गौरीपूजन :
भाद्रपद शुक्लपक्षात षष्ठीला गौरी घरात आणली किंवा स्थापित केली जाते. सप्तमीला पूजन, अष्टमीला विसर्जन अशी या सणाची तीन दिवसांची रचना असते. या काळात महिलांची लगबग असते. घरोघरी त्यानिमित्त हळदी-कुंकू समारंभ योजले जातात. पक्वान्नाचे जेवण बनवले जाते. घराघरात स्वच्छता व सजावट अशी घरालाच वेगळे रूप देण्याचीही घाई -गडबड असते. जाती-उपजातींप्रमाणे या सणाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पण प्रत्येक घरात गौरी घरात निवासालाच आलेल्या आहेत या श्रद्धेने त्यांचे स्वागत, पूजन केले जाते.
काही ठिकाणी, काही घरांत गौरींनाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी, मोठ्या सजावटीसह गौरी अशा अनेक पद्धतीत पाहण्यास मिळतात.
कोकणात तेरड्याची रोपे सुपात लावून त्यावर मुखवटे ठेवतात, काही लोक विहीरीतले किंवा नदीकाठचे सात खडे आणून त्याची पूजा करतात. गौरी घरी स्थापणे, तिच्या नैवेद्यासाठी १६ भाज्या व पंचपक्वान्न करणे, पुरणाच्या १६ दिव्यांनी ओवळणे, तिसर्या दिवशी गौरी विसर्जन करणे असे या सणाचे स्वरूप आहे. जाती-कुटुंबे, यानुसार घराघरात वेगवेगळ्या सजवण्याच्या, खाद्य पदार्थांच्या, पूजेच्या पद्धती आहेत. महालक्ष्मीने एका राक्षसाचा वध केला आणि अनेक स्त्रियांचे सौभाग्य राखले, लोकांना सुखी केले अशीही एक कथा याबाबत सांगितली जाते.
Showing posts with label मराठी सण. Show all posts

Thursday, April 22, 2010
Tuesday, April 13, 2010
गणेशोत्सव
गणपती बाप्पा मोरया
गणेशोत्सव :महाराष्ट्रातील हा फार महत्त्वाचा आणि भव्य प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. हा उत्सव म्हणजे महाराष्ट्राचे भूषणावह वैशिष्ट्य आहे. भाद्रपद महिन्यातील, शुक्ल पक्षातील चतुर्थी; या तिथीला गणपती या विद्येच्या देवतेची पूजा -अर्चा करून प्रतिष्ठापना करतात. दहा दिवस सजावट करून मूर्ती घरी वा सार्वजनिक ठिकाणी स्थापित केली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, प्रत्येक गल्ली-बोळात साजरा केला जाणारा हा उत्सव आहे.
घराघरात उत्साहाने मूर्ती आणणे, रोज पूजा करणे, सकाळ - संध्याकाळ आरती म्हणणे असे दहा दिवस किंवा सात दिवस, ५ दिवस किंवा १।। दिवसांसाठीही - त्या त्या घरातील पद्धतीनुसार केले जाते. मोदकांचा नैवैद्य, पंचखाद्य, जास्वंदाची लाल फुले, दूर्वा या गणपतीला आवडणार्या गोष्टी त्याला अर्पण केल्या जातात. गावागावातील सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून स्पर्धा, व्याखाने, प्रवचन-कीर्तने, गाण्यांच्या मैफिली, नाटके, लोकनाट्ये आदी सांस्कृतिक कार्यक्रम योजले जातात. पौराणिक, ऐतिहासिक देखावे, तसेच देशभक्तीपर, सामाजिक संदेश देणार्या देखाव्यांची सजावट करून समाजाचे मनोरंजन व प्रबोधन केले जाते.
लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची क्षमता ओळखून लोकांनी एकत्र येऊन गणेशोत्सव सार्वजनिक रीतीने साजरा करावा अशी कल्पना मांडून, त्याची सुरुवात पुण्यातून केली. सुमारे १८९३ च्या दरम्यान घराघरातील गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवाची पद्धत सुरू झाली. देश ब्रिटिशांच्या हाती होता. लोकांनी एकत्र येण्यासाठी, जनजागृतीचे कार्यक्रम करण्यासाठी या उत्सवाचा तेव्हा अतिशय उपयोग झाला. भेदभाव विसरून, सर्व जाती-धर्माच्या लोकात एकी असावी, त्यांच्यात उत्साह यावा आणि तेव्हाच विचारप्रवर्तक कार्यक्रम लोकांपुढे होऊन जनजागरणाचे कामही व्हावे यासाठी गणेशोत्सव उपयुक्त ठरला.
बदलत्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप खूपच बदलले आहे. टिळकांच्या काळात समाजाला जाग आणण्याचे काम या उत्सवाने केले. आजही समाजाचे संघटन - प्रामुख्याने तरुणांचे संघटन - होण्याच्या दृष्टीने हा महाउत्सव पूरक ठरतो. सार्वजनिक गणेश मंडळे ही महाराष्ट्राची शक्ती आहे. या मंडळांच्या माध्यमातून विधायक उपक्रम कार्यान्वित केले जातात. संकटकाळात याच मंडळांचे तरुण कार्यकर्ते समाजाच्या मदतीला धावून जातात. ही मंडळे व हा उत्सव, ह्या सामाजिक कार्यकर्ते व नेतृत्व घडणार्या प्रशिक्षण संस्थाच आहेत असे निश्र्चितपणे म्हणता येईल. ध्वनी प्रदूषण, विजेचा अपव्यय, वर्गणीसाठीचे गैरप्रकार, मिरवणुकांतील भांडणे इत्यादी नकारात्मक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न सर्व संबंधित घटक करत असतात. या गोष्टी वगळता हा उत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावरील आकर्षक व पवित्र असा महाउत्सव आहे हे निश्र्चित!
Thursday, April 8, 2010
पोळा
श्रावण अमावास्येला बैलांची पूजा करून, त्यांना उत्तम जेवायला देऊन, कामातून विश्रांती दिली जाते. सजवून त्यांची मिरवणूक काढण्याचा हा दिवस.
शेतकर्यांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या बैलांना (पशुधनाला) त्यांच्या श्रमातून बदल देणे, त्यांना रजा देणे, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे असा त्यामागे अर्थ आहे. शेतातील कामे संपत आल्याने शेतकरी या उत्सवात बैलांसह आनंदाने सहभागी होऊ शकतात.
प्रत्येक शिव मंदिरात असणारा नंदी, वृषभ म्हणजेच बैल. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात. ज्या ठिकाणी दुग्धव्यवसाय, एकूणच शेती मोठ्या प्रमाणात उत्पन्न देते अशा ठिकाणी भरपूर पशुधन असते. सुबत्ता असल्यास ते पशुधन सुदृढही असते. तिथे बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्र त्यात पुढे आहे. कोकणात या उत्सवाला ‘बेंदूर’ असे नाव आहे. बंगालमध्ये, गुजराथमध्येही बैलांचा सण साजरा होतो. दररोज ज्याच्याकडून मेहनत करून घेतो, त्याच्या श्रमाची पावती देणे, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून, ओवाळून खायला देणे अशा गोष्टी केल्या जातात.
बैलाचे कष्ट शेताच्या प्रत्येक कामासाठी शेतकरी घेतो, त्यामुळेच त्याला भरपूर धान्य मिळते. अशा मूक प्राण्याला शेतीची कामे संपल्यावर विश्रांती देणारा हा सण! कृषिप्रधान संस्कृती याच्या मुळाशी आहे. निसर्गरूपांना देव मानणे, नवे धान्य आल्यावर त्याची पूजा करणे, हत्यारे-अवजारे यांची पूजा करणे, जमिनीला मातेसमान मानणे या पद्धती कृषिसंस्कृतीशी जोडलेल्या आहेत.
या सणासाठी शेतकर्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठुन दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सिमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करुन बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पध्दत आहे.त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमिनदार) याचेतर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेउन ओवाळण्यात येते.बैल नेणार्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.
असा हा पोळ्याचा सण आहे. दिवसेंदिवस होणार्या नापिकीमुळे व खालावणार्या आर्थिक परिस्थितीमुळे याचा उत्साह कमी होत आहे.

