कोल्हापूर - शिक्षणाचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे येथील नामवंत शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेल्या "सकाळ एज्युकेशन महायात्रे'चा उद्या (ता. 9) समारोप होत आहे. दोन दिवसांपासून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आवारात सुरू असलेल्या महायात्रेत विद्यार्थ्यांना करिअरविषयक माहिती घेण्याची सुवर्णसंधी आता एकच दिवस उरली आहे.
काल (ता. 7) पासून सुरू झालेल्या या शैक्षणिक महायात्रेत अनेक विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. पुण्यातील नामवंत शैक्षणिक संस्थांची माहिती एकाच छताखाली, त्यातून योग्यरीत्या केले जाणारे समुपदेशन, विविध शैक्षणिक चर्चासत्रे, विविध सोयी-सुविधांविषयी माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांची एकच झुंबड महायात्रा पाहण्यासासाठी उडाली.
सायंकाळी झालेल्या तीनही सेमिनारना विद्यार्थ्यांनी पालकांसह हजेरी लावली. उत्कृष्ट नियोजन, सुयोग्य माहिती, पुण्यातील शैक्षणिक वातावरण, करिअरसाठी नेमक्या अभ्यासक्रमाची निवड यासाठी प्रदर्शन उपयुक्त ठरते आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्याने या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. आर्टस्, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमासह ऍनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट, फूड प्रोसेसिंग, एमबीए, एमसीए, इंजिनिअरिंग, स्पर्धा परीक्षाविषयक पुस्तके, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, केटरिंग, कार डिझाईन याशिवाय विविध अभ्यासक्रमांची माहिती याठिकाणी विद्यार्थ्यांना दिली जाते; याशिवाय प्रत्यक्ष पुण्यात राहताना येणारा खर्च, खर्चासाठी बॅंकिंग पतपुरवठा सुविधा आदीविषयी माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला.
प्रवेश परीक्षा कशी असते हो? मॅनेजमेंटचे ट्रेनिंग कसे करावे? बारावीनंतर डिझायनिंग क्षेत्रात कसे जावे? इंजिनिअरिंग प्रवेशासाठी काय डॉक्युमेंटस् गोळा करावे? अशा एक ना अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे महायात्रेच्या निमित्त आयोजित विविध सेमिनारमधून विद्यार्थ्यांना मिळाली.
"व्यवस्थापन क्षेत्र व करिअरच्या संधी' विषयावर पुण्यातील एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रा. दुर्वेश मोघे यांनी "एमबीए'साठी प्रवेश परीक्षा कशी आहे, त्यासाठी तयारी कशी करावी, याबाबत माहिती दिली. इंडस्ट्रीज्ला हवे असलेले इनपुट तयार केल्यानंतर एमबीए झालेल्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. एमआयटीमध्ये एचआर, फायनान्स, मार्केटिंग, रिटेल बिझनेस मॅनेजमेंट, फॉरेस्ट्री बिझनेस मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअरच्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
"एमआयटी'चे प्रा. मंदार सरलष्कर यांनी जिओइन्फॉर्मेटिक्स अभ्यासक्रमासंबंधी माहिती दिली. स्टेट ऑफ आर्ट, जीपीएस-जीआयएस-रिमोट सीझिंग या संकल्पनांविषयी त्यांनी विवेचन केले. वर्षाचा हा अभ्यासक्रम असून इसीटीस (युरोपियन क्रेडिट सिस्टीम) क्रेडिट सुविधा, स्वीडनच्या युनिव्हर्सिटीचे प्रमाणपत्र यासह विविध सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात, असे त्यांनी सांगितले. प्रा. सरलष्कर यांनी युरोपियन युनियन स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत "एमएस' केलेले असल्याने त्यांनी हा संवाद या विषयातील करियरच्या विविध अंगांनी खुलवला.
"इंजिनिअरिंग, आयटी, मॅनेजमेंट आणि डिझायनिंग' या विषयावर विश्वकर्मा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रा. राहुल होनराव यांनी सविस्तर माहिती दिली. सध्या इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, मास कम्युनिकेशन, मल्टीमीडिया याविषयी होनराव यांनी सांगितले, की या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी आहेत. योजनाबद्ध तयारी, ध्येयनिश्चितीकरण आणि व्यक्तिसापेक्ष बदलत जाणारे करिअर हे विद्यार्थ्यांनी ओळखले पाहिजे, असे सांगून त्यांनी विश्वकर्मा इन्स्टिट्यूटच्या विविध कोर्स आणि मॅनेजमेंटविषयी सविस्तर माहिती दिली.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. प्रवीण डी. चौधरी यांनी फार्मसी शिक्षणातील विविध संधीविषयी माहिती दिली. आर्थिक मंदीच्या काळात औषधनिर्माण क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रांना भीती आहे. औषधनिर्माण क्षेत्र स्थिर गतीने चालते. जागतिकीकरणात भारताची बाजू भक्कम आहे. या क्षेत्रात संशोधन मोठ्या प्रमाणात होत आहे. संशोधनावरचा खर्च मोठा आहे. या क्षेत्रात संशोधन करण्याची मोठी संधी आहे. ज्यांना संशोधनात रस आहे, अशांसाठी ही चांगली संधी आहे. यातील मार्केट क्षेत्र मोठे असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनच्या प्रा. शुभांगी ओगले यांनी विशेष मुलांसाठीच्या शिक्षणातील करिअरविषयी सविस्तर माहिती दिली. देशभरात दहा टक्के मुलं अपंग असून तीन टक्के मुलं शाळाबाह्य आहेत. अपंग, अंध, मूक-बधिर, मतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष शिक्षकांची आवश्यकता आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत अशा मुलांसाठी प्रत्येक शाळेत एक विशेष शिक्षक नेमला जाणार आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी "प्रोग्रेसिव्ह'मधील विशेष मुलांसाठीचे बीएड आणि एमएड अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत.
आजचे सेमिनारसायंकाळी पाच ते सहा - एमआयडीडीएस इन्स्टिट्यूट ऑफ ऍनिमेशन - विषय - ऍनिमेशन क्षेत्रातील करिअर
सायंकाळी सहा ते सात - मेट्रोपोलिटीयन इन्स्टिट्यूट अँड कॉलेज - विषय - मॅनेजमेंट, आयटी व हॉटेल मॅनेजमेंटमधील करिअर
सायंकाळी सात ते आठ - दि युनिक ऍकॅडमी - युपीएससी व एमपीएससी परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी.
Showing posts with label आजच्या ठळक बातम्या. Show all posts

Saturday, May 8, 2010
दुबई, सिंगापूर, श्रीलंकेतून कांद्याला मागणी
पिंपळगाव बसवंत - माथाडी कामगारांनी लेव्हीप्रश्नी पुकारलेला बंद मागे घेतल्याने गत सप्ताहात तीन दिवस बाजार समितीचे कामकाज झाले. त्यात उन्हाळ कांद्याची 21 हजार 540 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान 350, कमाल 645, सरासरी 501 रुपयांपर्यंत राहिले. उन्हाळ कांद्याची साठवण करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल आहे. देशांतर्गत कोलकता, पंजाब, बनारस, हैदराबाद, लुधियाना, जालंधर, दिल्ली, गुवाहाटी तर परदेशातून बांगलादेश, मलेशिया, सिंगापूर, दुबई, श्रीलंका येथून उत्कृष्ट मागणी असल्याचे कांदा व्यापारी अतुल शहा यांनी कळविले आहे.
टोमॅटोची आवक रोडावली असून, गत सप्ताहात एक हजार 85 क्रेट्सची आवक झाली. बाजारभाव किमान 31, कमाल 105, सरासरी 79 रुपयांपर्यंत राहिले.
