Thursday, April 8, 2010

महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते

प्रमुख घाट    रस्ते/महामार्ग
कसारा / थळ घाट    मुंबई ते नाशिक

माळशेज घाट    ठाणे ते अहमदनगर

दिवे घाट    पुणे ते बारामती

कुंभार्ली घाट    कराड ते चिपळूण

फोंडा घाट    कोल्हापूर ते पणजी

बोर / खंडाळा घाट    मुंबई ते पुणे

खंबाटकी घाट    पुणे ते सातारा

पसरणी घाट    वाई ते महाबळेश्वर

आंबा घाट    कोल्हापूर ते रत्नागिरी

चंदनपुरी घाट    नाशिक ते पुणे

महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थाने

कृष्णा-कोयना    - कराड (प्रीतिसंगम), जि. सातारा
कृष्णा-पंचगंगा    - नरसोबाची वाडी (कोल्हापूर)
मुळा-मुठा    - पुणे
वैनगंगा-वर्धा    - चंद्रपूर
वर्धा-वैनगंगा    - शिवनी
कृष्णा-वारणा    - हरिपूर (सांगली)
तापी-पूर्णा    - चांगदेव (जळगाव)

महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरे व तीर्थक्षेत्रे

पंढरपूर    भीमा
नेवासे, संगमनेर    प्रवरा
नांदेड, नाशिक, पैठण, गंगाखेड    गोदावरी
मुळा-मुठा    पुणे
भुसावळ    तापी
हिंगोली    कयाधू
धुळे    पांझरा
देहू, आळंदी    इंद्रायणी
पंचगंगा    कोल्हापूर
वाई, मिरज, कऱ्हाड    कृष्णा
जेजुरी, सासवड    कऱ्हा
चिपळूण    वशिष्ठी
श्री क्षेत्र ऋणमोचन    पूर्णा

महाराष्ट्रातील अष्टविनायक

श्री मोरेश्वर    मोरगाव    पुणे
श्री गिरिजात्मक    लेण्याद्री    पुणे
श्री महागणपती    रांजणगाव    पुणे
श्री विघ्नहर    ओझर    पुणे
श्री चिंतामणी    थेऊर    पुणे
श्री वरदविनायक    महड    रायगड
श्री सिद्धिविनायक    सिद्धटेक    अहमदनगर

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे
त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक
घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद
भीमाशंकर- जिल्हा पुणे
परळी वैजनाथ- जिल्हा बीड
औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश

बहू असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडव लेण्यांनी नटलेला; संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कान्होपात्रांनी मंतरलेला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने तेजाळलेला, संभाजीच्या हौतात्म्याने अजरामर झालेला; माँ जिजाऊच्या आशीर्वादाने बहरलेला; फुले, आंबेडकर, शाहू, आगरकर, सावरकर, टिळक, फडके यांच्या त्याग आणि क्रांतिकार्याने पुनीत झालेला हा महाराष्ट्र. तर मग अशा ह्या आपल्या महाराष्ट्राविषयी थोडा काही जाणून घेऊया

पोळा

श्रावण अमावास्येला बैलांची पूजा करून, त्यांना उत्तम जेवायला देऊन, कामातून विश्रांती दिली जाते. सजवून त्यांची मिरवणूक काढण्याचा हा दिवस.

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या बैलांना (पशुधनाला) त्यांच्या श्रमातून बदल देणे, त्यांना रजा देणे, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे असा त्यामागे अर्थ आहे. शेतातील कामे संपत आल्याने शेतकरी या उत्सवात बैलांसह आनंदाने सहभागी होऊ शकतात.


प्रत्येक शिव मंदिरात असणारा नंदी, वृषभ म्हणजेच बैल. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत बैलांना  सजवून त्यांची मिरवणूक काढतात. ज्या ठिकाणी दुग्धव्यवसाय, एकूणच शेती मोठ्या प्रमाणात उत्पन्न देते अशा ठिकाणी भरपूर पशुधन असते. सुबत्ता असल्यास ते पशुधन सुदृढही असते. तिथे बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्र त्यात पुढे आहे. कोकणात या उत्सवाला ‘बेंदूर’ असे नाव आहे. बंगालमध्ये, गुजराथमध्येही बैलांचा सण साजरा होतो. दररोज ज्याच्याकडून मेहनत करून घेतो, त्याच्या श्रमाची पावती देणे, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून, ओवाळून खायला देणे अशा गोष्टी केल्या जातात.




बैलाचे कष्ट शेताच्या प्रत्येक कामासाठी शेतकरी घेतो, त्यामुळेच त्याला भरपूर धान्य मिळते. अशा मूक प्राण्याला शेतीची कामे संपल्यावर विश्रांती देणारा हा सण! कृषिप्रधान संस्कृती याच्या मुळाशी आहे. निसर्गरूपांना देव मानणे, नवे धान्य आल्यावर त्याची पूजा करणे, हत्यारे-अवजारे यांची पूजा करणे, जमिनीला मातेसमान मानणे या पद्धती कृषिसंस्कृतीशी जोडलेल्या आहेत.





या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठुन दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सिमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करुन बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पध्दत आहे.त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमिनदार) याचेतर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेउन ओवाळण्यात येते.बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.
असा हा पोळ्याचा सण आहे. दिवसेंदिवस होणार्‍या नापिकीमुळे व खालावणार्‍या आर्थिक परिस्थितीमुळे याचा उत्साह कमी होत आहे.