Tuesday, April 6, 2010
गोकुळाष्टमी
गोकुळाष्टमी :
श्रावणातील कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्माचा उत्सव करून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचे स्मरण करून, एकत्र येऊन उपवास करून भाविक हा दिवस साजरा करतात. दुसर्या दिवशी ठिकठिकाणी उंचावर मडक्यात दही ठेवून, मडके दोरीने उंचावर बांधतात. तरुणांनी एकमेकांच्या आधाराने मानवी मनोरा करून ते मडके (हंडी) फोडण्याची एक प्रथा आहे. त्याला ‘दहीहंडी’ म्हणतात. अलीकडे ‘दहिहंडी’ हा एक `आंतरराष्ट्रीय इव्हेंट' बनला आहे. मानवी मनोरा करणारे, हंडी फोडणारे ‘गोविंदा’ यांची फार चढाओढ सुरू झाली आहे. हौस, दंगा, आनंदोत्सव याबरोबरच त्याला स्पर्धा, प्रसिद्धी, प्रायोजक या माध्यमांतून व्यवसायाचे रूपही येऊ लागले आहे. तरुणांची संघटित शक्ती ही या उत्सवाची प्रमुख जमेची बाजू आहे. मुंबई हे या उत्सवाचे मोठे, प्रमुख केंद्र होय.

श्रीकृष्ण म्हणजे खट्याळ, खोडकर, दही-दूध-लोणी चोरून खाणारा अशी त्याची प्रतिमा पिढ्या-न-पिढ्या सांगितली जाते. अनेक गाणी-गोष्टी त्याच्या या लीलांवरच रचलेल्या आहेत. श्रीकृष्णाने त्याच्या सवंगड्यांसह, मनोरे करून दही-दूध-लोण्याच्या हंड्या फोडल्याच्या कथा प्रचलित आहेत. अशा श्रीकृष्णाची-दुष्टांचा संहार करणार्या श्रीकृष्णाची-आठवण करण्याचा हा दिवस. काही कथांमुळे श्रीकृष्णाची प्रतिमा लहानपणापासून प्रत्येकाच्या मनात तयार होते. तरुणांनी चपळाईने, संघटितपणे उंचावरचे दही खाली काढण्याच्या निमित्ताने साहसी वृत्ती जागवावी अशाही पद्धतीने या उत्सवाकडे पाहिले जाते.
गायी-वासरे चरण्यासाठी रानात आणि पाण्यासाठी यमुनेच्या तीरावर घेऊन जाणारे सर्व गो-पालक आपापले खाद्यपदार्थ एकत्र करून मजेत खात असावेत अशी कल्पना केली जाते. हाच गोपाळकाला होय. `गोकुळअष्टमी' च्या दिवशीच संध्याकाळी मंदिरांत काल्याचे कीर्तन असते. नंतर प्रसाद म्हणून पोहे-काकडी-डाळ-दाणे-चुरमुरे असे एकत्र करून प्रसाद म्हणून वाटले जाते. प्रत्येकाने एक एक पदार्थ नेऊन, सर्वांचे पदार्थ एकत्र करून अनेक ठिकाणी रात्रभर भजन करण्याचीही प्रथा आहे. गोपाळकाला करून हा प्रसाद सर्वांना दिला जातो.
गोकुळाष्टमीची महिमा
दर वर्षी आपण गोकुळाष्टमीला कृष्णजन्म उत्याहाने साजरा करतो. श्रीकृष्ण हा वेगवेगळ्या कारणांनी सगळ्यांनाच खूप आवडणारा, अगदी आपलासा वाटणारा देव आहे. तसा तो भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. मत्स्य, कूर्म व वराह या पशूंच्या रूपातील पहिल्या तीन अवतारांबद्दल कोणाला फारसे कांही ठाऊक नसते. नृसिंह आणि वामनावतार थोड्या वेळेपुरते प्रकट झाले आणि कार्यभाग संपताच ते अदृष्य होऊन गेले. सांगता येण्यासारखे असे त्यांचे चरित्र नाही. परशुराम आपल्या जमदग्नी या पित्यासारखाच शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध झालेला असल्यामुळे त्याच्याबद्दल प्रेमाहून भीतीच जास्त वाटते. राम अवतार सर्वगुणसंपन्न आणि आदर्श असे व्यक्तीमत्व आहे. त्याचे संपूर्ण चरित्र हा आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा असे वाटते, पण सर्वसामान्य माणसाला ते जमणे कठीण आहे. गोपालकृष्ण मात्र आपल्यासारखा वाटतो. त्याच्या लडिवाळ बाललीला, मस्करी, वात्रटपणा, सवंगड्याबरोबर खेळ खेळणे, गोपिकांबरोबर रास रचणे, पांडवांना समजुतीच्या गोष्टींचे सल्ले देणे हे सगळे मानवी वाटते.
कृष्ण हा विविध वयोगटातल्या आणि मनोवृत्तीच्या लोकांना आवडतो कारण इतक्या वैविध्यपूर्ण घटना त्याच्या चरित्रात आहेत. व्यासमहर्षींनी ते फारच कौशल्याने रंगवलेले आहे. मानवी स्वभावाचे दर्शन आणि चमत्कार यांचे एक अजब मिश्रण त्यात आहे. त्याच्या जन्माची कथा अद्भुतरम्य आहे. कंसाचे निर्दाळण करण्यासाठी त्याचा शत्रु देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे अशी पूर्वसूचना त्याला मिळते आणि त्याचा जन्मच होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न तो करतो. त्या सर्वांवर मात करून कृष्ण जन्म होतोच. त्या नवजात शिशूचा जीव वाचवण्यासाठी त्याचा पिता जे प्रयत्न करतो त्याला सर्वोपरीने सहाय्य मिळत जाते. त्याच्या हातापायातील शृंखला गळून पडतात, कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडतात, रखवालदार गाढ झोपी जातात, मुसळधार पावसातून वाटचाल करत असतांना प्रत्यक्ष शेषनाग आपल्या फण्याचे छत्र त्याच्या माथ्यावर धरतो. दुथडीने वाहणारे यमुना नदीचे पाणी ओसरून त्याला पलीकडे जायला वाट करून देते. गोकुळात गेल्यावर नंद यशोदा निद्रितावस्थेत असतात, पण त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असतो. अशा प्रकारे सर्व अडचणी एक एक करून दूर होत जातात आणि बाल श्रीकृष्ण सुखरूपपणे गोकुळात जाऊन पोचतात. ही कथा किती सुरस आहे पहा! देव आहे म्हणून तो एकदम वसुदेव देवकींना त्यांच्या त्रासातून मुक्त करत नाही की इकडे अदृष्य होऊन तिकडे प्रगट होत नाही.
त्यानंतरसुद्धा आपला शत्रु जन्माला आला आहे आणि गोकुळामध्ये तो वाढतो आहे याची जाणीव कंसाला होते आणि त्या मुलाला मारून टाकण्याचे अनेक उपायसुद्धा तो करतो, पण ते सफळ होत नाहीत. यातसुद्धा कृष्णाला मारायला आलेल्या दुष्टांना तो कोठल्याही शस्त्राने न मारता त्यांचाच डाव त्यांच्या अंगावर उलटवतो. त्याला आपले विषारी दूध पाजून मारायला आलेल्या पूतनामावशीचे दूध पितापिताच तो तिचे प्राण शोषून घेतो तर पाण्यात पडलेला चेंडू आणायचे निमित्य करून यमुनेच्या डोहात मुक्काम करून बसलेल्या कालिया नागाच्या फण्यावर नाचून त्याला चेचून काढतो आणि तिथून निघून जायला भाग पाडतो. अखेरीस कंस त्याला मुष्टीयुद्धाच्या खेळात भाग घेण्याचे आमंत्रण देतो. "मर्दका बच्चा होगे तो खुलकर सामने आ।" वगैरे संवाद हल्लीच्य़ा हिंदी सिनेमात असतात तशा प्रकारे दिलेले हे आव्हान स्वीकारून कृष्ण मल्लयुद्धाच्या आखाड्यात उतरतो. डब्ल्यू डब्ल्यू एफ् सारख्या या फ्रीस्टाईल कुस्त्यांना त्या काळात पंच नसत. प्रतिस्पर्ध्याने हार कबूल करेपर्यंत त्याला झोडत रहायचे असाच नियम होता. त्यात कृष्णाचा जीव जाईपर्यंत त्याला झोडपायचा आदेश कंसाने आपल्या आडदांड मल्लांना दिला होता. इथेही तशाच प्रकाराने कृष्णाने त्यांनाच लोळवले. इतकेच नव्हे तर कंसालाही ललकारून त्याचा जीव घेतला. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट दाखवली आहे. ती म्हणजे गैरमार्गाने मिळवलेल्या राज्यसत्तेचा सुखासुखी उपभोग कंसाला घेता येत नाही. त्याच्या डोक्यावर असुरक्षिततेची तलवार सतत टांगती राहिलेली असते आणि अशाच अवस्थेत त्याचा अंत होतो.