भुसार मालाची आवक व बाजारभाव - गहू (81 क्विंटल) भाव किमान 1185, कमाल 1612, सरासरी 1275 रुपये. सोयाबीन (45 क्विंटल) भाव किमान 1800, कमाल 1935, सरासरी 1945. हरभरा (10 क्विंटल) भाव किमान 1905, कमाल 2294, सरासरी 1971. मका (5 क्विंटल) भाव सरासरी 861 रुपये, बाजरी (1 क्विंटल) भाव सरासरी 925. तूर (2 क्विंटल) भाव सरासरी 3540. ज्वारी (4 क्विंटल) भाव किमान 830, कमाल 853, सरासरी 850.
द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, द्राक्षमण्याचे बाजारभावही कोसळले आहेत. पिंपळगाव बाजार समितीत गत सप्ताहात द्राक्षमण्याची 990 क्रेट व पालखेड उपबाजारात 380 क्रेट आवक होऊन बाजारभाव किमान 50, कमाल 228, सरासरी 130 रुपयांपर्यंत राहिले. सायखेडा उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची चार हजार 860 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान 350, कमाल 576, सरासरी 470 रुपयांपर्यंत राहिले. गहू (10 क्विंटल) सरासरी 1200, सोयाबीन (30 क्विंटल) भाव सरासरी 1800 पर्यंत राहिले.
ओझर उपबाजार आवारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव - फ्लॉवर (76 ट्रॅक्टर- रिक्षा) भाव किमान 300, कमाल 2100, सरासरी 1500 रुपये, कोबी (85 ट्रॅक्टर- टेम्पो) भाव किमान 600, कमाल 1630, सरासरी 1000 रुपये, भोपळे (16 हजार 600 नग) भाव 1 ते 9 रुपये सरासरी 4, वाल (3 कॅरेट) भाव सरासरी 78, टोमॅटो (4 क्रेट) भाव किमान 75, कमाल 87, सरासरी 80 रुपये, कारले (15 क्रेट) भाव सरासरी 101 रुपये, वांगे (438 क्रेट) भाव किमान 25, कमाल 135, सरासरी 110 रुपये, दोडके (65 क्रेट) भाव किमान 40, कमाल 180, सरासरी 125 रुपये, गिलके (65 क्रेट) भाव किमान 50, कमाल 160, सरासरी 110 रुपये, भेंडी (105 क्रेट) भाव किमान 100, कमाल 250, सरासरी 150 रुपयांपर्यंत होते.

अखेर नव्या कामगार कल्याण मंडळाची स्थापना
मुंबई - उच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे अखेर राज्य सरकारला नव्या कामगार कल्याण मंडळाची स्थापना करणे भाग पडले आहे. स्थापनेबाबतची माहिती सरकारी वकिलांनी नुकतीच उच्च न्यायालयात दिली. या विषयावर नाशिकच्या निवृत्ती बहीकर यांनी सादर केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी नुकतीच न्या. एफ. आय. रिबेलो व न्या. अमजद सैयद यांच्यासमोर झाली. या मंडळाची मुदत चार वर्षांपूर्वीच संपली होती; तरीही मंडळाच्या नव्या सदस्यांची नावे सरकार जाहीर करीत नव्हते. त्यातच मंडळात अनेक गैरप्रकार झाल्याबाबत ही याचिका सादर झाली होती.
नव्या मंडळाची स्थापना दोन महिन्यांत करावी, असा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मागील वर्षाच्या जुलै महिन्यात दिला होता; तरीही अद्याप मंडळाची स्थापना सरकार करीत नाही, अशी तक्रारही अर्जदारांनी केली होती; तर सरकार अनेक कारणे सांगून यासाठी वेळ घेण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र दोन आठवड्यांत मंडळाच्या सदस्यांची नावे जाहीर न केल्यास आपण हंगामी मंडळ नेमू, असा इशारा खंडपीठाने मागील सुनावणीदरम्यान दिला होता. त्यामुळे अखेर सरकारने मंडळाची स्थापना केली. ही माहिती सरकारी वकील नितीन देशपांडे यांनी खंडपीठाला दिली.
तर कामगार कल्याण आयुक्त मोहन धोत्रे यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश आपण देणार नाही. धोत्रे यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्यावर आरोपपत्रही ठेवण्यात आले आहे. त्याला ते उत्तरही देत आहेत. अशा स्थितीत जर धोत्रे यांनी काही गैरप्रकार केल्याचे सरकारला चौकशीअंती आढळले, तर सरकार कायद्यानुसार योग्य ती पावले उचलण्यास बांधील राहील, असे खंडपीठाने आदेशात नमूद केले.
त्याचप्रमाणे मंडळात काही कर्मचाऱ्यांच्या बेकायदा नियुक्त्या झाल्याचा आरोपही न्यायालयापुढे होता. या नियुक्त्या बेकायदा होत्या, असे प्रथमदर्शनी दिसून येत नसल्याचे सांगण्यात आले. केवळ काही कर्मचारी हे मंडळाच्या काही सदस्यांचे नातलग-मित्र होते, हे देखील मान्य करण्यात आले. यासंदर्भात अनेक कर्मचाऱ्यांना "कारणे दाखवा' नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्या याचिका औद्योगिक न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यांची सुनावणी त्वरेने घेण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे. त्यावरील निकाल आल्यानंतर सरकार कायद्यानुसार पुढील कृती करेलच, अशी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली आहे. सर्व मुद्द्यांवर कार्यवाही होत असल्याचे सांगून खंडपीठाने याचिका निकाली काढली.

कर्जमाफी हा विषय यापुढे बंद - शरद पवार
"दी महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन'च्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्पर्धेच्या युगात सहकार चळवळीसमोर मोठी आव्हाने उभी आहेत. सहकारी संस्थांमधील सरकारचा हस्तक्षेप कमी करणारा, खास करून अधिकाऱ्यांच्या अधिकारावर मर्यादा आणणारा व निवडून आलेल्या सभासदांना जादा अधिकार देणारा कायदाही केला जाईल. त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल, अशी माहिती पवारांनी दिली. कोणत्याही संस्थेचे वीसपेक्षा जास्त सभासद नसतील. त्यात मागासवर्गीय, महिला, कामगार यांना योग्य प्रतिनिधित्व असेल, अशी तरतूद कायद्यात असेल, असेही त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते. तर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, अर्थमंत्री सुनील तटकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री गुलाबराव देवकर, विधानसभेचे उपाध्यक्ष मधुकर चव्हाण, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रभाकर काळे, व्यवस्थापकीय संचालक रमेशचंद्र सागर आदी मान्यवर उपस्थित होते. फेडरेशनचे अध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सहकारी संस्था जगवून त्याचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर या पुढे कर्जमाफी हा विषय जाहीरपणे काढता कामा नये, असे पवार यांनी उपस्थित नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सुनावले. देशात केंद्र सरकार एक महत्त्वाचा अन्न सुरक्षा कायदा करणार आहे. त्यामुळे देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढवावे लागणार आहे, धान्याच्या साठवणुकीसाठी गोदामांची व्यवस्था करावी लागणार आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. राज्यातील सिंचनक्षेत्र 20 टक्क्यावरून 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून जास्तीत-जास्त निधी मिळणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत काळाबाजार चालत असल्याच्या तक्रारी आहेत, अशी कबुली देऊन सर्वसामान्यांसाठीची ही व्यवस्था नीट चालविली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेत टिकण्यासाठी तालुका स्तरावरील सहकारी संस्था मजबूत करण्याची आवश्यकता आहे, याकडे विलासराव देशमुख यांनी लक्ष वेधले. दुसऱ्याच्या खिशात हात नको फेडरेशनच्या व्याजमाफीची मागणी अंकुशराव टोपे यांनी केली होती. त्यावर, राज्य सरकारला व्याजमाफी करायची असेल तर त्यांनी आपल्या तिजोरीतून करावी, बॅंकेला सांगू नये, दुसऱ्याच्या खिशात हात घालणे बरोबर नाही, अशा शब्दांत पवारांनी नापसंती व्यक्त केली. |
Wednesday, May 5, 2010
जिल्ह्यात एमएचटी-सीइचे 9198 विद्यार्थी
