Wednesday, April 7, 2010

नाते तुझेन माझे साताजन्मीचे

नाते तुझेन माझे साताजन्मीचे
जसे आकाशाशी इंद्र धनुश्यांचे
समुद्राशी जसे किनाऱ्याचे
अन तारयांशी जसे चंद्राचे

कधीच भासत नाही

स्वप्न जाणायला डोळ्यांची गरज
कधीच भासत नाही,
प्रेम आहे तुझ्यावर सांगायला
मित्रांची गरज लागत नाही

स्वप्नातील स्वप्ने.

स्वप्नातील स्वप्ने..
स्वप्नातच तुटली...
प्रेमाची नजर जेव्हा...
दुसरीकडे गेली....

डोळा का हा रडतो?

जातो म्हणतोस जेव्हा
डोळा का हा रडतो?
तुझ्या येण्याच्या आशेवरच
नव्या स्वप्नात अडतो..............

तुझ्या स्वप्नांतच आहे

तुझ्या स्वप्नांतच आहे
माझ्या डोळ्यांचे जगणे
देती नजर प्रेमाची जेह्वा
तुझ्या नात्याचे असणे.......................

डोळ्यांच्या जाळ्यात

डोळ्यांच्या जाळ्यात
मी हि पुरता अडकलो..
धोपट वाट सोडून..
आड वाटेत बहकलो.

तसा मी अडाणी

तसा मी अडाणी
एक अक्षर हि न कळे
मात्र वाचू शकतो
तुझे निरागस डोळे