असा प्रकाराने दुष्ट कंसाचा नाश केल्यानंतर कृष्णाने त्याच्या डोक्यावरील राजमुकुट स्वतः धारण केला नाही. उग्रसेन राजाला पुन्हा राजपद दिले आणि विधीवत शिक्षण घेण्यासाठी तो सांदीपनी मुनींच्या आश्रमात चालला गेला. शिक्षण संपवून परत आल्यानंतरसुद्धा त्याने आपल्या सामर्थ्याच्या बळावर मोठा सम्राट बनण्याची महत्वाकांक्षा धरली नाही. वारंवार होणा-या लढायंच्या धुमश्चक्रीमुळे त्रस्त झालेल्या यादवांना सोबत घेऊन त्याने मथुरासुद्धा सोडली आणि दूर सौराष्ट्राच्या समुद्रकिना-यावर द्वारका नगरी वसवून तिथे स्थाईक झाला. मात्र यादवांना स्थैर्य मिळवून दिल्यावर तो हस्तिनापूरच्या राजकारणात लक्ष घालायला लागला. पांडवांना त्याने हर त-हेने मदत केली. पण कौरवांबरोबरसुद्धा चांगले संबंध राखले. पांडव व कौरवांमधील युद्ध टाळण्यासाठी शिष्टाईचा प्रयत्न केला. अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले.
युद्ध अटळ झाल्यावर "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार।" असे म्हणत तो वरवर तटस्थ राहिला. सुदर्शनचक्र हातात घेऊन प्रत्यक्ष युद्धात उतरला नाही. फक्त अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले. द्वारकेच्या राण्याने आजच्या भाषेत ड्रायव्हर किंवा शोफर होण्यात त्याला कसलीही अप्रतिष्ठा वाटली नाही. ते काम करता करता त्याने युक्तीच्या ज्या चार गोष्टी सांगितल्या त्याला तोड नाही. भीष्मपितामह, गुरु द्रोणाचार्य, कर्ण व दुर्योधन या कौरवांच्या सेनापतींचे कच्चे दुवे नेमके ओळखून त्यांचा पाडाव करण्याच्या युक्त्या श्रीकृष्णाने सांगितल्याच. युद्धाच्या सुरुवातीलाच "सीदंति मम गात्राणि मुखंचपरिशुष्यते। " असे म्हणून शस्त्र टाकून बसलेल्या अर्जुनाला "कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। " हा भगवद्गीतेचा उपदेश करून युद्ध करण्यास प्रवृत्त केले. हा उपदेश आजतागायत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत आला आहे.
असा हा चतुरस्र श्रीकृष्ण! दहीदूध चोरण्याचा खट्याळपणा करणारा म्हणून मुलांना प्रिय, गोपिकांची छेड काढणारा आमि त्यांच्याबरोबर रासक्रीडा करणारा म्हणून युवकांना आवडणारा, रुक्मिणीहरण करून प्रेमीजनांना आधार देणारा आणि भगवद्गीता सांगणारा विद्वज्जनांचा योगेश्वर! त्याच्या आयुष्यातील कथा अत्यंत सुरस आणि मनोरंजक तशाच बोधप्रद आहेत व त्यामुळे त्या सर्वांना सांगायला तसेच ऐकायला खूप आवडतात. म्हणूनच त्याची जयंती इतक्या उल्हासाने साजरी केली जाते.
राखी पौर्णिमा
श्रावण पौर्णिमा याच दिवशी हा सण साजरा केला जातो. बहिणीने भावाला उजव्या हाताला रेशमी गोफ हे प्रेमाचे प्रतीक बांधून, नाते पक्के करण्याची ही पद्धत आहे. भावाच्या हाताला राखी बांधून, बहीण आपल्या रक्षणाची जबाबदारी भावाकडे सोपवते, नात्याचा बंध अधिक दृढ करते. उत्तर भारतातही हा सण पूर्वीपासून साजरा केला जातो. संपूर्ण भारतभर हळूहळू याचे महत्त्व वाढू लागले आहे. ज्यांना भाऊ किंवा बहीण नाही, ते ही नाती प्रेमाने निर्माण करतात. मानवी नात्यांच्या माध्यमातून अशा विशिष्ट दिवशी एकत्र येणे, आनंदाचा अनुभव घेणे या निमित्ताने घडते.
रक्षाबंधन- इतिहास व परंपरा
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात 'कजरी-पौर्णिमा', पश्चिम भारतातात 'नारळी पौर्णिमा' या नावाने तो साजरा केला जातो.
इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता. अशी पौराणिक कथा आहे. तसेच महाभारतात श्री कृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडी किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी दौपदीचे रक्षण केले.
भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती.
नोबल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदु व मुस्लिम यांच्यात सलोखा निर्माण करण्यासाठी दोन्ही समुदायांना एकमेकांच्या हातावर रक्षासूत्र बांधण्याची विनंती केली होती.
पौराणिक कथा व इतिहात चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारत असतो.
काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ- बहीनींच्या स्नेहाचा 'रक्षाबंधण' या सणाचे महत्त्व कायम आहे.

नारळी पौर्णिमा
नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.
या दिवशी कोळी व ईतर समुद्राशी निगडीत व्यवसायातील लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात.
श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्यालगत राहणार्या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ यार केले जातात. भारताला सुमारे 1517 कि.मी. लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

Monday, April 5, 2010
नागपंचमी :
श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला येणारा हा सण निसर्गातील प्राण्यांविषयी लोकांना जाणीव करून देणारा आहे. शेतीची नांगरण करण्याचा काळ, आणि त्यामुळे वारुळ-नाग असा त्याचा विचार करून नागांचे रक्षण करण्याचा संदेश देणारा हा सण आहे. कापणे, तळणे, भाजणे, नांगरणे अशी कामे करू नयेत अशी एक प्रथा त्याला जोडली आहे. वारुळांची पूजा व नागांची पूजा करून त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. मुली, स्त्रिया झाडाला झोका बांधून खेळतात; झिम्मा, फुगडी यांसारखे पारंपरिक खेळही खेळतात. महाराष्ट्रात नागपंचमीला असंख्य तरुण पतंग उडविण्याचाही आनंद लुटतात. पतंग उडवण्याच्या माध्यमातून पुरुष या सणाला जोडले गेले आहेत. सृष्टी हिरवीगार होऊन वातावरण आनंदाचे झालेले असते त्याच वेळी म्हणजे श्रावणात असे बरेच सण-दिवस साजरे केले जातात. हा श्रावणाच्या सुरुवातीला येणारा सण आहे. वारुळापर्यंत जाणे हे आनंदाचे व्हावे, एकत्र येण्याची मजा सगळ्यांना घेता यावी म्हणून फेर धरणे, गाणी म्हणणे, फुगड्या, झिम्मा, झोका असे खेळ खेळणे या गोष्टी नागपंचमीला जोडल्या गेल्या असाव्यात.
सांगली जिल्ह्यात बत्तीसशिराळा नावाच्या गावात अनेक गारुडी नाग पकडून आणतात. नागांनी फणा काढणे, पुंगीने मोहून जाणे असे खेळ दाखवले जातात. ही प्रथा गेली कित्येक वर्षे सुरू आहे.
कहाणी नागपंचमीची
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.
शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ताकीद दिली की, हिला कोणी चावू नका!
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.
नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला येणारा हा सण निसर्गातील प्राण्यांविषयी लोकांना जाणीव करून देणारा आहे. शेतीची नांगरण करण्याचा काळ, आणि त्यामुळे वारुळ-नाग असा त्याचा विचार करून नागांचे रक्षण करण्याचा संदेश देणारा हा सण आहे. कापणे, तळणे, भाजणे, नांगरणे अशी कामे करू नयेत अशी एक प्रथा त्याला जोडली आहे. वारुळांची पूजा व नागांची पूजा करून त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. मुली, स्त्रिया झाडाला झोका बांधून खेळतात; झिम्मा, फुगडी यांसारखे पारंपरिक खेळही खेळतात. महाराष्ट्रात नागपंचमीला असंख्य तरुण पतंग उडविण्याचाही आनंद लुटतात. पतंग उडवण्याच्या माध्यमातून पुरुष या सणाला जोडले गेले आहेत. सृष्टी हिरवीगार होऊन वातावरण आनंदाचे झालेले असते त्याच वेळी म्हणजे श्रावणात असे बरेच सण-दिवस साजरे केले जातात. हा श्रावणाच्या सुरुवातीला येणारा सण आहे. वारुळापर्यंत जाणे हे आनंदाचे व्हावे, एकत्र येण्याची मजा सगळ्यांना घेता यावी म्हणून फेर धरणे, गाणी म्हणणे, फुगड्या, झिम्मा, झोका असे खेळ खेळणे या गोष्टी नागपंचमीला जोडल्या गेल्या असाव्यात.