जळगाव - जिल्ह्यात उद्या (ता. 6) वैद्यकीय, अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) होणार आहे. शहरातील 26 केंद्रांवर ही परीक्षा होत असून त्यात एकूण नऊ हजार 198 विद्यार्थी सहभागी असतील. दरम्यान या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तयारी आज करण्यात आलेली आहे. त्यातच परीक्षेसाठी पर्यवेक्षकांना आज जिल्हा बॅंकेच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. आज दुपारनंतर सर्व परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक बैठक क्रमांक टाकताना दिसून येत होते. या परीक्षेतील काही गोंधळ होवू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त सर्वच परीक्षा केंद्रांवर ठेवण्यात येणार असून, त्यादृष्ट्रीनेही तयारी झालेली आहे. विषय, परीक्षेची वेळ अशी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र - सकाळी 10 ते 11.30 जीवशास्त्र - दुपारी 12 ते 1.30 गणित - दुपारी 3 ते 4.30 बैठक व्यवस्था अशी(सुरवातीला केंद्राचे नाव नंतर परीक्षार्थीचा बैठक क्रमांक) ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय - 1700001 ते 1700480 ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय - 1700481 ते1701008 केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय - 1701009 ते 1701248 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय--1701249 ते 1701488 आयएमआर कॅम्पस--1701489 ते 1701944 केसीई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व इनफारमेशन टेॅजी--1701945 ते 1702424 प.न. लुंकड कन्याशाळा--1702425 ते 1702736 ऍड. सीताराम (बबनभाऊ) बाहेती महाविद्यालय--1702737 ते 1703168 मौलाना अब्दुल अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय--1703169 ते 1703648 डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय--1703649 ते 1703960 शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालय--1703961 ते 170344 रावसाहेब रूपचंद विद्यालय--1704345 ते 1704798 श्रम साधना ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (बांभोरी)--1720001 ते 1720600 खुबचंद सागरमल विद्यालय--1720601 ते 1720895 प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल--1730001 ते 1730240 रोझलॅंड इंग्लिश स्कूल--1730241 ते 1730432 पुष्पावती खुशाल गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालय--1730433 ते 1730672 भाऊसाहेब राऊत हायस्कूल--1730673 ते 1730912 काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय--1730913 ते 1731272 भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूल--1731273 ते 1731512 महाराणा प्रताप माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय--1731513 ते 1731992 सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल--1731993 ते 1732232 बहिणाबाई माध्यमिक विद्यालय--1732233 ते 1732448 नूतन मराठा महाविद्यालय--17322449 ते 1732880 नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय--1732881 ते 1733240 जि.प.विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय--1733241 ते 1733505. भाषानिहाय पेपर लिहिणारे परीक्षार्थीजिल्ह्यात इंग्रजी माध्यमातून पेपर लिहिणारे विद्यार्थी--9119 उर्दू माध्यमातून पेपर लिहिणारे--72 मराठी माध्यमातून पेपर लिहिणारे विद्यार्थी--7 फक्त आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी--बी.बी.प्रकारचे केंद्र फक्त अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी--एम.एम.प्रकारचे केंद्र दोन्ही अभ्यासक्रमासाठी बसू इच्छिणाऱ्या विद्याथर्यांसाठी--एम.बी. प्रकारचे केंद्र आहे. डुप्लिकेट प्रवेशपत्र, माध्यम बदलाची सुविधाया परीक्षेसाठी प्रवेशपत्र हरविलेले व गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी एक तास डुप्लिकेट प्रवेशपत्र मिळू शकणार आहे. शिवाय मराठी व उर्दू माध्यमातून पेपर लिहिण्याचा पर्याय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना लेखी अर्ज दिल्यास इंग्रजीतून परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षेचे संपर्क अधिकारी डॉ. जी. व्ही. ठाकरे यांनी दिली. उमेदवारांनी घ्यावयाची काळजीसर्व उमेदवारांनी संबंधित परीक्षा केंद्रावर सकाळी साडेनऊला उपस्थित राहावे. सहा मे हा दिवस कार्यालयीन कामकाजाचा असल्याने विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या दृष्टीने प्रवासाचे नियोजन करो. गतवर्षी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांचा पेपर संपल्यानंतर जीवशास्त्र या विषयाचा पेपर सुरू होणाऱ्या दरम्यान प्राप्त होणार कमी कालावधी लक्षात घेता दोन पेपर मधला कालावधी वाढविण्यात आला आहे. |
वसंतदादा बॅंकेचा घडा भरला
सांगली - येथील वसंतदादा शेतकरी बॅंकेची अखेरची घरघर सुरू झाली आहे. बॅंकेचा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी अवसायक मंडळाने दहा शाखा बंद करून त्यांचे कामकाज जवळच्या शाखेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या ठेवीदारांनी विमा क्लेम अद्याप घेतलेला नाही, त्यांनी 31 पर्यंत घ्यावा, असे आवाहन अवसायक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी केले आहे.
साखर कारखाने, बॅंक आदी विविध संस्थांमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली. त्यात वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेची भूमिका महत्त्वाची होती; मात्र दहा वर्षांतील संचालक मंडळाचा मनमानी कारभार, कमी तारणावर जादा दिलेली कर्जे यांमुळे ही बॅंक अडचणीत आली. दीड वर्षापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेचा परवाना रद्द केला. बॅंक अवसायनात काढून अवसायक मंडळाची नियुक्त केली. पहिल्या टप्प्यात एक लाखापर्यंतचा विमा क्लेम असलेल्या ठेवीदारांना ठेवीचे वाटप करण्यात आले. काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजनेतून कमी केले. अनेक कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधीची रक्कम अद्याप मिळालेली नाही.
अवसायक मंडळाने आता दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी बॅंकेच्या शाखा कमी करण्यास सुरवात केली आहे. चांदणी चौक व टिंबर एरिया शाखा बॅंकेच्या मार्केट यार्डातील मुख्य शाखेत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. माधवनगर व बुधगाव शाखेचे साखर कारखाना शाखेत, विश्रामबाग शाखेचे सांगली-मिरज रोड शाखेत, फळ मार्केट शाखेचे गावभाग शाखेत, सांगलीवाडी शाखेचे सराफकट्टा शाखेत, मिरजेतील स्टेशन रोड शाखेचे लक्ष्मी मार्केट शाखेत, गडहिंग्लजचे कोल्हापूर व शिराळा शाखेचे इस्लामपूर शाखेत स्थलांतर होणार आहे. स्थलांतरित शाखांत 1 जूनपासून कामकाज सुरू होणार आहे.
विमा क्लेम योजनेअंतर्गत ठेवीदारांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी मंजूर झाल्या आहेत. अनेक ठेवीदारांनी या रकमा काढून घेतल्या आहेत. ज्या ठेवीदारांनी रकमा अद्याप घेतलेल्या नाहीत, त्यांनी 31 मेपर्यंत काढून घाव्यात, असे आवाहन अवसायक मंडळाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी केले आहे.

आयपीएल करमाफी याचिकेत पवारांना पक्षकार करण्यास मुभा -
मुंबई - आयपीएल स्पर्धेला करमाफी देण्यासंदर्भातील याचिकेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना पक्षकार करण्याची मुभा उच्च न्यायालयाने आज अर्जदार शिवसेना नेते सुभाष देसाई यांना दिली.
या प्रकरणाची सुनावणी आज न्या. पी. बी. मजमुदार व न्या. राजेश केतकर यांच्यासमोर झाली. देसाई यांच्या मूळ याचिकेत पवार यांच्यावरही काही अप्रत्यक्ष आरोप करण्यात आले होते. पवार केंद्रीय मंत्री असून ते क्रिकेट नियामक मंडळाशी संबंधित आहेत. ते अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये सहभागी आहे. राज्य सरकारचे अर्थखातेही याच पक्षाकडे आहे. त्यामुळे या स्पर्धेला करमाफी देण्याचा निर्णयही राजकीय दडपणामुळे घेण्यात आल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात आज पवार यांना पक्षकार करण्याची मुभा खंडपीठाने दिली.
