श्रीराम स्नानासाठी येथे येत असल्याचे सांगितले जाते. याच ठिकाणी पिता दशरथाच्या अस्थींचे विसर्जन रामाने केले. येथे अस्थिविलय कुंड आहे. तेथे विसर्जित केलेल्या अस्थी वाहून न जाता वितळतात, अशी श्रद्धा आहे. जवळच गांधी तलाव आहे. या तलाव तसेच स्मारक आहे. महात्मा गांधीच्या अस्थी येथे विसर्जित केल्या हो्त्या. सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नान याच कुंडात होत असते.
४. काळाराम व इतर मंदिरे
पेशव्यांच्य काळात त्यांचे सरदार रंगवराव ओढेकर यांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडापासून बनले आहे. त्याच्याभोवती दगडी कोट असून तो १७ फूट उंच आहे. मंदिरात आत ओवर्या आहेत. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंदिरात राम सीता व लक्ष्मण यांच्या २-२ फूट उंचीच्या मूर्ती आहेत.
हे मंदिर बांधण्यास १७७८ साली सुरवात करण्यात आली होती. त्यासाठी जवळच्या रामशेज डोंगरावरून काळा दगड आणण्यात आला. हे मंदिर बांधायला तेवीस लाख रूपये खर्च आला होता. दोन हजार कामगार बारा वर्षे काम करत होते. दलितांना या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता.
तो बरीच वर्षे चालला होता. काळारामाव्यतिरिक्त अनेक ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व लाभलेली मंदिरे या परिसरात आहेत. आकर्षक कलाकुसरीसाठी नारोशंकर मंदिर प्रसिद्ध आहे. पेशव्यांनी वसईच्या युद्धात विजय मिळाल्यानंतर काढून आणलेली घंटा याच मंदिरात बसवली आहे. याशिवाय नंदी नसलेली कपालेश्वर मंदिर आहे. प्राचीन सुंदरनारायण मंदिर आहे.
५. तपोवन
पंचवटीतच गोदावरी व नंदिनी या नद्यांच्या संगमावर तपोवन हे ठिकाण आहे. तपोवन म्हणजे तप करण्याची जागा. पूर्वीच्या काळी या भागात दोन नद्यांच्या संगमामुळे हिरवळ होती. अतिशय प्रसन्न व मनोहारी वातावरणात साधू तपश्चर्येसाठी येथे येत असत.
रामायणकाळात लक्ष्मण येथे येत असे. त्याने शूर्पणखेचे नाक कापण्याचा प्रसंग येथे घडला असे मानले जाते. या भागात काही गुहासुद्धा आहेत. नैसर्गिक सौंदर्यामुळे आजही पर्यटकांची येथे गर्दी असते. येथे हनुमान व लक्ष्मण यांची मंदिरेही आहेत.
6. अंजनेरी
हनुमानाचे जन्मस्थान मानले जाणारे अंजनेरी नाशिकपासून २० किलोमीटरवर आहे. या पर्वतावर जैनांची लेणीसुद्धा आहेत. गिर्यारोहणासाठी येथे असलेले सुळके प्रसिद्ध आहेत. गिर्यारोहक मोठ्या प्रमाणावर येथे येत असतात. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच हे ठिकाण आहे. मंदिर डोंगरावर आहे.
7. वणी-
देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी वणी येथील जगदंबा देवी आहे. सप्तश्रंृग डोंगरावर हे स्थान आहे. डोंगरावर गेल्यानंतर तेथून नऊशे पायर्या चढून गेल्यानंर देवळात जाता येते. डोंगरातच देवीची मूर्ती कोरलेली आहे. अठराभूजा असलेली मूर्ती देखणी आहे. नवरात्र व चैत्रात येथे मोठी यात्रा भरते.
ही देवी अनेकांची कुलदेवता आहे. त्यामुळे या काळात मोठी गर्दी असते. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर येथे भक्त येतात. अनेक भक्त आपल्या गावापासून कावडी भरून आणतात. हे ठिकाण नाशिकपासून ५२.२७ किलोमीटरवर आहे.