सांगली जिल्ह्यात बत्तीसशिराळा नावाच्या गावात अनेक गारुडी नाग पकडून आणतात. नागांनी फणा काढणे, पुंगीने मोहून जाणे असे खेळ दाखवले जातात. ही प्रथा गेली कित्येक वर्षे सुरू आहे.
कहाणी नागपंचमीची
शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ताकीद दिली की, हिला कोणी चावू नका!
Saturday, April 3, 2010
श्रावण
श्रावण -
श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानतात. पावसाच्या सरींमुळे शेतीतील कामे पूर्ण झालेलीच असतात. हवा ओलसर गारव्याची, आल्हाददायक असते. सूर्यदर्शन नियमित होत नाही. पण सृष्टी हिरवा शालू नेसून नटलेली असते.
चातुर्मास्य (चतुर्मास) म्हणजे चार पवित्र मराठी महिने. चारही महिने अनेक धार्मिक दिवस पाळले जातात. व्रत-वैकल्ये केली जातात. शेतात कामे कमी प्रमाणात असतात. ईश्र्वराचे स्मरण व्हावे व आहारावर नियंत्रण ठेवले जावे म्हणून अनेक उपवास याच महिन्यात असतात.
पावसाळ्यात सूर्यदर्शन कमी वेळा होते. सृष्टी सौंदर्याने दिमाखात मिरवत असताना या काळात पचण्यासाठी जड पदार्थ खाल्यास ते तब्बेतीला हानीकारक आहेत असे आयुर्वेद आणि आहारशास्त्र सांगते. कांदा-लसूण असे मसालेदार पदार्थ, वांगं-टोमॅटो असे बिया असलेले भाजीचे प्रकार खाण्यात येऊ नयेत अशी एक प्रथा आहे. आहारनियंत्रण करून तब्बेत चांगली ठेवणे असा त्याचा उद्देश असावा असे अभ्यासक सांगतात. ज्या पदार्थामुळे वात होतो असे वातूळ पदार्थ खाल्ले जाऊ नयेत असाही त्याचा एक अर्थ. ईश्र्वरभक्ती, धार्मिक कृत्ये यातही व्यत्यय येऊ नये, पुढे येणार्या शेतीच्या मोठ्या कामांना तब्बेतीची तक्रार असू नये म्हणून तब्बेत जपण्याचा हा मार्ग असावा. या श्रावण महिन्यातील सण-उत्सवांची संख्या तुलनेने अधिक आहे.

गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा - व्यासपूजा महोत्सव
गुरु-शिष्य परंपरा आजही काही क्षेत्रात जपली जाते. संगीत आणि नृत्य या क्षेत्रांत ही परंपरा पिढ्या न पिढ्या जपली जाते आणि अजूनही गुरुवंदनाने तिचे महत्त्व नव्या शिष्यांवर बिंबवले जात आहे. आजच्या काळात शाळा-महाविद्यालयांमध्येही या दिवशी ‘गुरुपूजन’ करून शिक्षक प्राध्यापकांविषयीचा आदर व्यक्त केला जातो.
समर्थ रामदास - कल्याण स्वामी, श्रीकृष्ण - अर्जुन, श्री रामकृष्ण- विवेकानंद अशा पूर्वीच्या गुरुशिष्यांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून गुरुपूजन केले जाते. आजच्या काळातील महाराष्ट्रातील रमाकांत आचरेकर - सचिन तेंडुलकर ही गुरुशिष्यांची जोडीही अनुकरणीय आहे. आपल्या राज्यातील कुस्ती या खेळातही गुरूला मोठे स्थान आहे
आषाढी पौर्णिमा या तिथीला, पूर्णचंद्र आकाशात असताना, जगद्गुरू श्री व्यासमहर्षींचे स्मरण करून, आपल्या
विकासासाठी, श्री परम्रेश्वराच्या कृपाआशीर्वादासाठी प्रार्थना करण्यासाठी, एकत्र जमण्याचा उत्सव.
आषाढातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून किंवा व्यासपूजन करून साजरी करतात. गुरुपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरू मानले आहे. भारतीयांना गुरु-शिष्य परंपरेचे फार महत्त्व आहे. आई-वडील आणि गुरू ही तीन दैवते मानावीत असे सांगितले जाते. व्यासमहर्षी यांची पूजा म्हणजे गुरुपौर्णिमा. शंकराचार्य यांची पूजा म्हणजे गुरुपूजन. संत ज्ञानेश्र्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, श्री गोंदवलेकर महाराज, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज आदी संत-सत्पुरुषांना गुरुस्थानी मानून महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांची पूजा केली जाते. गुरूने दाखवलेल्या मार्गाने जाऊन झालेल्या प्रगतीबद्दल गुरुकडे येऊन सांगणे, आशीर्वाद घेणे, कृतज्ञता व्यक्त करणे, गुरुपूजन - मुरुवंदन करणे म्हणजेच गुरुपौर्णिमा.
गुरु-शिष्य परंपरा आजही काही क्षेत्रात जपली जाते. संगीत आणि नृत्य या क्षेत्रांत ही परंपरा पिढ्या न पिढ्या जपली जाते आणि अजूनही गुरुवंदनाने तिचे महत्त्व नव्या शिष्यांवर बिंबवले जात आहे. आजच्या काळात शाळा-महाविद्यालयांमध्येही या दिवशी ‘गुरुपूजन’ करून शिक्षक प्राध्यापकांविषयीचा आदर व्यक्त केला जातो.
समर्थ रामदास - कल्याण स्वामी, श्रीकृष्ण - अर्जुन, श्री रामकृष्ण- विवेकानंद अशा पूर्वीच्या गुरुशिष्यांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून गुरुपूजन केले जाते. आजच्या काळातील महाराष्ट्रातील रमाकांत आचरेकर - सचिन तेंडुलकर ही गुरुशिष्यांची जोडीही अनुकरणीय आहे. आपल्या राज्यातील कुस्ती या खेळातही गुरूला मोठे स्थान आहे
Friday, April 2, 2010
वटपौर्णिमा
वटपौर्णिमा :
ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा विवाहीत स्त्रिया करतात, तीच वटपौर्णिमा होय. सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेमुळे या व्रताबद्दल महिलांना सविस्तर समजते. वडाच्या झाडाला पाणी घालून त्याच्याभोवती सूत गुंडाळणे आणि प्रदक्षिणा घालणे तसेच त्या दिवशी उपास करणे असे व्रत महिला करतात. प्रदिक्षणा घालताना ७ जन्म सौभाग्य राहावे, पतीची साथ लाभावी अशी प्रार्थना महिला या वेळी करतात.
पत्नीची पतिनिष्ठा आणि प्रेम सांगणारे हे व्रत वडाच्या झाडाशी जोडले आहे हे त्याचे वैशिष्ट्य. अनेक पिढ्यांना सोबत करणारे हे झाड दीर्घायुषी आहे. याचा वृक्ष होण्यास बरीच वर्षे लागतात. त्याची मुळे खोलवर जातात आणि वृक्षाचा पसारा प्रत्येक पारंबीद्वारे सतत वाढत जातो. वडाच्या पारंब्या, त्याचा चीक यात औषधी गुण आहेत, त्यामुळे त्याचे महत्त्व आहेच. अनेक पक्ष्यांना घरट्यात निवारा, चालून थकलेल्यांना झाडाखाली विसावा यासाठी वडाची छाया आधार देते. असे वृक्ष असणे निसर्ग-संतुलनाच्या दृष्टीने गरजेचे आहे. या व्रताच्या निमित्ताने महिलांचा संपर्क या समृद्ध-संपन्न अशा वृक्षाशी येतो.
सती सावित्रीची कथा महाभारतात आली आहे. पांडव वनवासात असतांना जयद्रथाने द्रौपदीचे हरण केले. जयद्रथाचा पराभव करून परतलेले युधिष्ठिरादी पांडव आणि द्रौपदी ऋषीमुनींसह बसले असतांना मार्कंडेय ऋषींनी सावित्रीची कथा सांगितली. प्रात:स्मरणीय अशा पंचकन्यांमध्ये जिचा समावेश आहे, अशा द्रौपदीला मुख्यत्वेकरून ही कथा सांगण्यात आली. त्यावरूनही सावित्रीचे महत्त्व लक्षात येते. आज असणार्या वटपौर्णिमेनिमित्त सती सावित्रीचे हे पुण्यस्मरण !