स्पर्धेवर करमणूक कर आकारायचा किंवा नाही याबाबत सरकारचा अंतिम निर्णय अद्याप झाला नाही, असे राज्य सरकारतर्फे आज सांगण्यात आले. मंत्र्यांसाठी राज्य सरकारची आचारसंहिता आहे. मात्र, मंत्र्यांनी क्रीडासंस्थांवर पदाधिकारी म्हणून जावे किंवा नाही याबाबत आपण माहिती घेऊन सांगू, असेही सरकारी वकिलांनी सांगितले. कोणी मंत्री क्रीडासंस्थांचे पदाधिकारी झाल्यास काम करताना त्यांचे हितसंबंध परस्परविरोधी होतील का, अशी विचारणा खंडपीठाने केली होती. त्यावर सरकारी वकिलांनी हे उत्तर दिले. आता आज खंडपीठाने हाच प्रश्न केंद्रीय मंत्र्यांबाबत विचारला. क्रीडासंस्थेचा पदाधिकारी असलेल्या केंद्रीय मंत्र्याला त्या क्रीडासंस्थेबाबत काही निर्णय घेण्याची वेळ आली तर, त्यांचे हितसंबंध परस्परविरोधी होतील का? असे खंडपीठाने विचारून सुनावणी तहकूब केली

Wednesday, April 28, 2010
ऋषिकेशला हवा मदतीचा हात
गडहिंग्लज - मुलांच्या शस्त्रक्रियेला पैसे आणायचे कोठून या चिंतेतून एका महिलेने आपल्या दोन मुलीसह हिरण्यकेशी नदीत उडी मारून काल सायंकाळी चार वाजता आत्महत्या केली. सौ. अलका रवींद्र सावंत (वय 37), मुलगी रोहिणी ( 16) व स्नेहल (14) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण मांगनूर तर्फ सावतवाडीचे (ता. गडहिंग्लज) आहेत. पोहता येत असल्याने या महिलेचा ऋषिकेश (वय 11) नावाचा मुलगा सुदैवाने बचावला.
ऋषिकेशला हवा मदतीचा हातऋषिकेश आणि रोहिणीसाठी त्यांच्या शिप्पूरच्या नातेवाइकांनी मोठी रक्कम खर्च केल्याचे सांगण्यात येते. तरीसुद्धा त्यांची त्या आजारातून सुटका झालेली नव्हती. यामुळे अलका सतत पैशाच्या चिंतेत होत्या. आता ऋषिकेशवरचे आई, बहिणींचे छत्रही हरपले. वडिलांचा संपर्क नाही. यामुळे त्याला आधाराची आणि हृदयशस्त्रक्रियेसाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून आर्थिक मदतीची गरज आहे.
मदतीसाठी संपर्क - webeditor@esakal.com
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली व ऋषिकेशने सांगितलेली माहिती अशी - अलका यांचे माहेर शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) आहे. सहा वर्षांपासून त्या माहेरीच असतात. काल सकाळी गडहिंग्लजला जाऊन येऊ, असे सांगून त्या रोहिणी, स्नेहल आणि ऋषिकेशसह एसटीने गडहिंग्लजला आल्या. बसस्थानकावर द्राक्षे आणि भजी बांधून घेऊन हे सर्वजण भडगावकडे चालत गेले. हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलाजवळच्या शेतीवडीतून सर्वजण नदीकाठावर गेले. तेथे बसून द्राक्षे आणि भजी खाल्ले. त्यानंतर 'तुमच्या ऑपरेशनसाठी पैसे नाहीत. इतके पैसे कोठून आणायचे, यामुळे आपण नदीत जीव देऊ,' असे त्यांनी मुलांना सांगितले आणि सर्वांना बरोबर घेऊन नदीपात्रात उडी घेतली. रोहिणी आणि स्नेहल यांनी आईला मिठी मारली होती. त्यामुळे तिघीही बुडाल्या. ऋषिकेशला पोहता येत असल्याने तो पोहत काठावर आला. तिघीनांही बुडत असल्याचे पाहून तो ओरडतच रस्त्यावर आला. तेथील नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळविली. भडगाव व गडहिंग्लजच्या नागरिकांनी पुलावर गर्दी केली. पोलिस निरीक्षक आर. टी. जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. संजय येडूरकर, महादेव कोकणे, भीमा भोई, नागोजी भोई यांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
अठरा वर्षांपूर्वी अलका व रवींद्र यांचे लग्न झाले. रवींद्रला दारूचे व्यसन आहे. यामुळे कुटुंबात सतत भांडण होत असे. याला कंटाळून अलका आपल्या मुलांसह माहेरी आल्या होत्या. रवींद्र इचलकरंजीत यंत्रमागावर काम करतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याचाही संपर्क नसल्याचे शिप्पूरच्या नातेवाइकांकडून सांगितले जाते. इचलकरंजीत असताना मोठी मुलगी रोहिणीचे कान हातमागामध्ये सापडून तुटले होते. त्यावेळी डॉक्टरांनी ते कान नंतर शस्त्रक्रियेने जोडता यावे म्हणून तात्पुरते तिच्याच पोटाला बसविले होते. दरम्यानच्या काळात रोहिणीला अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर काही वर्षांनी ऋषिकेशलाही हृदयविकार असल्याचे तपासणीत आढळून आले. त्याची हृदयशस्त्रक्रियाही झाली होती. परंतु सहा महिन्यांनंतर त्याच्या हृदयात पुन्हा दोष असल्याचे आढळले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. अलका कोवाडच्या आश्रमशाळेतील मुलांना जेवण करून देण्याचे काम करत होत्या. याच शाळेत ऋषिकेश पाचवीत व स्नेहल सातवीत होते. हे तिघेही कोवाडमध्ये, तर रोहिणी शिप्पूरमधील आजी यशोदा जाधव यांच्याजवळ राहात होती. तिचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. अलका यांचा एक भाऊ सैन्य दलात, तर एक मुंबईत नोकरीनिमित्त राहतो. चार दिवसांपूर्वी सुटी पडल्याने अलका, स्नेहल व ऋषिकेश तिघेही कोवाडहून शिप्पूरला आले होते. रोहिणी व ऋषिकेशच्या आजारावर उपचारासाठी इतकी मोठी रक्कम आणायची कोठून या चिंतेनेच अलकाने मुलासह आत्महत्येचा निर्णय घेतला.
* आई, जीव द्यायला नकोशस्त्रक्रियेला पैसे नसल्याने आपण सर्व जण जीव देऊ या, असे अलकानी मुलांना सांगितल्यानंतर ऋषिकेश "आई, जीव द्यायला नको,' असे सांगत होता. परंतु पैशाच्या चिंतेने आणि गरिबीला कंटाळलेल्या अलकाने त्याचे न ऐकता त्यालाही सोबत घेऊनच नदीपात्रात उडी घेतली. पोहता येत असल्याने ऋषिकेश बाहेर आला. घट्ट मिठी असल्याने तिघीही बुडाल्या.
* मृतदेहासाठी हवालदार पाण्याततिघींचा मृतदेह शोधासाठी पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण केले. परंतु एका मुलीचा मृतदेह लवकर सापडत नव्हता. यामुळे शेजारीच असलेले हवालदार गणेश मिरखा यांनी कशाचाही विचार न करता तातडीने पाण्यात उतरून शोधकाम सुरू केले. त्यांनी त्या मुलीचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेतून पोलिसांमधील माणुसकी अजूनही जिवंत आहे हेच श्री. मिरखा यांनी दाखवून दिले.