8.बौद्धलेणी
नाशिक मुंबई रस्त्यावर नाशिकपासून आठ किलोमीटरवर बौद्धलेणी आहेत. (ज्याला स्थानिक भाषेत पांडवलेणी म्हणतात.) पहिल्या वा दुसर्या शतकात ती बांधली असल्याचे मानले जाते. या लेण्यांच्या पायथ्याशी बुद्धविहार बांधण्यात आले आहे.
9.फाळके स्मारक-
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके नाशिकचेच. नाशिकमध्येच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे देखणे स्मारक पांडवलेण्याच्या पायथ्याशी उभारण्यात आले आहे.
१०. जिल्ह्यातील स्थळे
नाशिकपासून तीस किलोमीटरवर असलेल्या सिन्नर येथील प्राचीन गोंदेश्वर मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. येवला हे शहर पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय १८५७च्या युद्धात पराक्रम गाजविणारे तात्या टोपे येवल्याचेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी त्याच धर्मात मरणार नाही ही घोषणा येवला येथेच केली.
मालेगावजवळील झोडगे येथील गावी असलेले शिवमंदिर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. इगतपुरीजवळील टाकेद हे ठिकाण पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. सीतेला पळवून नेणार्या रावणाशी युद्ध करून याच ठिकाणी जटायू पक्षी निपचित पडला होता. त्याच्या स्मृत्यर्थ येथे जटायू मंदिरही आहे.
इगतपुरी येथे सत्यनारायण गोयंका यांनी उभारलेले विपश्यना केंद्र आहे. तेथे जगभरातून लोक येतात. चांदवड येथील रेणुका देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत अनेक गिर्यारोहणासाठी योग्य अशी ठिकाणे आहेत. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर नाशिकहून घोटीमार्गे जाण्यास जवळ आहे. शिवाय राज्यातील सर्वांत उच्च किल्ला म्हणून गणला जाणारा साल्हेरचा किल्लाही जिल्ह्यातच आहे.
जाण्याचा मार्ग ः
नाशिकला राज्यातील सर्व शहरातून येण्यास बस आहेत. शिवाय नाशिक रेल्वेमार्गावरही आहे. पुण्यापासून नाशिक २१० तर मुंबईपासून २३० किलोमीटर आहे.पंचवटी हे नाशिक शहरातील एक ऐतिहासिक महत्त्व असलेले एक धार्मिक स्थान असून हे स्थळ गादावरी या नदीच्या काठावर आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा, रामकुंड, पेशवे यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे कोरीव दगडात कलाकुसर असलेले स्थळ पाहण्यासारखे आहे.
महाराष्ट्रातील अभयारण्ये
अभयारण्य जिल्हा
कर्नाळा (पक्षी) रायगड
माळठोक (पक्षी) अहमदनगर
मेळघाट (वाघ) अमरावती
भीमाशंकर (शेकरू खार) पुणे
सागरेश्वर (हरिण) सांगली
चपराळा गडचिरोली
नांदूरमधमेश्वर (पक्षी) नाशिक
देऊळगाव रेहकुरी (काळवीट) अहमदनगर
राधानगरी (गवे) कोल्हापूर
टिपेश्वर (मोर) यवतमाळ
काटेपूर्णा अकोला
अनेर धुळे
कर्नाळा (पक्षी) रायगड
माळठोक (पक्षी) अहमदनगर
मेळघाट (वाघ) अमरावती
भीमाशंकर (शेकरू खार) पुणे
सागरेश्वर (हरिण) सांगली
चपराळा गडचिरोली
नांदूरमधमेश्वर (पक्षी) नाशिक
देऊळगाव रेहकुरी (काळवीट) अहमदनगर
राधानगरी (गवे) कोल्हापूर
टिपेश्वर (मोर) यवतमाळ
काटेपूर्णा अकोला
अनेर धुळे
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
राष्ट्रीय उद्याने ठिकाण
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली व ठाणे
पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया
ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर
गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट) अमरावती
चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा,
कोल्हापूर, रत्नागिरी