सत्यवानाची निवड
एके दिवशी देवर्षी नारद राजा अश्वपतीच्या राजसभेत आले. राजाने त्यांचा सन्मान केला. ते दोघे परस्परांशी संवाद करत असतांनाच सावित्री परत आली. सभेत येताच तिने आपल्या पित्याला व नारदांना वंदन केले. नारदांनी तिच्याकडे एकवार दृष्टीक्षेप टाकून राजाला विचारले, ``या कन्येचा विवाह अजून झाला नाही असे दिसते, याचे कारण काय ?'' तिला वरसंशोधनासाठी पाठवल्याचे राजाने नारदांना सांगितले आणि मधल्या काळात काय घडले, ते सावित्रीला कथन करण्यास सांगितले.
राजाच्या सांगण्यावरून सावित्री म्हणाली, ``शाल्व देशात द्युमत्सेन नावाचा एक प्रसिद्ध धर्मात्मा राजा होता. काही काळानंतर तो अंध झाला. त्याचा पुत्रही लहान होता. ही संधी साधून शेजारच्या राजाने त्याचे राज्य बळकावले. तेव्हा द्युमत्सेन आपल्या राणी व पुत्रासह वनात निघून गेला व तेथेच तपस्वी जीवन जगू लागला. त्याचा आता तरुण झालेला सत्यवान नावाचा पुत्र मला योग्य वर वाटला आणि त्यालाच मी मनाने वरले आहे.'' सत्यवानाच्या गुणांचे कौतुक करून नारद म्हणाले, ``या सत्यवानाचे मातापिता सत्यवादी असल्याने ब्राह्मणांनी त्याचे नाव सत्यवान ठेवले आहे. राजा, तरीही एक फार दु:खाची गोष्ट आहे, आजपासून एक वर्षाने सत्यवान मृत्यू पावणार आहे.'' आपल्या भावी पतीचे आयुष्य फक्त एक वर्षाचे आहे, हे कळूनही सावित्री विचलीत झाली नाही. ते पाहून नारद म्हणाले, ``राजा, तुझ्या मुलीची-सावित्रीची बुद्धी निश्चयात्मक आहे, म्हणून तिला कोणत्याही प्रकारे या निर्णयापासून विचलित केले जाऊ शकत नाही. सत्यवानात जे गुण आहेत, ते कोणत्याही दुसर्या पुरुषात नाहीत. म्हणून मलाही असेच वाटते की, तू त्यालाच कन्यादान करावे.''
एका शुभमुहूर्तावर सत्यवान-सावित्रीचा विवाहसंस्कार झाला. पतीगृही आल्यावर सावित्रीने आपली मौल्यवान वस्त्रे व अलंकार उतरवून ठेवले. तिची नम्रता, सेवा, संयम इत्यादी गुण पाहून सर्वांनाच संतोष झाला. मधुर भाषण, सेवेतील तत्परता, संयम आदी गुणांनी तिने सासू-सासर्यांना, तर मनोभावे सेवा करून पतीलाही प्रसन्न ठेवले. काही काळ आनंदात गेला.
सत्यवानाचे प्राणहरण
सावित्री मनाशी एक-एक दिवस मोजत होती. नारदांचे बोल तिच्या स्मरणात होते. जेव्हा तिच्या लक्षात आले की आजपासून चौथ्या दिवशी सत्यवानाचा अंतसमय आहे, तेव्हा तीन रात्री अगोदर तिने व्रत धारण केले. रात्रंदिवस ती अगदी स्थिर होऊन बसून राहिली. पतीच्या मृत्यूदिनाची आधीची रात्र तिने जागून काढली. दुसर्या दिवशी दैनंदिन कामे उरकून सूर्य आकाशात थोडा वर आल्यावर तिने अग्नीला आहुती दिल्या. सत्यवान हातात कुर्हाड घेऊन समिधा व फळे आणण्यासाठी वनात जाण्यास निघाला. सावित्रीही सासू-सासर्यांची अनुज्ञा घेऊन सत्यवानाबरोबर जायला निघाली. वनात काम करता करता सत्यवान सावित्रीला म्हणाला, ``मला थकवा आला आहे. मी आता झोपू इच्छितो.'' हे ऐकून सावित्री त्याच्याजवळ आली. भूमीवर बसून तिने त्याचे मस्तक मांडीवर घेतले. तितक्यात तेथे तिला एक पुरुष दिसला. त्याची वस्त्रे लाल असून त्याच्या डोक्यावर मुकुट होता. त्याचे डोळे लाल होते. हातात पाश होता व तो अत्यंत भयंकर दिसत होता. तो सत्यवानाजवळ उभा राहून त्याच्याकडेच पहात होता. त्याला पाहून सावित्रीने सत्यवानाचे मस्तक भूमीवर ठेवले व ती उभी राहिली. तिचे हृदय धडधडत होते. अतिशय दु:खी होऊन हात जोडून ती त्याला म्हणाली, ``आपण कोणी देवता आहात, असे मी समजते. आपली इच्छा असल्यास मला सांगा की, आपण कोण आहात व येथे काय करू इच्छिता ?'' ती देवता म्हणाली, ``सावित्री, तू पतिकाता व तपस्विनी आहेस. म्हणून मी तुझ्याशी बोलेन. मी यमराज आहे. सत्यवानाचे आयुष्य संपले आहे. हा धर्मात्मा गुणांचा सागरच आहे. त्यामुळे त्याला नेण्यासाठी मी स्वत: आलो आहे. आता मी याला पाशात बांधून घेऊन जाणार आहे.'' असे बोलून सत्यवानाच्या शरीरातून अंगुष्ठमात्र पुरुष आपल्या पाशात बांधून यमराज दक्षिणेकडे जाण्यास निघाले. तेव्हा दु:खाने व्याकुळ झालेली सावित्रीही त्यांच्यामागोमाग जाऊ लागली.
यमधर्माकडून पहिला वर
काही अंतर गेल्यावर यमराज म्हणाले, ``सावित्री, तू परत जा. आता याची उत्तरक्रिया कर. तू पतीसेवेच्या ऋृणातून मुक्त झाली आहेस. पतीबरोबर तुला जेथपर्यंत यायला पाहिजे, तेथपर्यंत तू आली आहेस.'' सावित्री म्हणाली, ``माझ्या पतीदेवांना जेथे नेले जाईल किंवा ते स्वत: जेथे जातील, तेथे मलाही गेले पाहिजे. हाच सनातन धर्म आहे. तपश्चर्या, गुरुभक्ती, पतीप्रेम, व्रताचरण आणि आपली कृपा यांमुळे माझी गती कोठेही थांबू शकत नाही.'' तिच्या या बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला सत्यवानाचे प्राण सोडून कोणताही वर माग म्हटले. या वेळी एकुलता एक पुत्र गमावलेल्या सासर्यांची मूर्ती तिच्या दृष्टीसमोर आली. तिने आपल्या सासर्यांसाठी दृष्टी, बल व तेज मागितले. यमराजांनी तिला `तथास्तु ।' म्हणून परत फिरण्यास सांगितले. सत्यवानाच्या मागे स्वत:चे काय होईल, याचा विचार न करता तिने आपल्या सासर्यांसाठी वर मागितला ! केवढा हा त्याग !!
यमधर्माकडून दुसरा वर
सावित्री यमराजाच्या मागे जातच राहिली. परत जायला सांगणार्या यमराजाला ती म्हणाली, ``जेथे माझे प्राणनाथ रहात आहेत, तेथेच मी असले पाहिजे. याशिवाय माझी आणखी एक गोष्ट ऐका. सत्पुरुषांचा तर एका वेळचा सहवासही अत्यंत लाभप्रद असतो. त्यापेक्षा त्यांच्याशी मैत्री होणे श्रेष्ठ आहे. सत्संगती कधीच वाया जात नाही म्हणून नेहमी सत्पुरुषांबरोबर राहिले पाहिजे.'' तिच्या या कल्याणकारी बोलण्यामुळे यमराजांनी तिला पतीचे प्राण सोडून दुसरी कोणतीही गोष्ट माग म्हटले. सावित्रीने आपल्या सासर्यांचे गेलेले राज्य त्यांना आपोआप प्राप्त व्हावे व त्यांनी आपल्या धर्माचा त्याग करू नये, हा वर मागितला. यमराजाने `तथास्तु ।' म्हणून तिला परत जाण्यास सांगितले. सासर्याने राज्यकारभार `धर्माने' करावा, या मागणीत तिची धर्मावरील अढळ निष्ठा दिसून येते !