मदतीसाठी आमचा पत्ता - webeditor@esakal.com

'आयपीएल'वर करआकारणी अशक्य - मुख्यमंत्री
मुंबई - आयपीएल सामने संपले असल्याने त्यावर करआकारणी करणे अशक्य आहे. आता पुढील वर्षी त्याबाबत विचार करता येईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. आयपीएलवर करआकारणीचा मुद्दा गेले दोन-अडीच महिने चर्चेत असताना अजूनही करआकारणी होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले होते. मात्र, आता ते अशक्य असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
केवळ आयपीएलवर मनोरंजन कर लावण्याचाच प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे नव्हता; तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व क्रिकेट सामन्यांवर कर लावण्याचा तो प्रस्ताव आहे. मंत्रिमंडळाचा याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने त्याचा लाभ आयपीएलला मिळाला असला, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर मनोरंजन कर लागू होणार का? हा प्रश्न सध्या तरी अनिर्णीत अवस्थेतच पडून आहे.
आयपीएलसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व क्रिकेट सामन्यांवर मनोरंजन कर लागू करण्याचा प्रस्ताव 20 जानेवारीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे ठेवण्यात आला. तो मंजूर झाला तरी त्याचे इतिवृत्त पुढील बैठकीत मंजूर न झाल्याने या निर्णयाला अंतिम स्वरूप मिळाले नाही. कसोटी सामने वगळता वन डे, ट्वेंटी-ट्वेंटीसह आयपीएल सामन्यांवर कर लावण्याचा महसूल विभागाचा प्रस्ताव होता. मुंबई महापालिका क्षेत्रातील सामन्यास 25 टक्के, राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रात 20 टक्के आणि अन्य विभागात 15 टक्के अशा प्रकारे करआकारणीचा प्रस्ताव आहे.
आयपीएलवर राज्य सरकार कधी कर लावणार, अशी विचारणा सातत्याने विविध स्तरावरून होत होती. करआकारणीच्या प्रस्तावाचे इतिवृत्त मंजूर न करता तो थांबवून ठेवण्याचा प्रकार क्वचितच होतो. सरकारने निर्णय घेण्यास विलंब लावल्याने आयपीएल सामन्यांवर मनोरंजन कर लागू शकला नाही व त्याचा लाभ प्रेक्षकांना मिळाला. कर हा पूर्वलक्षी प्रभावाने आकारता येऊ शकत नाही. मनोरंजन कर हा प्रत्येक तिकिटामागे प्रेक्षकांकडून वसूल केला जातो. त्यामुळे आयपीएलचे सामने संपल्याने आता त्यावर करआकारणी करता येणार नाही, पुढील वर्षीसाठी विचार होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पण आयपीएल पार पडले तरी मंत्रिमंडळापुढील प्रस्ताव तसाच अनिर्णीत अवस्थेत राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रभा राव अल्पचरित्र
कॉंग्रेसमधील धाडसी व वादळी व्यक्तिमत्त्व - संसदीय राजकारणात महिलांना संधी मिळाली पाहिजे, म्हणून आता महिला आरक्षणाची चर्चा होत आहे; परंतु तीस-चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही थोड्या-थोडक्या महिला पुढे आल्या, त्यात प्रभा राव यांचे नाव नेहमीच आघाडीवर राहिले. कॉंग्रेसमध्ये त्यांच्या नेतृत्वगुणाला सातत्याने वाव मिळत राहिला. इंदिरा गांधींपासून राजीव गांधी व आता सोनिया गांधी यांच्यापर्यंत प्रभा राव यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. पक्षाने त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडल्या. आपल्या स्वतःच्या खास शैलीने काम करताना त्यांनी पक्षाच्या भूमिकेला किंवा विचारसरणीला धक्का बसेल असे वर्तन त्यांनी सहसा कधी केले नाही. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे पक्षात अनेक जण दुखावले गेले; परंतु त्याची त्यांनी फारशी कधी फिकीर केली नाही.
वर्धा जिल्ह्यातील रोहनी या गावात स्वातंत्र्यसैनिकांच्या वसु कुटुंबात प्रभा राव यांचा जन्म झाला. त्यांच्या वसु कुटुंबावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. राज्यशास्त्रात त्या एम. ए. झाल्या होत्या. शास्त्रीय संगीतातील पदवी त्यांनी प्राप्त केली होती. विधानसभेत त्यांनी पुलगाव मतदारसंघाचे व लोकसभेत वर्धा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1972 ते 1976, 1976 ते 1977-78 आणि 1988 ते 1990 या कालावधीत चार वेळा त्या मंत्री होत्या. महसूल, शिक्षण, नियोजन, उद्योग, सांस्कृतिक, पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. 1978-79 मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचीही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपली निर्णयक्षमताही सिद्ध करून दाखविली. त्यामुळे पुढे त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नाव घेतले जायचे. त्यांचीही तशी महत्त्वाकांक्षा होती; परंतु तशी संधी त्यांना मिळू शकली नाही.
सरकारमधील मंत्री म्हणून प्रभा राव यांनी ज्या तडफेने काम केले, त्याच तडफेने त्यांनी पक्षातही विविध पदे भूषविली. 1984 मध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची पहिल्यांदा निवड झाली. त्यांच्या निवडीनेच मोठे वादळ निर्माण झाले. आपल्याला विश्वासात न घेता प्रदेशाध्यक्षाची निवड केल्याचा निषेध म्हणून वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दिल्लीच्या अनेक बड्या नेत्यांनी मुंबईत येऊन दादांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला नाही. श्रीमती राव यांनी त्या वेळी पाच वर्षे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांनी बरीच वर्षे कार्य केले. त्या काळात त्यांच्यावर दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाना, केरळ, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांची जबाबदारी देण्यात आली होती.
कॉंग्रेसला बरे दिवस आल्यानंतर 2004 मध्ये प्रभा राव यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात पाठविण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रभा राव यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी विलासराव देशमुख आले. देशमुख व राव यांचे कधी फारसे पटले नाही. त्यावेळच्या राज्याच्या प्रभारी मार्गारेट अल्वा यांच्याशी त्यांचा चांगला सूर जमला होता. त्यांच्याच काळात नारायण राणे व त्यांचे आठ-दहा समर्थक आमदार कॉंग्रेसमध्ये आले. प्रभा राव यांचा अध्यक्ष म्हणून पक्षात मोठा दरारा होता. त्यांना पदाधिकाऱ्यांनी अघळपघळ वागलेले खपत नव्हते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे अनेक ज्येष्ठ पदाधिकारीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्यासमोर जायला कचरत असत. पक्षाच्या व्यासपीठावर कुणी मंत्री असला, तरी त्यांच्या परवानगीशिवाय कुणाचे बोलण्याचे धाडस होत नसे. एखादा निर्णय घेताना त्या कधी डगमगणार नाहीत, स्पष्टवक्तेपणा आणि परिणामांची पर्वा न करता निर्णय घेणे, अशी त्यांची कार्यशैली होती. पक्षश्रेष्ठींना नेमके काय हवे याचा अचूक अंदाज घेत, त्या अनेक धाडसी निर्णय घेत असत. त्यामुळे पक्षात कुणी दुखावले वा नाराज झाले, तर त्याची त्या पर्वा करीत नसत. आपल्याच सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सेझ प्रकल्पांचे परिणाम, कुपोषण, विजेची समस्या अशा प्रश्नांवर अहवाल तयार करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. 2008 मध्ये त्यांची हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्या वेळी पक्षाच्या वतीने इस्लाम जिमखान्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री विलासराव देशमुख व महसूलमंत्री नारायण राणे यांना जवळ बोलाविले, एकमेकांच्या हातात हात दिले आणि यापुढे एकोप्याने काम करा, असा सल्ला दिला. त्या वेळी उपस्थित कॉंग्रेसजन भारावून गेले होते.

Tuesday, April 27, 2010
गहू, दादरचे भाव तेजीतच!
जळगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हंगाम संपण्याच्या तोंडावर दाखल झालेल्या गहू व दादरच्या भावामध्ये तेजी दिसून आली आहे. उशिरा काढणी झालेल्या धान्यालाही मनाजोगते भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना खूपच दिलासा मिळाला आहे.
