कृपया ही व्यंगचित्र फ़क़्त मनोरंजनाच्या दृष्टीने अपलोड केली आहेत याची नोंद घ्यावी. कुठलाई कॉपीराईट वापरण्याचा माझा हेतू नाही.
Saturday, April 3, 2010
शिवसेना भव्यपणे साजरा करणार महाराष्ट्र दिन
उद्धव ठाकरे यांनी सांगितले, की 1 मे रोजी सायंकाळी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानात "गर्जा जयजयकार' हा कार्यक्रम होईल. त्याचे प्रमुख आकर्षण असतील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर. अनेक वर्षांनंतर लतादीदी रंगमंचावर गाताना पाहण्याचा व ऐकण्याचा सुवर्णयोग रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येईल. लतादींदीसमवेत उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर हेही या कार्यक्रमात सहभागी होतील. फटाक्यांच्या आतषबाजीत व तुफान जल्लोषात हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश शिवाजी पार्कवर जेव्हा आणण्यात आला, तेव्हा त्या समारंभात लता मंगेशकर यांनी गायलेले "बहु असोत सुंदर संपन्न की महा' हे महाराष्ट्र गीत यंदा पुन्हा एकदा त्या सादर करणार आहेत.
याच सोहळ्याचा एक भाग म्हणून 30 एप्रिल रोजी हुतात्मा चौकात शिवसेनेच्या वतीने दीपमाला लावण्यात येणार आहेत. "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' या मागणीसाठी रक्त सांडणाऱ्या मराठी माणसांच्या हौतात्म्याचा आदर राखण्यासाठी व अखंड महाराष्ट्राचे वैभव जतन करण्याच्या दृष्टीने 25 एप्रिल रोजी गोरेगाव पूर्व येथील एनएसई संकुलात "रक्तदान महायज्ञ' आयोजित करण्यात आला आहे.
उद्धव यांची "राज'कीय टोलेबाजी!शिवसेनेची धार अद्याप बोथट झाली नाही, पण ज्या पक्षांची धार बोथट झाली आहे, त्यांना धार कोण काढणार, असा उपरोधिक सवाल या वेळी उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, की बेळगाव-कारवार सीमा भागातील मराठी बांधवांसाठी शिवसेना लढत आहे, पण दुसऱ्या कोणाला त्यांच्यासाठी लढा द्यावा असे वाटत नाही. येथील मराठी माणसांसाठी लढणाऱ्यांच्या कानावर तेथील मराठी बांधवांचा आकांत येत नाही काय, असा खोचक प्रश्न राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी विचारला. शिवाजी पार्कवर शिवाजी महाराजांच्या जीवनप्रसंगांची दोन म्युरल्स उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांना विरोध करणाऱ्या शिवद्वेष्ट्यांचा विरोध आम्ही मोडून काढू, असा इशाराही त्यांनी मनसेचे नाव न घेता दिला.
"सोनी'च्या "करोडपती'चे सूत्रसंचालन आमीरकडे?
मुंबई - छोट्या पडद्यावर एक इतिहास रचणाऱ्या आणि उत्पन्नाच्या बाबतीत विक्रम प्रस्थापित करणाऱ्या "कौन बनेगा करोडपती' (केबीसी) या कार्यक्रमाचे पुनरागमन होत आहे. मात्र या वेळी हा कार्यक्रम "सोनी टीव्ही'वर दाखवला जाण्याची दाट शक्यता आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत "परफेक्शनिस्ट' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आमीर खानने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावे, यासाठी "सोनी' आणि त्याच्यामध्ये बोलणी सुरू आहेत. आमीरने अद्याप होकार किंवा नकार दिला नसल्याचे समजते.
परदेशात लोकप्रिय ठरलेल्या "हू वॉण्टस् टू बी मिलेनियर' या कार्यक्रमावर बेतलेला "कौन बनेगा करोडपती' नावाचा कार्यक्रम "स्टार प्लस' वाहिनीने आणला होता. त्याचे सूत्रसंचालन विख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले होते. या कार्यक्रमामुळे केवळ वाहिनीलाच नाही तर खुद्द अमिताभ यांनाही चांगलाच फायदा झाला होता. त्यासाठी अमिताभ यांना काही कोटी रुपये मोजण्यात आले होते. त्या वेळी त्यांचे "लॉक कर दिया जाये...', "क्या नऊ बज गये क्या' यांसारखे संवादही लोकप्रिय ठरले होते. अमिताभ यांनी पहिल्या अन् दुसऱ्या भागाचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर तिसऱ्या भागासाठी अमिताभ यांनी नकार दिल्याने शाहरूख खानकडे ही जबाबदारी टाकण्यात आली होती. त्याने आपल्या पद्धतीने हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचा प्रयत्न केला होता; परंतु पहिल्या भागाची सर काही त्याला आली नाही. आता "केबीसी'चा चौथा भाग आणण्याचा घाट रचण्यात आलेला आहे. त्याबाबतची बोलणी सुरू आहेत. मात्र सूत्रसंचालन कोणी करावे, असा प्रश्न उपस्थित होताच अमिताभ आणि शाहरूख यांच्या नावाऐवजी आमीर खानचे नाव पुढे आले आहे. कारण अमिताभ यांनी हा कार्यक्रम आता करण्यास प्रकृतिअस्वास्थ्यामुळे नकार दिला आहे. शाहरूखने "केबीसी'च्या चौथ्या सत्रात काम करण्यास नकार दिल्याने "सिनर्जी ऍडलॅब्स' या प्रॉडक्शन हाऊसला "पाचवी पास' कार्यक्रम आणावा लागला होता आणि शाहरूखबरोबर आपला झालेला करार पूर्ण करावा लागला होता; परंतु आताचे चित्र निराळे आहे. आता केबीसी "स्टार'वर नाही, तर सोनी टीव्हीवर येण्याची शक्यता आहे.