दुहिता !
चालता-चालता सावित्री यमराजाला म्हणाली, ``सर्व प्रजेचे आपण नियमाने संयमन करून तिला इच्छित फळही देता, म्हणून आपण `यम' नावाने प्रसिद्ध आहात. म्हणून आता मी जे सांगेन ते ऐका. मन, वचन व कर्म यांनी सर्व प्राण्यांशी द्रोहरहित असणे, सर्वांवर कृपा करणे व दान देणे हा सत्पुरुषांचा सनातन धर्म आहे. अशा प्रकारचाच तर बहुतेक हा सर्व लोक आहे. सर्वच माणसे आपापल्या शक्तीप्रमाणे कोमलतेने वागतात; पण जे सत्पुरुष असतात, ते तर आपल्याजवळ आलेल्या शत्रूंवरही दया करतात.'' तिच्या या बोलण्यावर संतुष्ट होऊन यमराजांनी तिला तिसरा वर माग म्हटले. तिसर्या वराने सावित्रीने आपल्या पित्यासाठी १०० पुत्र मागितले. यमराजांनी तीही इच्छा पूर्ण करून तिला परत जायला सांगितले. सासू-सासर्यांचे कल्याण करून घेतल्यावर आपल्या वडिलांना आपल्या माघारी कोणीच संतान नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तर सत्यवानाबरोबरच जाण्याचा निर्णय मनोमन घेतला होता. कन्येला `दुहिता' म्हणतात. सासर आणि माहेर या दोघांचे हित साधणारी ती `दुहिता'! किती उत्तम प्रकारे तिने आपले कर्तव्य पार पाडले !
यमधर्माकडून चौथा वर
काही अंतर चालून गेल्यावर सावित्री यमधर्माला म्हणाली, ``पतिदेवांच्या सानिध्यामुळे मला हे अंतर काही जास्त जाणवत नाही. माझे मन तर फार दूर दूर धावत असते. म्हणून मी जे बोलणार आहे, ते ऐकण्याची कृपा करावी. आपण विवस्वान (सूर्य) यांचे पराक्रमी पुत्र आहात. म्हणून आपणांस `वैवस्वत' म्हणतात. आपण शत्रूमित्रादिक भेदभाव सोडून सर्वांचा समानतेने न्याय करता. त्यामुळेच सर्व प्रजा धर्माचे आचरण करते. त्यामुळे आपणास `धर्मराज' म्हटले जाते.'' याही बोलण्यावर प्रसन्न होऊन यमराजांनी सावित्रीला चौथा वर दिला. या वराने तिने तिच्या कुलाची वृद्धी करणारे बलवान व पराक्रमी असे १०० पुत्र मागितले. पहिल्यांदाच सावित्रीने स्वत:साठी काहीतरी मागितले ! यमराजांनी आनंदाने तिला हा वर दिला व म्हटले की, तू खूप दूरवर आली आहेस. आता परत जा.
यमधर्माकडून सत्यवानाचे प्राण परत मिळाले !
सावित्री यमधर्माबरोबर पुढे-पुढे जातच राहिली. ती म्हणाली, ``सत्पुरुषांची वृत्ती नेहमी धर्मातच रहात असते. ते कधी दु:खी किंवा व्यथित होत नाहीत. सत्पुरुषांशी सत्पुरुषांचा जो समागम होतो, तो कधीही निष्फळ होत नाही. सत्पुरुष सत्याच्या बळावर सूर्यालासुद्धा आपल्या जवळ बोलावून घेतात. ते आपल्या तपाच्या प्रभावाने पृथ्वीलाही धारण करतात. सत्यात राहिल्याने सत्पुरुषांना कधी खेद होत नाही. हा सनातन सदाचार सत्पुरुषांनी आचारलेला आहे, असे जाणून सत्पुरुष परोपकार करतात व परतफेडीकडे कधी दृष्टी ठेवत नाहीत.'' तिचे हे धर्मानुकूल वचन ऐकून यमाने पाचवा वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, ``हे धर्मराजा, आपण मला जो पुत्रप्राप्तीचा वर दिला आहे, तो दांपत्यधर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आता मी हाच वर मागते की, माझे पती जिवंत व्हावेत. यामुळे आपले वचन सत्य होईल. कारण पतीवाचून तर मी मृत्यूच्या मुखातच पडले आहे. पतीविना मला अन्य कोणत्याही सुखाची इच्छा नाही. स्वर्गाचीदेखील मला कामना नाही. प्रत्यक्ष लक्ष्मी आली तरी मला तिचीही आवश्यकता नाही. इतकेच नव्हे, तर पतीवाचून मी जिवंतही राहू इच्छित नाही. आपणच मला १०० पुत्र होण्याचा वर दिला आहे आणि तरीही आपण माझ्या पतीला घेऊन जात आहात. म्हणून मी जो हा वर मागितला आहे, त्यानेच आपले वचन सत्य होईल.'' हे ऐकून सूर्यपुत्र यमराज फार प्रसन्न झाले आणि त्यांनी `तथास्तु ।' म्हणत सत्यवानाचा पाश काढून घेतला. ते म्हणाले, ``हे कल्याणी ! घे, मी तुझ्या पतीला मुक्त केले आहे. आता हा सर्व प्रकारे निरोगी होईल. याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा तुझ्यासह चारशे वर्षे जिवंत राहील. धर्मपूर्वक यज्ञअनुष्ठान करून सर्व लोकांत कीर्ती मिळवेल. त्याच्यापासून तुला १०० पुत्र होतील !'' यमराज परत जायला निघाले. सावित्रीने त्यांना वंदन केले आणि त्यांनी केलेल्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यमराज निघून गेल्यानंतर सावित्री सत्यवानाच्या अचेतन देहाजवळ आली. तिने त्याचे मस्तक पुन्हा आपल्या मांडीवर घेतले. हळूहळू सत्यवानाच्या देहात चैतन्य आले. तो उठून बसला ! आज अनेकांना हिंदु धर्मात सांगितलेले परलोक, परलोकांचा प्रवास आणि अन्य `सूक्ष्म' भाग प्रत्यक्षात आहेच, हे कळत नाही, पटत नाही. काहींना पटले तरी दिसू शकत नाही. येथे तर प्रत्यक्ष यमधर्माशी धर्मानुकूल संभाषण करून शीलवती, कुलवती, गुणवती सावित्रीने आपल्या पतीचे पंचप्राण परत आणले. प्रत्येक हिंदु पतिकातेच्या हृदयात अढळ स्थान मिळवणार्या सती सावित्रीला शतश: प्रणाम !

सत्यवान आणि सावित्री यांची कथा:

अक्षय्य तृतीया
अक्षय्य तृतीया :
वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हटले जाते. हा दिवस शेतीच्या कामाला सुरुवात करण्याचा दिवस म्हणून महत्त्वाचा समजतात. या दिवशी नवीन कामे, व्यवसाय यांची सुरुवात करण्याची पद्धत आहे, हा उत्तम मुहूर्ताचा दिवस आहेच.
अखंड, क्षय नाही अशी तिथी म्हणजे अक्षय्यतृतीया. या दिवशी चांगले काम सुरू केले तर अखंडपणे सुरू राहते असे म्हणतात. साडे तीन मुहूर्ताचे दिवस मानले आहेत, त्यापैकी हा दिवस - अर्धा मुहूर्त आहे. दान, होम करणे आणि पुण्य मिळवणे या गोष्टी माणसाने या दिवसाशी जोडल्या आहेत. जे आहे ते साठवण्यापेक्षा दिल्याने आणखी मिळवता येईल असे या दिवसाचे महत्त्व पूर्वीपासून सांगितले गेले आहे.

चैत्रगौर
चैत्रगौर :
ऋतूप्रमाणे सुरू झालेल्या उत्सवात चैत्रगौर हा एक उत्सव. शंकर-पार्वती या देवतांची एक जुनी गोष्ट यासोबत जोडलेली आहे. चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा केली जाते. वसंत ऋतू म्हणजे झाडांना पालवी फुटण्याची, कैर्या येण्याची सुरुवात, आणि हरभरा तयार होऊ लागलेला असा हा काळ. म्हणून कैरी घालून, हरभर्याची डाळ भिजवून, ती वाटून केलेला खमंग पदार्थ, साखर-खोबरे, कैरीचे पन्हे असे पदार्थ या निमित्ताने करण्याची, आणि घरात स्त्रियांना बोलवून त्यांना हळदी-कुंकू लावून ते खायला देण्याची जुनी पद्धत आहे. स्त्रियांना एकत्र येण्यासाठी काही उत्सव सुरू झालेत आणि अजूनही ते घराघरात साजरे होतात, त्यापैकीच हा एक.