बाजारात सध्या गहू, दादर, हरभरा यांसारखा भुसार शेतमाल वगळता इतर मालाची आवक नगण्यच आहे. गव्हाची आवक 241 क्विंटल झालेली असली तरी ती गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत काहीशी मंदावल्याचे दिसून आले आहे; परंतु तिच्या कमाल दरात प्रतिक्विंटलला 100 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच गहू बाजारात 1200 ते 1575 रुपयांना विकला गेला. ही स्थिती दादरच्या व्यवहारातही दिसून आली. दादरसुद्धा 200 क्विंटलचा टप्पा पार करीत 203 क्विंटलपर्यंत पोचली. दादरच्या किमान व कमाल दरात प्रत्येकी 200 रुपयांची भरीव वाढ झाल्याने 1265 ते 1411 रुपयांची मागणी राहिली. हरभऱ्याच्या चाफा, काबुली व मॅक्सिको या वाणांची विक्री सुरू आहे. जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उशिरा मळणी केलेला हा शेतमाल बाजारात आणताच विशेषतः चाफाचे दर वधारले. त्याच्या कमाल दरात 150 रुपयांनी, तर काबुलीच्या कमाल दरात तब्बल 200 रुपयांनी वाढ झाली. चाफा (1790 ते 2175 रुपये) व काबुलीची (2650 ते 2820 रुपये) अनुक्रमे 16 व 92 क्विंटल आवक झाली. मॅक्सिकोची आवकही 10 क्विंटल होती. जिल्ह्यात या वाणाला मोठी पसंती असल्याने तिला मागणीही मोठी असते. मॅक्सिकोने प्रतिक्विंटलला 3100 ते 3700 रुपयांचा दर पदरात पाडून घेतला. अर्थात, मागणीचा रेटा लक्षात घेता हरभऱ्याची एकूण आवक तशी तुरळकच राहिली. त्यामुळेच दरात वाढ झाल्याने विक्रीसाठी हरभरा बाजारात आणलेले शेतकरी आनदांत दिसले. तूर (35 क्विंटल) व बाजरीची (19 क्विंटल) आवक मात्र अत्यंत अल्प होती. तूर व बाजरीचे दर मात्र चांगले होते. गुळाची आवक 701 रवे होती. अर्थात, बहुतांश गूळ पश्चिम महाराष्ट्रातूनच आलेला होता.

बॉडी मसाजच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक
नाशिक - "हाय प्रोफाइल महिलांचे मसाज करा आणि दहा हजार रुपये कमवा' या स्वरूपाच्या उत्तान जाहिरातींद्वारे बेरोजगारांना आकर्षित करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील अनेक युवकांची यात फसवणूक झाल्याने त्यांची अवस्था "सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही' अशी झाली आहे. याबाबत सर्वच व्यवहार दूरध्वनीवरून होत असल्याने पोलिसांत तक्रारही करता येत नसल्याने फसवणूक झालेले हतबल होत आहेत.
दरम्यान, याबाबत अनेक युवक खातरजमा न करताच प्रसिद्ध होणाऱ्या उत्तान जाहिरातींना भुलत असल्याने ही फसवणूक होते. त्या जाहिरातींच्या मुळापर्यंत पोचणेही अशक्य बनले असून, जाहिरातीतील क्रमांकांवर दूरध्वनी केल्यास उत्तर न देता त्यांच्या नोंदी घेऊन फक्त नवख्या क्रमांकांना संबंधित महिला उत्तरे देतात. यातील काही महिला पुणे, तर काही नवी मुंबई व ठाणे येथील असल्याचे सांगतात. महिला अतिशय गोड व हिंदीत बोलत असल्याने अनेकांची त्यातून फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये मोठी साखळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत माहिती अशी, की ग्रामीण तसेच शहरी भागात चमचमीत बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांत भडक स्वरूपात "हाय प्रोफाइल महिलांचे मसाज करा व रोज दहा हजार रुपयांपर्यंत कमवा' अशा जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. त्यात महिलांचे चित्र व दूरध्वनी क्रमांक असतात. त्यावर दूरध्वनी केल्यावर आपणास नोकरी हवी असल्यास बॅंकेत पैसे भरण्यास सांगितले जाते व नंतर पुढे काहीच होत नाही.
निफाड तालुक्यातील विनोद गांगुर्डे या युवकाने आपल्याला असा अनुभव आल्याचे सांगितले. त्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून त्याने फोन केल्यावर "पूजा वर्मा' नामक महिलेने नाव, वय, गाव विचारले. आयसीआयसीआय बॅंकेच्या दत्तमंदिर नाशिक रोड येथील सुरेंद्र कुमार यांच्या खात्यात अडीच हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर तुमची आज सायंकाळी मीटिंग होईल, असे कळविले. त्यानंतर "आजची मीटिंग रद्द झाली. तुम्ही उद्या बॅंक ऑफ बडोदाच्या एका खात्यात दोन हजार रुपये भरा,' असे सांगितले गेले. पैसे भरल्यावर फोनच घेतला जात नाही. पाठपुरावा केल्यावर "आम्ही व्यस्त आहोत, नंतर भेटू' असे उत्तर येते किंवा सर्वच दूरध्वनी बंद असतात, असे विनोदने सांगितले. यात अनेक युवकांची फसवणूक झाली असून, त्यांना तक्रारही करता येत नाही आणि नोकरीही मिळत नाही. याबाबत प्रत्यक्ष भेट कोणाचीही झालेली नसल्याने पोलिसांत तक्रारही करता येत नाही. युवकांनी सावध होऊन अशा फसव्या जाहिरातींना भुलू नये, अशी अपेक्षा फसवणूक झालेल्या युवकांनी व्यक्त केली आहे.

Saturday, April 24, 2010
सह्याद्री'तील नवरत्नांचा सन्मान
मुंबई - विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नऊ मान्यवरांचा शुक्रवारी (ता.23) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने नवरत्न पुरस्कार देऊन गौरव केला. वरळी येथील दूरदर्शनच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
दूरदर्शनने जाहिरातींच्या मागे न लागता जी सामाजिक बांधिलकी जपली आहे, त्याचा प्रत्यय याही उपक्रमात आला. संगीत, नाट्य-नृत्य, कला यांचा मेळ या निमित्ताने घातला गेला. सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता, संगीतकार आनंदजी, खय्याम, भप्पी लहिरी, अच्युत गोडबोले, गौतम राजाध्यक्ष आदींनी केले. या वेळी विजया मेहता म्हणाल्या, की या नऊ जणांनी हा पुरस्कार प्रसिद्धीसाठी मिळविलेला नाही. कलाकार हा आपल्यातील कला इतरांपुढे साकारण्यासाठी धडपडत असतो. आपण सर्वच जण आपापल्या परीने कामाला जुंपलेले असतो. ही मंडळी करतात ते "कार्य' असते काम नसते. त्यामुळे आपण कलाकारांचे देणे लागतो. त्यातून किंचित उतराई होण्याचा हा "सह्याद्री'चा उपक्रमही स्तुत्य आहे.
या वेळी ज्येष्ठ कलाकार सुहास जोशी यांना "नाट्यरत्न', संगणक प्रशिक्षण विवेक सावंत यांना "शिक्षणरत्न', साहित्यिक आसाराम लोमटे यांना "साहित्यरत्न', समाजसुधारक राम इंगोळे यांना "सेवारत्न', बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी "रत्नसौरभ', कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना "कलारत्न', सिनेदिग्दर्शक एन. चंद्रा यांना "चित्ररत्न', संशोधक डॉ. बाळ फोंडके यांना "रत्नदर्पण', शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे यांना "स्वररत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले. सुभाष अवचट, पुष्पा भारती, डॉ. श्रीकांत चोरघडे, विजया मेहता, खय्याम, आनंदजी, परीक्षित साहनी, रमाकांत आचरेकर, गौतम राजाध्यक्ष, भप्पी लहिरी, विश्वनाथ सचदेव, डॉ. आर. सिन्हा यांच्या हस्ते या नवरत्नांचा सन्मान झाला.