श्रावण
श्रावण -
श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानतात. पावसाच्या सरींमुळे शेतीतील कामे पूर्ण झालेलीच असतात. हवा ओलसर गारव्याची, आल्हाददायक असते. सूर्यदर्शन नियमित होत नाही. पण सृष्टी हिरवा शालू नेसून नटलेली असते.
चातुर्मास्य (चतुर्मास) म्हणजे चार पवित्र मराठी महिने. चारही महिने अनेक धार्मिक दिवस पाळले जातात. व्रत-वैकल्ये केली जातात. शेतात कामे कमी प्रमाणात असतात. ईश्र्वराचे स्मरण व्हावे व आहारावर नियंत्रण ठेवले जावे म्हणून अनेक उपवास याच महिन्यात असतात.
पावसाळ्यात सूर्यदर्शन कमी वेळा होते. सृष्टी सौंदर्याने दिमाखात मिरवत असताना या काळात पचण्यासाठी जड पदार्थ खाल्यास ते तब्बेतीला हानीकारक आहेत असे आयुर्वेद आणि आहारशास्त्र सांगते. कांदा-लसूण असे मसालेदार पदार्थ, वांगं-टोमॅटो असे बिया असलेले भाजीचे प्रकार खाण्यात येऊ नयेत अशी एक प्रथा आहे. आहारनियंत्रण करून तब्बेत चांगली ठेवणे असा त्याचा उद्देश असावा असे अभ्यासक सांगतात. ज्या पदार्थामुळे वात होतो असे वातूळ पदार्थ खाल्ले जाऊ नयेत असाही त्याचा एक अर्थ. ईश्र्वरभक्ती, धार्मिक कृत्ये यातही व्यत्यय येऊ नये, पुढे येणार्या शेतीच्या मोठ्या कामांना तब्बेतीची तक्रार असू नये म्हणून तब्बेत जपण्याचा हा मार्ग असावा. या श्रावण महिन्यातील सण-उत्सवांची संख्या तुलनेने अधिक आहे.

गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा - व्यासपूजा महोत्सव
गुरु-शिष्य परंपरा आजही काही क्षेत्रात जपली जाते. संगीत आणि नृत्य या क्षेत्रांत ही परंपरा पिढ्या न पिढ्या जपली जाते आणि अजूनही गुरुवंदनाने तिचे महत्त्व नव्या शिष्यांवर बिंबवले जात आहे. आजच्या काळात शाळा-महाविद्यालयांमध्येही या दिवशी ‘गुरुपूजन’ करून शिक्षक प्राध्यापकांविषयीचा आदर व्यक्त केला जातो.
समर्थ रामदास - कल्याण स्वामी, श्रीकृष्ण - अर्जुन, श्री रामकृष्ण- विवेकानंद अशा पूर्वीच्या गुरुशिष्यांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून गुरुपूजन केले जाते. आजच्या काळातील महाराष्ट्रातील रमाकांत आचरेकर - सचिन तेंडुलकर ही गुरुशिष्यांची जोडीही अनुकरणीय आहे. आपल्या राज्यातील कुस्ती या खेळातही गुरूला मोठे स्थान आहे
आषाढी पौर्णिमा या तिथीला, पूर्णचंद्र आकाशात असताना, जगद्गुरू श्री व्यासमहर्षींचे स्मरण करून, आपल्या
विकासासाठी, श्री परम्रेश्वराच्या कृपाआशीर्वादासाठी प्रार्थना करण्यासाठी, एकत्र जमण्याचा उत्सव.
आषाढातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून किंवा व्यासपूजन करून साजरी करतात. गुरुपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरू मानले आहे. भारतीयांना गुरु-शिष्य परंपरेचे फार महत्त्व आहे. आई-वडील आणि गुरू ही तीन दैवते मानावीत असे सांगितले जाते. व्यासमहर्षी यांची पूजा म्हणजे गुरुपौर्णिमा. शंकराचार्य यांची पूजा म्हणजे गुरुपूजन. संत ज्ञानेश्र्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, श्री गोंदवलेकर महाराज, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज आदी संत-सत्पुरुषांना गुरुस्थानी मानून महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांची पूजा केली जाते. गुरूने दाखवलेल्या मार्गाने जाऊन झालेल्या प्रगतीबद्दल गुरुकडे येऊन सांगणे, आशीर्वाद घेणे, कृतज्ञता व्यक्त करणे, गुरुपूजन - मुरुवंदन करणे म्हणजेच गुरुपौर्णिमा.

पाचगणी
|