उन्हाळा सुरू असल्याने थंडावा देणारे कैरीचे पन्हे, झाडावर मोठ्या प्रमाणावर येऊ लागलेली सोनचाफ्याची फुले लोकांना देणे यातून निसर्गाशी जवळीक साधण्याची, सुगंधाचा आस्वाद घेण्याची मानसिकता दिसते. कैरीची चव घेण्याच्या निमित्ताने रसिकतेने निसर्गाला आठवण्याचा, एकत्र येण्याचा हा उत्सव असतो.
काही घरांत पार्वती आपल्या माहेरी चैत्र महिन्यात एक महिनाभरासाठी येते आणि नंतरच तिची सासरी पाठवणी केली जाते असे मानून हा उत्सव साजरा केला जातो.
शंकर - पार्वती यांना पार्वतीच्या घरी महिनाभर ठेवून घेतले होते. त्यांचा आदर-सत्कार केला होता, अशी कथा प्रचलित आहे. अशाच प्रकारे चैत्रात बसवल्या जाणार्या गौरीची महिनाभर घरात पूजा होते, नंतर गौर पुन्हा आपल्या घरी जाते असे समजतात. चैत्रगौर सर्व घरात साजरी होत नाही. विशिष्ट जातीतील लोकच या चैत्रगौरी बसवतात. सर्व समाजात ही प्रथा पाळली जात नाही
गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला
घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे
सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी
सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी
गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी
रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती
जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला
श्री हनुमान जयंती
श्री हनुमान जयंती :
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी श्री हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. रामायण काळातील हनुमानाचा पराक्रम, त्याची रामावरची श्रद्धा, भक्ती, त्याचे ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे व्रत या सर्व गोष्टींची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस लोक साजरा करतात. बलोपासना हा हनुमानाचा विशेष गुण होता. व्यायाम करून शरीर निरोगी ठेवण्याकडेही लक्ष द्यायला हवे असे समर्थांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिले. स्वत: बलोपासना करून श्री हनुमानाची सार्थ भक्ती करणार्या समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी श्री हनुमानाची स्थापना केली. या सर्व ठिकाणी श्री हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावात आपणास श्री हनुमान मंदिर आढळतेच. यांपैकी बहुसंख्य मंदिरांत हा उत्सव यथाशक्ति साजरा केला जातो.
Thursday, April 1, 2010
श्रीरामनवमी
श्रीरामनवमी :
चैत्र शुक्ल नवमी या दिवशी रामजन्माचा उत्सव साजरा करतात. राम हा सत्यवचनी, सदाचारी, प्रेमळ, व पराक्रमी राजा होता. आदर्श मूल्यांची जपणूक म्हणजे ‘राम’ असे सांगत पिढ्यानपिढ्या रामाचा आदर्श ठेवण्यास सांगितले जाते आहे. त्या प्रजाहितदक्ष श्री रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झाल्याचे मानले जाते. दुपारी १२ वाजता रामाचा जन्म सोहळा साजरा करण्याची पद्धत आहे. रामाच्या मंदिरात त्यासाठी रामचरित्र सांगितले जाते. प्रसाद म्हणून सुंठ-साखर एकत्र करून देण्याची पद्धत आहे.
श्रीरामनवमीचा उत्सव अयोध्येत मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. भारतात हा उत्सव अनेक राज्यात केला जातो. पूर्वापार महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी श्रीरामनवमीच्या निमित्ताने रामचरित्राचे कीर्तन केले जाते. नऊ दिवस हा उत्सव करुन नवमीला सांगता केली जाते. समर्थ रामदास, श्रीगोंदवलेकर महाराज आदी श्रीरामभक्त महाराष्ट्रात होऊन गेले. या दोहोंचा संबंध असणार्या ठिकाणी (उदा. सज्जनगड, चाफळ, गोंदवले...इ.) हा उत्सव विशेष उत्साहात साजरा केला जातो.
महाराष्ट्रातील प्रत्येक राममंदिरात श्रीरामनवमी साजरी केली जाते. रामायण या महाकाव्यातील अनेक कथा आजच्या काळातही लाखो लोकांना खिळवून ठेवतात. आदर्श जीवनाबद्दलच्या या कथा आजही बोध घेण्याजोग्या आहेत.

Wednesday, March 31, 2010
गुढीपाडवा
गुढीपाडवा :
मराठी वर्षाचा पहिला दिवस - चैत्र शुद्ध प्रतिपदा - हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी उभारून, दाराला तोरण बांधून, गारवा देणार्या, औषधी असणार्या कडुनिंबाची कोवळी पाने गुढीसोबत बांधून गुढीची पूजा केली जाते. नवीन आलेल्या कोवळ्या बांबूला फुलांची माळ, नवे कोरे कापड (साडी इत्यादी), आणि गडू-तांब्या असे त्यावर बांधून सूर्योदयाला ही बांबूची काठी विजयाचा ध्वज म्हणून घरासमोर उभी करतात. सूर्यास्ताला पुन्हा पूजा करुन ती उतरवतात.
नवीन वर्षाचा हा दिवस उन्हाळ्याच्या सुरुवातीचा असल्याने औषधी असा कोवळा कडूनिंब, मीठ, सैंधव, जिरे, मीरे, ओवा एकत्र वाटून थोडेसे खाण्याची प्रथा आहे. नवे निश्र्चय, चांगल्या सवयींची सुरुवात करून हा दिवस साजरा करतात. पूर्ण वर्ष उत्साहात जावे यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा समजला जातो.
सर्वरोगपरिहारक असा कडुनिंब वृक्ष असल्याचे आर्यभिषक या प्राचीन ग्रंथात म्हटले आहे. जंतुनाशक अशा कडुनिंबाचे महत्त्व शास्त्रीय संशोधनानेही सिद्ध केले आहे. कमी पाण्यावर राहून दहा वर्षात वाढणारी ही झाडे हवा शुद्ध राखण्यासाठी महत्त्वाची आहेत. बी, साल, पाने असे पूर्ण झाड त्याच्या औषधी गुणांमुळे महत्त्वाचे आहे. वर्षातील पहिल्या दिवशी या महत्त्वाच्या झाडाची आठवण सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने करून दिली आहे.
रामायणात उल्लेख आहे त्यानुसार १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभु रामचंद्र गुढीपाडव्यादिवशी अयोध्येला परत आले. रावणाचा पराभव झाल्याने आणि राम अयोध्येत परतल्याने लोकांनी विजय साजरा केला. म्हणून हा दिवस आनंदाचा, चांगल्या कामाचा असे म्हटले जाते. चांगली वेळ म्हणजे मुहूर्त. गुढीपाडवा हा एक उत्तम मुहूर्त समजला जातो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला (गुढीपाडव्याला) वसंत ऋतूची सुरुवात होते. सृष्टीला नवजीवन देणारा हा ऋतू आहे. आपल्या वर्षाची गणना करताना पहिला उत्तम दिवस असेही या दिवसाला म्हटले आहे. ‘प्रतिपदा’ या शब्दाचा अपभ्रंश पाडवा झाला असावा. गुढीमध्ये वापरलेल्या प्रतिकांचा विशेष उल्लेख करायला हवा. बांबूला अनेक वेळा नवे बांबू तयार करण्याची निसर्गाने शक्ती दिली आहे, तरीही तो लवचीक असतो त्याप्रमाणे आपल्यात ताकद यावी. वस्त्र, खण हे मंगलमय वातावरण आणते, काठीवर किंवा बांबूवर धातूचा गडू किंवा तांब्या पालथा असतो. या धातूमुळे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाने येणार्या प्रकाशलहरी खेचून घेण्याची शक्यता वाढते असे म्हणतात.

मराठी सण
महाराष्ट्र म्हटला म्हणजे सणांची पर्वणीच , तर मग घेऊ या आढावा आपण या सणांचा .......