कुमार केतकर, लता नार्वेकर, अच्युत गोडबोले व मिलिंग वागळे यांनी या विविध क्षेत्रातील नवरत्नांची निवड केली होती. अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर हिला गोदरेज कंपनीचे प्रदीप उघडे आणि जयश्री टी. यांच्या हस्ते "फेस ऑफ दि इअर' या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बावडेकर आणि समीरा गुजर हिने केले. सांस्कृतिक कार्यक्रमांची झालर असलेल्या या कार्यक्रमाचे प्रक्षेपण 1 मे रोजी दुपारी चार वाजता "सह्याद्री' वाहिनीवर होईल.

अश्लील चित्रफीत प्रकरणी युवकास अटक
कुरुंदवाड - महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाची अश्लील चित्रफीत करणाऱ्या कुरुंदवाड (भैरववाडी) येथील प्रकाश महादेव बिरंजे याला आज पोलिसांनी अटक केली. बिरंजे याने अश्लील चित्रफीत बनवून मोबाईच्या माध्यमातून प्रसारित केल्याचे नुकतेच उघडकीस आले होते. दोन दिवसांपासून तो शहर सोडून पसार झाला होता; मात्र सहायक पोलिस निरीक्षक विलास सुपे यांच्या पथकाने त्याला गडहिंग्लज येथून अटक करण्यात यशा मिळविले. गेल्या दोन दिवसांपासून या वादग्रस्त चित्रफितीबाबत शहरात चर्चा सुरू होती. बिरंजे याच्यावर पोलिसांनी बलात्कार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वे गुन्हा दाखल केला आहे.
नांदणी येथील चिदानंद मेंडिगरे याने अश्लील चित्रफीत बनविल्याचे उघड झाले त्यानंतर दोन-चार दिवसांत बिरंजे याच्या चित्रफितीची चर्चा सुरू झाली. भैरववाडी क्लिप या नावाने ही क्लिप चौकाचौकात युवक घोळक्या घोळक्याने पाहत होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. स्वत:ची क्लिप प्रसारित झाल्यापासून बिरंजे गाव सोडून पसार झाला होता; मात्र पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथक तयार करून गडहिंग्लज तालुक्यात त्याला शोधून काढले.
संबंधित महिलेने बिरंजे याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. आपल्या दोन मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दीड वर्षे शारीरिक संबंध ठेवले. जयसिंगपूर, इचलकरंजी, नृसिंहवाडी येथील हॉटेल व लॉजिंगमध्ये नेऊन संबंधाचे मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यास नकार दिल्यानंतर त्याने अश्लील चित्रफीत आपल्या मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर प्रसारित केल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी बिरंजे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी चित्रफितीसाठी बिरंजेने वापरलेला मोबाईल जप्त केला आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी त्याच्या साथीदारांचाही शोध सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक प्रदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विलास तुपे, सहायक फौजदार दत्तात्रय पवार, चंद्रकांत भाट, इकबाल महात आदींचे पथक चौकशी करीत आहे.

भंगार देण्याच्या आमिषाने दोन युवतींवर बलात्कार
वाई - भंगार माल देण्याचे आमिष दाखवून दोन युवतींवर दोघा तरुणांनी बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आल्याने वाईत खळबळ उडाली आहे. येथील मिशन हॉस्पिटलच्या कंपाउंडमधील पडक्या बंगल्यात काल (शुक्रवारी) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सिद्धनाथवाडी येथील गुरेबाजार झोपडपट्टीतील दोन युवतींना भंगार माल देण्याचे आमिष दाखवून रवी रमेश काळे (वय 20, रा. यशवंतनगर झोपडपट्टी) व सनी ऊर्फ राहुल काशिनाथ भोसले (वय 19, रा. जुना मोटार स्टॅंड झोपडपट्टी) यांनी बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद संबंधित युवतींनी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर महाडिक तपास करीत आहेत.
सहा नद्यांच्या जलासह ऐतिहासिक कलश मुंबईत जाणार
जळगाव - महाराष्ट्र स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तापी-पूर्णा, गिरणा, वाघूर, अंजनी, बोरी व उनपदेव येथील नद्यांचे पाण्याचा कलश, तर पाटणादेवीसह 9 ठिकाणच्या ऐतिहासिक स्थळाजवळील मातीचा कलश 28 एप्रिलला मुंबईला रवाना होणार आहे. हे दोन कलश जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष तथा स्वातंत्र्यसैनिक मनोहर देशमुख यांच्यासह क्रीडा मार्गदर्शक जगदीश चौधरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर चौधरी व एन. ए. भावसार हे नेणार आहेत. जिल्ह्यात 30 एप्रिलला बालगंधर्व सभागृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमापासून या वर्षाच्या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे.
1 मे 2010 ला महाराष्ट्राच्या स्थापनेस 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभापासून ते 30 एप्रिल 2011 पर्यंत राज्याच्या विविध भागांत समाजघटकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नियोजनानुसार 1 मेस मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळ राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून प्रातिनिधिक स्वरूपात आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक कलशात नद्यांचे पाणी आणि दुसऱ्या कलशात त्या जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाजवळची माती आणण्यात येणार आहे. त्या-त्या जिल्ह्यांचे स्वातंत्र्यसैनिक गौरव समितीचे अध्यक्ष तसेच अन्य दोन-तीन व्यक्ती यांचे पथक हे दोन्ही कलश सन्मानपूर्वक मुंबईला घेऊन जाणार आहेत. सर्व जिल्ह्यांची पथके 30 एप्रिलला सकाळी अकराला मुंबईत पोहोचणार आहेत. 30 एप्रिल 2010 ला महाराष्ट्रदिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान, या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या संकल्पनेनुसार पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील तापी-पूर्णा संगम (चांगदेव), गिरणा, वाघूर, अंजनी, बोरी व उनपदेव येथील नद्यांचे पाणी एका कलशात नेले जाणार आहे, तर दुसऱ्या कलशात भास्कराचार्य निवास- पाटणादेवी, पारोळा- किल्ला, यावल- किल्ला, फैजपूर, पाचोरा- हुतात्मा स्मारक, आडगाव (ता. एरंडोल), असोदा- बहिणाबाईंचे जन्मस्थान, अमळनेर- साने गुरुजींचे स्थान व पाल येथील किल्ला येथील माती असणार आहे.
हे दोन्ही कलश नेण्याचे काम हे जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष तथा स्वातंत्र्यसैनिक मनोहर सुभेरसिंग देशमुख (वय 78), क्रीडा मार्गदर्शक जगदीश चौधरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर प्रल्हाद चौधरी, अव्वल कारकून एन. ए. भावसार घेऊन जाणार आहेत.
50 लाखांचा निधी येणार
सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना तब्बल 50 लाखांचा निधी येणार आहे. तसे नियोजन शासनस्तरावर सुरू आहे. दरम्यान, वर्षभर कार्यक्रम साजरे करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात पालकमंत्री गुलाबराव अध्यक्ष, तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्मिता वाघ, महापौर प्रदीप रायसोनी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, जिल्हाधिकारी कुणाल कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निरुपमा डांगे, पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी, अप्पर जिल्हाधिकारी गणेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी, विशेष समाजकल्याण अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, विनोद ढगे, सचिन नारळे, सी. एन. पाटील, सदस्य सचिव जिल्हा नियोजन अधिकारी के. एन. पाटील, जिल्हा गौर समितीचे अध्यक्ष मनोहर देशमुख यांचा यात समावेश आहे.

धुळ्याजवळ अपघातात चार जण ठार
धुळे - सोनगीर (ता. धुळे) ते दोंडाईचा दरम्यानच्या सोंडले (ता. शिंदखेडा) गावाजवळ आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ट्रक (जीजे 7 यूयू 2394) आणि कार (जीजे 5, सीएल 4598) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले, तर 12 जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये चालक व एका महिलेचा समावेश आहे. कारमधील प्रवासी सुरतहून देवभाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी येत होते, असे सांगण्यात आले.
दोन मृतदेह शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी दोघांचा धुळे जिल्हा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. जखमींवर सोनगीर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची नावे अशी : कन्हय्यालाल झावरू देसले (वय 65, रा. देवभाने), संजय हरी देसले (वय 35), गणेश हरी मराठे (वय 27, चालक) याच्यासह अन्य एका 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

Thursday, April 22, 2010
खंडित वीजपुरवठ्याने पुणेकरांचे अतोनात हाल
पुणे - विजेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे उन्हाळ्याच्या झळांचा "चटका' गुरुवारी दिवसभर पुणेकरांना अनुभवावा लागला. सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री साडेसात वाजेपर्यंत सुरू झालेला नव्हता. त्यामुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाले. उकाड्याने हैराण झाल्याने अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र, शहराच्या काही भागात सायंकाळी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.
दर गुरुवारी साप्ताहिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे शहर आणि उपनगरांतील विविध भागांत वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. त्यानुसार आजही महापारेषणच्या गणेशखिंड ते चिंचवड या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या नूतनीकरणाच्या कामामुळे जंगली महाराज रस्ता, तोफखाना, आकाशवाणी, शनिवार पेठ, नारायण पेठ, बुधवार पेठ, शिवाजीनगर गावठाण, सेनापती बापट रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि उपनगरांतील काही भागात सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. या भागातील वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत बंद होता. तर डेक्कन, प्रभात रस्ता, कर्वे रस्ता परिसरातील वीजपुरवठा सकाळी सहापासून बंद होता. तो सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांचे त्यामुळे दिवसभर प्रचंड हाल झाले. शहर आणि उपनगरांतील काही भागांत रात्री साडेसात वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी "सकाळ'कडे केल्या. वीजपुरवठ्याअभावी शहर आणि उपनगरातील विविध रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडले होते. त्यामुळे सायंकाळनंतर अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.

वसंतदादा बॅंकेविरुद्ध महापालिकेचा दावा
सांगली - बहुचर्चित जकात ठेक्याच्या साडे चार कोटींच्या बॅंक गॅरंटीच्या रकमेच्या वसुलीसाठी अखेर महापालिकेने आज वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेविरुद्ध जिल्हा दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यात अवसायक आणि सर्व संचालकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ठेकेदाराविरुद्ध गेल्या आठवड्यात स्वतंत्र दावा दाखल केला आहे.
महापालिकेने जकात उत्पन्न वाढीसाठी ठेका देण्याचे धोरण राबवले. त्यानुसार 2006-2007 चा ठेका साई ट्रेडिंग कंपनीकडे होता. ठेकेदाराने साडेचार कोटींची वसंतदादा बॅंकेची बॅंक गॅरंटी दिली होती. ठेकेदाराने 3 कोटी 60 लाख रुपये ही जून 2006 ची रक्कम महापालिकेच्या खात्यावर जमा केली नाही. त्यामुळे प्रशासनाने ठेकेदाराला नोटीस दिली. महापुरामुळे 5 कोटींचे नुकसान झाले. त्यामुळे तुम्हीच दीड कोटी परत करा, अशी मागणी ठेकेदाराने महापालिकेकडे केली. त्यामुळे वसुलीचा प्रश्न वादग्रस्त ठरला.
ठेकेदाराने लवाद नियुक्तीची मागणी केली. लवाद नेमण्यात आला; पण लवादाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर महापालिकेने ठेकेदाराविरुद्ध जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला. तिथेही ठेकेदाराविरोधात निकाल लागला. त्यांनी उच्च न्यायालत अपील केले. तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही. दरम्यानच्या काळात वसंतदादा बॅंक बुडाली. बॅंक गॅरंटीची रक्कम वसुलीबाबत प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
ठेकेदाराने पुन्हा रक्कम भरावी लागू नये म्हणून प्रयत्न केले. उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. याचा निकाल अद्याप लागला नाही. माजी नगरसेवक रामचंद्र घोडके यांनी ठेकेदारांविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल दोन महिन्यांपूर्वी लागला. न्यायालयाने कॉन्ट्रॅक्ट ऍक्टनुसार ठेकेदाराकडून रक्कम वसुलीची प्रक्रिया राबवावी, असा आदेश दिला. त्यानंतरही प्रशासनाने कार्यवाही केली नाही. महासभेत प्रचंड गदारोळ झाला. महिन्यात झालेल्या सभेत लवादाची अट रद्द करून वसंतदादा बॅंक आणि ठेकेदारांविरुद्ध दावा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिका आयुक्तांनी बॅंकेच्या अवसायकांना सात दिवसांत साडे चार कोटी भरा अन्यथा आपल्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला जाईल, अशी नोटीस दिली होती. त्यांनी मुदतीत रक्कम भरली नाही. त्यामुळे आज जिल्हा न्यायालयात बॅंकेविरुद्ध दावा दाखल करण्यात आला. आठवड्यात जकात ठेकेदार साई ट्रेडिंगविरुद्ध दावा दाखल केला. पुढील आठवड्यात दोन्ही दाव्यांची एकत्रित सुनावणी होणार आहे.
32 कोटींच्या ठेवी अडकल्यावसंतदादा बॅंकेत महापालिकेच्या 32 कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. ठेवींच्या वसुलीसाठी दावा दाखल करण्यास सहकार आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे ठेवी परत मिळाव्यात म्हणून उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अनैतिक संबंधातून विवाहितेस पेटवून ठार केले
शिरपूर - अनैतिक संबंधातून भावेर (ता. शिरपूर) येथील विवाहितेस एका कुटुंबाने काल (ता. 21) दुपारी पेटवून देत ठार केल्याप्रकरणी आज थाळनेर पोलिस ठाण्यात भावेर येथील राजेंद्र गुजर, त्याची पत्नी, आई व मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. राजेंद्र गुजर यास आज चोपडा (जि. जळगाव) येथे अटक करण्यात आली.
विनयभंगाची तक्रारभावेर येथील राजेंद्र रघुनाथ गुजर याचे गावातील सविता गुलाब धनगर (वय 35) या विवाहितेशी अनैतिक संबंध होते. हा प्रकार सविताचा पती गुलाब धनगर याला माहीत झाला. त्यावरून राजेंद्र गुजर व त्यांच्यात वाद होत. सहा महिन्यांपूर्वी सविताने थाळनेर पोलिस ठाण्यात राजेंद्र गुजर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
हाणामारीनंतरचा प्रकारदरम्यान, काल सकाळी साडेआठला सविताचा पती गुलाब धनगर व राजेंद्र गुजर यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. पुन्हा दुपारी साडेबाराला गुजर व धनगर दापत्यांत मारामारी झाली. त्यानंतर राजेंद्र गुजर याने पत्नी विजया, मुलगा शुभम, आई अंजुबाईच्या मदतीने सविताच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटविले. त्यात ती गंभीररीत्या भाजली. तिला पती गुलाब धनगर याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राजेंद्र गुजरने परिवारासह पलायन केले.
खुनाचा गुन्हाया प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात काल प्रथमदर्शनी माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद होऊन चौकशीसाठी गुन्हा थाळनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एस. सोनवणे यांनी सहकाऱ्यांसह तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी सविताचा पती गुलाब धनगर याने दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र गुजर, त्याची आई अंजूबाई रघुनाथ गुजर, पत्नी विजया, मुलगा शुभम यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृत सविताचा पती व दोन्ही मुलांचे जबाब नोंदवले.
विशेष पोलिस पथकदरम्यान, फरार केलेल्या गुजर कुटुंबीयांच्या शोधासाठी चोपडा तालुक्यात विशेष पोलिस पथक रवाना केले. त्यांनी आज दुपारी चोपडा येथे प्रमुख संशयित राजेंद्र गुजरला अटक केली. त्याची आई, पत्नी व मुलाच्या शोधासाठी पोलिस पथक जळगावकडे रवाना झाले. या घटनेनंतर भावेर गावात काल दुपारपासून आजही स्मशान शांतता होती.