महाराष्ट्राची म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे जगण्यासाठीची मूल्ये, आचरणाचे नियम, रूढी, चाली-रीती, व्यवहार, आपली भाषा, सण, उत्सव, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, थोर व्यक्ती, परंपरा यांतून संस्कृती प्रत्येक नव्या पिढीकडे पोहोचते. बदलत्या काळाप्रमाणे येणार्या पिढीला त्यात काही फेरफार करावे लागतात, पण वागण्याचे नियम-मूल्ये यात मात्र मोठे बदल होत नाहीत. सण-उत्सव, प्रथा, परंपरा या एका पिढीकडून दुसर्या पिढीला वारशाने समजतात. त्याविषयीचे वाचन, अभ्यास औपचारिकपणे सर्व जण करत नसले, तरी मौखिक परंपरेने, अनुकरणाने, निरीक्षणाने त्या वर्षानुवर्षे सुरूच राहतात.
मुख्यत: शेतीप्रधान संस्कृती व ग्रामीण भागात वास्तव्य करणारी लोकसंख्या महाराष्ट्रात अधिक आहे. निसर्गाशी अगदी जवळचा संबंध असणारे कष्टकरी अत्यंत देवभोळे, श्रद्धाळू, पापभिरू असल्याने बर्याच व्रत-वैकल्यांत आणि उपचारांत समाधान व आनंद मानणारे आहेत. तसेच शिक्षित समाजही रूढी, परंपरा, सण-उत्सव यात कसा वेळ देतो, का वेळ देतो हेही समजून घेण्याजोगे आहे.
दैनंदिन कामातून थोडे वेगळे होऊन; नातलग, शेजारी, गावकरी, सहकारी यांच्या सोबतीने एकत्र येऊन आनंद साजरा करणे, या हेतूने महाराष्ट्रात अनेक उत्सव, सण साजरे केले जातात. हवामान, ऋतू आणि त्या-त्या ऋतूत असणारी फळे, फुले, झाडे, त्यांचा औषधी उपयोग याचा अभ्यास करून पूर्वापार हे सण-उत्सव, व्रतं पाळली जातात. आयुर्वेद-औषधी शास्त्र हे अतिशय प्रगत शास्त्र म्हणून उपयोगात आणले जात होते असेही त्यावरून लक्षात येते. वनौषधी, फुले ऋतूमानाप्रमाणे उगवतात व कोमेजतात. आपल्या सणावारात ऋतूमानाप्रमाणे येणार्या पिकांचाही फार विचार केलेला आहे असे लक्षात येते.
आचरणाचे नियम हेदेखील त्यामुळे निसर्गातील बदलांचा विचार करून ठरवलेले आहेत. आपल्या आहारात कोणते घटक केव्हा यावेत, कसे यावेत याचा अभ्यास पूर्वीपासून होत असावा. त्यामुळे बदलत्या हवेनुसार सणांना करण्याचे पदार्थही त्यादृष्टीने ठरवलेले आहेत. या अर्थाने खाद्यसंस्कृतीही सण-उत्सवांशी जोडल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
पारंपरिक पद्धतीने आज सण सर्वत्र साजरे होत नाहीत. त्यात व्यावहारिक अडचणीही आहेत. तरीही महाराष्ट्रात सण-उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे करणे, लोकांनी एकत्र येण्यासाठीचे माध्यम म्हणून आजही सुरू आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यांत, देशांत जाणारे लोक त्यांच्यासोबत त्या पद्धती घेऊन जातात. त्यामुळे अनेक मराठी सण-उत्सव जगाच्या कानाकोपर्यातही साजरे होतात असे दिसते.
जाती-धर्मात विभागलेल्या आपल्या समाजाला भेद-भाव विसरून एकत्र येण्यासाठी काही उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे करण्याची पद्धत आपल्या समाजसुधारकांनी शिकवली. उत्सवांचा समाज प्रबोधन करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम म्हणून वापर समाजसुधारकांनी केला.
काही धार्मिक चालीरिती लोकांत भेदभाव करणार्या, अंधश्रद्धा पसरवणार्या असल्याचे पाहून संतांनी एक प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. संत ज्ञानेश्र्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गोरोबा,संत चोखामेळा, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, समर्थ रामदास यांनी समाजाला एकत्र येण्याची, भेदभाव विसरण्याची, समानतेची शिकवण दिली. काही उत्सव सामान्य जनतेला चांगल्या मार्गाने जगण्याची शिकवण देण्यासाठी, नीतीनियमांनी समाजाला बांधून ठेवण्यासाठीही सुरू केले. शिक्षणाने, विज्ञानाच्या प्रसार-प्रचारामुळे काही सण, उत्सव, चालीरिती यांचे स्वरूप आधुनिक काळात बदलत आहे. त्यात असणार्या अंधश्रद्धांना वगळून सण वा उत्सव साजरे व्हावेत, व्रतं पाळली जावीत हीच संतांचीही प्रबोधनाची चळवळ होती.
महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांमुळे आजही अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरण निराळे आहे. त्याला अध्यात्माची, तत्त्वज्ञानाची, इतिहासाची आणि मानवजातीच्या कल्याणाची सांगड घालून आपले सण-उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे. मानवाच्या कल्याणाचे, त्याच्या प्रगतीचे बीज घराघरात पोहोचवण्याचे काम त्यामुळे संस्कृतीच्या माध्यमातून होते असे दिसते.
‘संस्कृती’ या शब्दाला आलेला सध्याचा अर्थ फार वरवरपणे व्यवहारात वापरला जातो आहे. पण मुख्यत: उन्नत समाजासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आणि व्यापक समाजहितासाठी असलेले आचार-विचार-विहाराचे व्यक्तीसाठीचे नियम, शिष्टाचार यांसाठी वापरलेला शब्द म्हणजे ‘संस्कृती’.
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत आपले सणवार, व्रतं आणि उत्सवदेखील ऋतुमानाप्रमाणे - सूर्य-चंद्र-ग्रहस्थितीच्या अनुसार -ठरलेले आहेत.
मराठी दिनदर्शिकेत असणारे १२ महिने हे सूर्याच्या स्थितीनुसार होणार्या बदलांना अनुसरून येणार्या ऋतूंप्रमाणेच ठरले आहेत. पुढे महिने व ऋतू दिले आहेत.
मराठी दिनदर्शिकेनुसार ग्रहस्थितीप्रमाणे - पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या स्थानाप्रमाणे - कालमापनाच्या पद्धती ठरल्या. त्याप्रमाणे तिथीला मराठी दिनदर्शिकेत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सण-दिवस हे तिथीनुसार ठरलेले दिवस - तेही निसर्गावर आधारित असेच आहेत.
भारतात कालमापनासाठी फार पूर्वापार चालत आलेली पंचांग पद्धती आजही उपयोगात आणली जाते. धर्मशास्त्रांसंदर्भातील ग्रंथांतून त्याबद्दलचे संदर्भ सापडतात. सण-उत्सव हे त्या पंचांगानुसार ठरवण्याची प्राचीन पद्धत आहे. पूर्वी मोजक्या शिक्षित - ब्राह्मण जातीच्या लोकांपुरते असलेले हे ज्ञान आता शास्त्ररूपात, गणिती पद्धतीने सर्वच लोकांसाठी खुले आहे. त्यानुसार सण-उत्सव ठरून ते छापील पद्धतीने सर्वांसाठी उपलब्ध असतात. २७ नक्षत्रे, १५ तिथी, ७ वार, २७ योग असे पंचांग भारतात इसवीसनपूर्व ४०० वर्षांपासून प्रचलित असावे असे संदर्भ मिळतात.
शालिवाहन राजाच्या नावावरून सुरू झालेली ही कालगणनेची पद्धत फारशी प्रचलित नाही. परंतु मराठी वर्षाची सुरुवात मात्र आजही साजरी केली जाते. चैत्र हा मराठी कॅलेंडरमधील (दिनदर्शिकेतील) महिना. इंग्रजी महिन्याशेजारी प्रत्येक दिनदर्शिकेत त्याला (व इतर सर्व मराठी महिन्यांना) स्थान मिळालेच आहे. या विभागात प्रत्येक मराठी महिन्यात येणारे सण-उत्सवांची माहिती दिलेली आहे.

| महिने | ऋतू | हवामान |
| चैत्र-वैशाख | वसंत | उन्हाळा सुरू होतो. |
| ज्येष्ठ-आषाढ | ग्रीष्म | उन्हाळा संपतो |
| श्रावण-भाद्रपद | वर्षा | पावसाळा सुरू होतो. |
| अश्र्विन-कार्तिक | शरद | पावसाळा संपतो. |
| मार्गशीर्ष-पौष | हेमंत | थंडी सुरू होते. |
| माघ-फाल्गुन | शिशिर | थंडी संपते. |